आरोग्य आहार
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वीटकॉर्नचे धिरडे
साहित्य :
सहा कणसांचा कीस,अर्धी वाटी तांदुळाच पीठ,चार चमचे हरबरा डाळीचे पीठ,अर्धा इंच आल्याचा तुकडा,चार लसणाच्या पाकळ्या,सहा पाने पुदिना,
चार हिरव्या मिरच्या,चवीपुरते मीठ,चार चमचे तेल.
कृती:
आलं, लसूण, पुदिना, मिरच्या, मीठ हे सगळे जाडसर वाटुन घ्यावे.मक्याचा किस, दोन्ही पिठे आणि हे वाटण असे सगळे एकत्र करुन अर्धा तास झाकुन ठेवावे. पाणी घालु नये.कणसांच्या कीसामुळे थोडे पाणी सुटते, अजुन थोडे पाणी घालुन हलवावे. साधारण धिरड्याच्या पिठाइतके पातळ झाले पाहीजे.
तव्याला थोडे तेल लावुन धिरडि घालावीत.चटणी बरोबर खावीत.
टिप : मक्याच्या पिठाची पण धिरडी करतात, पण या कणसाच्या कीसाची चव वेगळी आणि मस्त लागते.
0 Comments