तप्त दिव्य- भाग २

 तप्त दिव्य- भाग २ 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राजश्री सरखेल यांचा  निष्कर्ष नारो रघुनाथ यांना निम्मे वतन व निम्मे वतन दत्ता प्रभू  व बाजीप्रभू यांना देतो.  त्यास  आपले बापाने उत्तर केले की ,आपले दरोबस्त असता निमे काय म्हणोन घ्यावे ? परंतु नारो प्रभू यांनी  विचार केला, ज्याचे सत्ते मध्ये आपले वतन आहे. त्याचा विचार ना ऐकता परिणाम बरा नाही .   असा विचार करून निम्मे वतनास  राजी झाले. राजश्री मशार  जिल्हेनी   निमे वतनाचा गोत  महजर आपल्या शिक्क्यानिशी करुन दिला.  आणि दत्ताजी गबाजी व बाजी गबाजी यास निम्मे वतनाची सनद करून देत होते ते त्यांनी घेतली नाही.  आम्हा  हरदुवादीयास राजश्री सदाशिव पंडित कडे पुण्यात रवाना केले आणि ते सांगतील त्याप्रमाणे वर्तन करण्यास सांगितले.  त्यावरून पुण्यास गेले तेथे हरदूवादीस  मशार जिल्हेने समजावीस  करून विल्हे  करावयाचा विचार केला.  त्यास  दत्ताजी म्हणू लागला दरोबस्त वतन आपले आहे . आपण समजावीसी राजी नाही. त्यावर मांसाहार जिल्हेने त्यास बोलिले  .  

तरी 'दिव्य 'करशील काय?  तेव्हा गणेश दत्ताजी दिव्यास राजवंद जाहला .  वादियांस वर्तूपूरक जामीन मागितले.  तो गणेश दत्ताजी यांनी गणेश निळकंठ देशकुलकर्णी तर्फे नागठाणे यासी जामीन दिले.  आपण त्रिंबकराव बाबाजी व लक्ष्मणराव भिकाजी अधिकारी तर्फे हमरापूर यास  जामीन दिले.पंडित मशार जिल्हेनी श्री गोदातीरी घ्यावयाचा करार केला व आम्हा हरदुवादीयां जवळून कतबे  लेहून घेतले बद्दल तपशील एक गणेश दत्ताजीने कतबा लेहून दिल्हा ; पहिले पासून वतन  आपले आहे.  आपणा  वडीला पासून आजतागायत आठ पुरुष वतन खात आलो . राघो नारायण यांच्या वडिलांची गुमास्तेगिरी आपले वडिलांनी केली नाही हे खरे आहे . त्यास राघू नारायण यांनी दिव्य करावे लागले तरी दरोबस्त वतन आपण खाऊ ,दिव्यास खरे निघाले तरी दरोबस्त वतन त्यांनी खावे आपल्यास  अर्थाअर्थी संबंध नाही येणे प्रमाणे कदबा दिल्या. 

आपण कदबा लेहून दिल्या की पहिले वतन गोळकाचे होते ,त्या जवळून आपल्या वडिलांनी विकत घेतले आणि गणेश दत्ताजी याच्या वडिलांस  गुमास्ते गिरी ठेवले होते तेच बळावून मारे करून वतन अनुभवू लागले ते गोष्ट खरी आहे.  आपण दिव्य करोन दिव्यास लागलो तरी वतानासी संबंध नाही ,दरोबस्त वतन गणेश दत्ताजीने खावे दिव्यास खरा जाहलो तरी दरोबस्त वतन आपण खाऊ गणेश दत्ताजी याचा अर्थाअर्थी संबंध नाही येणे प्रमाणे कदबा लिहून दिल्हा .  

 येणेप्रमाणे कतबा लेहून कसबे कोपरगाव परगणे  कुंभारी श्री गोदातीर येथे श्री शुकलेश्वर देवासन्निध दिव्य  नेमून थोर थोर पंडित शास्त्रज्ञ उभय  गंगातीरी चे व कसबे मजकुरचे राजश्री पंतप्रधान या समागमे  होते.  त्यांचे संमते  शास्त्रार्थ पाहून शके १६६६  रक्ताक्षी नाम संवत्सरे  शुद्धदशमी बुधवारी मज राघो नारायणाच्या हातास पिशव्या  घालून दोन्ही हातावरी लखोटे  केले . दुसरे दिवशी गुरुवारी प्रात:काळी एकादशीस श्री संनिध गोदातीर पंडित मशार जिल्हे व ब्राह्मण मंडळी व मातब्बर लोक गोदातीरी व कोकण वबाजे प्रतीचे वतनदार वगैरे या सह बैसोन  समस्त हुजूर हातीच्या पिशव्या काढून हातावरी घालून साली  घालून दोन्ही हात घासुन धोवविले आणि दोन्ही हाताची चिन्हे लेहून ठेवोन   लोखंडाचा गोळा पंचाशत पळाचा म्हणजे वजन सोळा हजार एकशे साडेसहासष्ट   तोळे दोन मासे वजन करून कोळशेयात  घालून अग्नीमध्ये भाते लावून त्रिवार तप्त करून कपाळी भाळपत  बांधून अश्वत्थाची सात पाने  हातावरी  ठेवून ,कच्च्या सुताने गुंडाळून गोळा सांडासाने धरोन मग राघो  नारायण यांच्या हातावर ठेवून सात  मंडले चालून जाऊन आठवे मंडली  गोळा ठेवायची आज्ञा केली.  त्याप्रमाणे गोळा हातावर घेऊन सात मंडले  चालून जाऊन आठवे मंडली  गोळा ठेवायचा नियतस्थळ केले होते.  तेथे ठेविला तो नियंतस्थळ   कुंडात कणिक अगोदर घातली होती ते जळू लागली .

 भुलोजी पाटील ढमढेरे तळेगावकर यांच्या हाती  सरमाडाच्या पेढ्या दिल्या होत्या त्या त्यांनी गोळ्यावर टाकीताच  सर माडाच्या पेडयांनी अग्नी घेऊन ज्वाळा निघू लागल्या, मग आपले दोन्ही हात सर्व सभा आदी  करून पंडित मशार जिल्हेंनी  पाहिले व गणेश दत्ताजी यास दाखविले. तो हातास अणुमात्र अग्नी स्पर्श जाहला  नाही उपरांतिक मागती दोही हातास पिशव्या घालून लखोटे केले दोन प्रहार दिवस व चार प्रहार रात्र तो अनुभव मात्र अजूनही स्पर्श झाला नाही सुपर आर्थिक मागणी दोन्ही हातात पिशव्या घालून लखोटे केले दोन प्रहर दिवस व चार प्रहर रात्र ठेवून दुसरे  दिवशी द्वादशीस  शुक्रवारी प्रात:काळी मजालीस नेऊन हातीच्या  पिशव्या काढून सर्व सभाआदी करून पंडित मशारजिल्हेंनी हात पाहिले.(अपूर्ण ) 


Post a Comment

0 Comments