मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना , आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 योगसाधना : उष्ट्रासन

उष्ट्र म्हणजे उंट

 पद्धती : 

१) जमिनीवर गुडघे टेकवा मांड्या आणि पावले जुळलेली असुद्या पायाची बोटे मागे रोखलेली आणि जमिनीवर टेकलेली असू द्या .

२) तळहात कमरेवर ठेकवा  मांड्या  ठाणा कण्याला  पाठीमागे बाक  द्या आणि बरगड्या ताणा. 

३) श्वास सोडा.उजवा तळहात उजव्या टाचेच्या वर ठेवा.शक्य झाल्यास तळहात पायांच्या चवड्यावर ठेवा. 

४)तळहात पावलावर घट्ट दाबा.डोके मागे झुकवा आणि पाठीचा कणा मांड्या कडे ढकला,मांड्या जमिनीशी काटकोनात असाव्यात.  

५) कंबरे खालचा भाग आकुंचित करा आणि कण्याचा गुदास्थिचा व छाती मागचा भाग आणखी ताणा.मान पाठीमागे ताणलेली असू द्या. 

६) या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करीत अर्धा मिनिट रहा. 

७) आधी एक आणि नंतर एक अशा तऱ्हेने हात मोकळे करा आणि कमरेवर टेकवा मग जमिनीवर बसा आणि विसावा घ्या.  

परिणाम : उतरते खांदे आणि पाठीला कुबड असलेल्या लोकांना हे आसन  लाभदायक ठरते . पाठीचा संपूर्ण कणा मागच्या बाजूला ताणला जातो आणि सदृढ बनतो वृद्ध माणसे आणि पाठीच्या कण्याला दुखापत झालेली माणसे सुद्धा हे आसन सुलभतेने करू शकतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार : बाकर भाजी

 साहित्य :  लाल भोपळा अर्धा किलो, दोन डाव तेल, फोडणीचे साहित्य, दोन टेबलस्पून खसखस ,दोन टेबल स्पून सुक्या खोबर्‍याचा किस, एक टेबलस्पून चारोळी, सर्व जिन्नस मंद विस्तवावर भाजून अर्धवट कुटून पूड करावी.  चारोळी जास्त कुटू  नये . मीठ गूळ चवीनुसार , एक चमचा लाल तिखट थोडा चिंचेचा कोळ आणि मुठभर चिरलेली कोथिंबीर

 कृती :  लाल भोपळ्याच्या बिया काढून भोपळा स्वच्छ धुऊन सालासकट चौकोनी फोडी कराव्यात, जाड बुडाच्या पातेल्यात तेलाची मोहरी हिंग हळद घालून फोडणी करावी.  फोडणीतच लाल तिखट टाकून भोपळ्याच्या फोडी लगेच घालाव्यात, पाण्याचे झाकण ठेवून भोपळा शिजत आला कि अगदी थोडा चिंचेचा कोळ, गूळ ,मीठ व कुटलेले खोबरे, खसखस व चारोळी घालावी एक वाटी पाणी घालून भाजी चांगली शिजली की कोथिंबीर घालून उतरवावी. 

 टीप : नागपूरकडे ही भाजी खास करतात.  भाजीवर  तेलाचा  तवंग यायला हवा खसखस, खोबरे आणि खमंग लागते सुक्‍या खोबऱ्याचा बरोबर आवडीनुसार पाच-सहा लसूण पाकळ्या कुठून घालाव्यात. 

Post a Comment

0 Comments