आरोग्य आहार : केरला स्टाईल टोमॅटो करी

 आरोग्य आहार 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

केरला स्टाईल टोमॅटो करी

साहित्य : 

३ ते ४ टोमॅटो , मध्यम आकाराचा कांदा , १ चमचा धने जिरे पूड , १ चमचा लाल तिखट , २ हिरव्या मिरच्या , कडीपत्ता ,कोथिंबीर , लसूण , १ वाटी ओले खोबरे , जिरे , मोहरी ,तेल , गूळ (मला या भाजीत गूळ आवडतो म्हणून घातला आहे , नाही घातला तरी चालेल ) .

कृती: 

पहिल्यांदा ओले खोबरे आणि १ चमचा जिरे एकत्र करून बारीक वाटण करून घ्या . टोमॅटो च्या थोड्या मोठया फोडी करा . कांदा चौकोनी चिरून घ्या पण तोही खूप बारीक नको . मिरची , लसूण एकत्र बारीक ठेचून घेतला तरी चालेल किंवा कापून घ्या .

फोडणीसाठी ४ चमचे तेल घ्या . गरम झाले कि त्यात जिरे ,मोहरी ,लसूण , कडीपत्ता घाला . चांगलं भाजलं कि कांदा घाला . तोही लालसर भाजला कि त्यात धने जिरे पूड , लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा . चिरलेले टोमॅटो घाला . टोमॅटो चांगला परतून घ्या . वाटीभर पाणी घालून झाकून ठेवा . २ ते ३ मिनिटे चांगले शिजल्यावर खोबऱ्याचे वाटण घालून चवीप्रमाणे मीठ घाला आणि गूळ टाका. घट्ट वाटत असेल तर अजून थोडे पाणी घाला . चांगली उकळी काढा . कोथिंबीर टाका . गरमागरम करी पोळी , भात दोन्ही सोबत खूपच मस्त लागते .

Post a Comment

0 Comments