योगसाधना
ऊर्ध्वमुख श्वानासन
ऊर्ध्वमुख म्हणजे वरती केलेले तोंड,श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याने स्वतःचे अंग ताणून डोके वर उचलले म्हणजे दिसणाऱ्या दृश्याप्रमाणे हे आसन आहे . त्यामुळे त्याला हे नाव पडले आहे.
पद्धती :
१)तोंड जमिनीकडे वाकवून पालथे पडा.पावलामध्ये दोन फूट अंतर ठेवा पायाचे अंगठे सरळ मागच्या बाजूला रोखलेले असू द्यात तळहात कंबरे शेजारी जमिनीवर टेकवा हाताची बोटे डोक्याच्या दिशेला रोखलेली असू द्या.
२) श्वास घ्या, डोके आणि धड उचला हात पूर्णपणाने ताणा.गुडघे जमिनीवर न टेकवता डोके आणि धड शक्य तितके मागे ढकलण्याचा प्रयत्न करा.
३) पाय सरळ ठेवा आणि ते गुडघ्या पाशी घट्ट आवळलेले असू द्या पण गुडघे जमिनीवर टेकवू नका.शरीराचा भार तळहात आणि पायांची बोटे यावर राहिल. ४) पाठीचा कणा मांड्या आणि पोटर्या पूर्णपणे ताणून धरा कमरेचा भाग जास्तीत जास्त आकुंचित करा, छाती पुढे न्या, मान पूर्णपणे ताणा आणि डोके जास्तीत जास्त मागे न्या, दंडाच्या मागची बाजू पण ताणून धरा.
५) दीर्घ श्वसन करत या स्थितीत अर्धे ते एक मिनिट राहा.कोपरे वाकवा, ताण सैल करा आणि जमिनीवर विसावा घ्या.
परिणाम :
या आसनामुळे पाठीच्या कण्याला नवजीवन मिळते आणि पाठीचा ताठ कण्याचा त्रास असलेल्या लोकांना ते विशेष लाभदायक ठरते पाठीतील उसण सायटिका हे विकार असलेल्या लोकांना आणि कण्यातील चकत्या सरकलेल्या लोकांना या आसनातील कृती लाभदायक ठरतात. या आसनामुळे पाठीचा कणा सदृढ बनतो आणि पाठ दुखी बरी होते ,छाती फुगवल्यामुळे फुप्पूसे लवचिक बनतात ओटीपोटाच्या भागात रक्ताभिसरण योग्य तऱ्हेने होऊ लागते आणि तो भाग निकोप राहतो.
0 Comments