नगरटुडे बुलेटीन - २७-०२-२०२१

 नगरटुडे बुलेटीन - २७-०२-२०२१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य व सुराज्यांसाठी आयुष्य पणाला लावले 

 मयुर बोचुघोळ : भाजप व चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने चौपाटी कारंजा येथे अभिवादन

    वेब टीम  नगर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेलो जहाल क्रांतीकारक होते. ’ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला’ सावरकरांच्या या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाप्रती असलेलं प्रेम व्यतित होतं. दूरदृष्टी, विज्ञानवादी, क्रांतीकारक होते. समाज सुधारणेतील त्यांचे कार्यही अनमोल असे होते. सुमारे 60 वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी आपले आयुष्य पणाला लावले. अशा थोर देशभक्ताला अभिवादन करतांना अभिमान वाटतो. प्रतिष्ठान अशा थोर समाजसेवकांच्या आदर्शावर काम करत आहे, असे प्रतिपादन चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केले.

     भाजप व चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौपाटी कारंजा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सचिन पारखी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बोचुघोळ, मिलिंद गंधे, कैलास दळवी, अदिनाथ येंडे, अमोल राजेभोसले,  ऋषीकेश वाघमारे, उमेश साठे, आक्रम पठाण, वैभव ताकपिरे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी वसंत लोढा म्हणाले, एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. त्यांच्या दृष्टीची प्रचिती त्यांच्या कार्यातून दिसून येते असे सांगितले.

     याप्रसंगी मिलिंद गंधे, कैलास दळवी आदिनी मनोगत व्यक्त केली. शेवटी आदिनाथ येंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्रवीर यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील

भैय्या गंधे : भाजपाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

    वेब टीम नगर : स्वातंत्रवीर वीर सावरकर यांनी देशासाठी जे बलिदान दिले आहे, ते आपण कधीही विसरता कामा नये.  स्वतंत्र्य मिळविण्याची त्यांची असलेल्या तळमळ त्यामुळेच त्यांना ‘स्वातंत्रवीर’ ही पदवी देण्यात आली. त्याचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. केंद्रातील भाजपा सरकाराने अंदमान बेटावर स्वातंत्रवीर सावरकरांचे स्मारक निर्माण करुन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला आहे. सावरकरांचे विचार आपण आत्मसात करुन त्याप्रमाणे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.

     स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सरचिटणीस अॅिड.विवेक नाईक, तुषार पोटे, मंडल अध्यक्ष अजय चितळे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी नरेंद्र कुलकर्णी  म्हणाले, अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या तसेच मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अशा थोर देशभक्तांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण समाजात काम केले पाहिजे, असे आवाहन केले.

     याप्रसंगी उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, सचिन पारखी, प्रविण ढोणे, उदय अनभुले, अविनाश साखला, नरेश चव्हाण, चंद्रकांत पाटोळे, लक्ष्मीकांत तिवारी, नितीन जोशी, अजय राऊत ज्ञानेश्वलर धीरडे आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महावितरणने ‘वसुली भाईगिरी’थांबवावी

सुमित वर्मा : मनसे विद्यार्थी सेनेचे अधिक्षक अभियंत्यांना निवेदन

   वेब टीम नगर : महावितरण सध्या ‘वसुली भाईगिरी’ करुन सक्तीची वीज बिले वसूल करत आहे, ती तात्काळ थांबवावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, सनी वैराळ, प्रमोद ठाकूर, आदेश गायकवाड, बजरंग रणसिंग, संतोष गवते, शुभम काळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

     अधिक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचे ३ ते ४ महिने सर्वकाही बंद असतांना ज्यांचे रोजच्या कामाईवर सर्वकाही अवलंबून असते. अशा लोकांना त्यांचे व्यवसायिक, घरगुती लाईटबील अव्वाच्या सव्वा आलेले आहेत. क्लासेस, नर्सरी, प्ले ग्रुप सारख्यांचे तर अजूनही सर्व वर्ग बंद आहेत. पण आपल्या कर्मचार्यांवकडून बळजबरीने वीज बील वसूली करण्यात येत आहे. यातून मार्ग काढण्याबाबत कोणतेही पाऊल आपल्या कार्यालयाकडून उचलले गेल्याचे दिसत नाही. उर्जामंत्री खोटे आश्वाासन देऊन जनतेची दिशाभूल करतात, पण सर्वसामान्य जनतेचा विचार कोणीही करतांना दिसत नाही.

     ज्या लोकांना खोटी वीज बिले दिली, अंदाजे बीले दिली, त्यांना दुरुस्तीसाठी रक्कम भरायला लावणे ,त्यात  जे सावकरी व्याज लावत आहेत, त्यावर मनसेचा आक्षेप आहे.

     लोकांना लॉकडाऊनच्या झळा असूजही बसत आहेत, त्या तीन महिन्यांची नुकसान भरपाई होणार तर नाहीये पण त्याचा नहाक त्रास सहन करावा लागत आहे. आपण तात्काळ ही ‘तोडा-तोडी’ थांबवावी. जनतेला या त्रासातून मुक्त करावे अन्यथा येत्या आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आपल्या कार्यालयावर ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर होणार्यान गोष्टींना तुम्ही स्वत: जबाबदार असाल  असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एटीयु जदिद उर्दू प्राथमिक शाळेचे कार्य कौतुकास्पद 

 किरण काळे : अल्पसंख्यांक काँग्रेसच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

वेब टीम नगर : अल्पसंख्यांक काँग्रेसच्यावतीने शिवजयंतीनिमित्त माणिक चौक येथील एटीयू जदिद उर्दु प्राथमिक शाळेमध्ये शिवाजी महाराजांवरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. जदीद उर्दू शाळेचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काळे यांनी यावेळी केले. 

यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान सर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले. 

यावेळी बोलताना काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील तसेच सर्व धर्मातील मावळ्यांना संघटित करत स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे जीवन चरित्र आजही लाखो, करोडो लोकांना प्रेरणा देणारे आहे. 

अल्पसंख्यांक काँग्रेसच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर केलेले निबंध लिखाण हे भारावून टाकणारे आहे, असे यावेळी काळे म्हणाले. 

उर्दू भाषा ही अभिव्यक्त करण्यासाठीची एक सशक्त भाषा आहे. उर्दू माध्यमाची नगर शहरातून चालणारी जदिद शाळा ही खरोखर कौतुकास पात्र आहे. अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख आणि कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र सखोलपणे अभ्यासण्याची संधी मिळाली आहे,असे प्रतिपादन काळे यांनी यावेळी केले. 

विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देत गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना देखील या वेळी शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा आयोजनामागील भूमिका अज्जूभाई शेख यांनी विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरिफ सय्यद यानी केले. शाळेच्यावतीने मुख्याध्यापक नासीर खान सर यानी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. 

यावेळी मुबीन शेख, इम्रान बागवान, नलिनीताई गायकवाड, जरिना पठाण, उषा भगत, सुनिता बागडे,  शौकत सर, अलतमश जरिवाला, कौसर खान, निता बर्वे, शाहीन बागवान, निखिल कुसमुडे, इम्तियाज शेख, प्रशांत वाघ, गणेश अापरे, प्रविण गिते, विशाल कळमकर, अन्सार शेख, शबाना सय्यद, फहीम इनामदार आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रदुषण रोखण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे

 प्राचार्य चंद्रकांत चौगुले : अहमदनगर हायस्कूलमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियान विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा

    वेब टीम  नगर :  महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांच्या सहभागातून  ‘माझी वसुंधरा’  हे अभियान राबविण्यात येत आहे. यतीमखाना  संस्थेचे अहमदनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  प्राचार्य चंद्रकांत चौगुले  यांनी  विद्यार्थ्यांकडून ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत प्रतिज्ञा  म्हणून घेतली. यावेळी मेघा कुलकर्णी , समीना शेख, नाजीया शेख, मंगल अहिरे, पठाण आसमा शेख आफताब,  यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

     यावेळी प्राचार्य चंद्रकांत चौगुले म्हणाले, सध्याच्या ग्लोबल वार्मिंगमुळे वातारणात दुषित झाले आहे. या दुषित वातावरणामुळे पाणी, हवा याद्वारे अनेक आजारांचा फैलाव होत असल्याने हवा - पाणी शुद्ध कसे राहिल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रदुषण रोखण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. असे सांगून शासनाच्या आदेशाचे पालन करून  गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे,  मास्क चा वापर नियमित करावा. सॅनिटायझरचा वापर करावा असे अवाहन करण्यात आले.

      विद्यालयात कोव्हिड- 19 च्या नियमांचे काटेकोर पालन करत पर्यावरण  व सध्याच्या वातावरणातील बद्दलच्या प्रतिज्ञेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सृष्टीचा सृजनकर्ता ही विश्व-कर्मा यांची ओळख 

 प्रशांत वाघचौरे : ओबीसी बारा बलुतेदार महासंघातर्फे जयंती साजरी

    वेब टीम  नगर : सृष्टीच्या प्रारंभी केवळ विश्वफकर्मा अस्तित्वात होते. संपूर्ण प्राणीसृष्टीचा विश्व्कर्मा जनक मानले जातात. पुराण काळात महाभारतात विश्व कर्मांना देवाचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. त्यामुळे सृष्टीचा सृजनकर्ता ही विश्वगकर्मांची ओळख आहे, असे प्रतिपादन ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वाघचौरे यांनी केले.

     सावेडी उपनगरात ओबीसी बारा बलुतेदार महासंघातर्फे श्री भगवान विश्वबकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, उपाध्यक्ष अनिल इवळे, शहराध्य़क्ष श्याम औटी, सावेडी विभाग अध्यक्ष संजय सैंदर, ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, राजेश सटाणकर, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम सोलाणे, लोकशाही विचार मंचचे जिल्हाध्यक्ष संदिप यादव, भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष अनिल निकम, डॉ.सुदर्शन गोरे, बाबूराव दळवी, जालिंदर बोरुडे आदि मान्यवर उपस्थित होते.

.वाघचौरे पुढे म्हणाले, विश्वुकर्मा यांचे चरित्र ग्रंथामधून त्यांच्या कार्याची माहिती होते. इंद्रासाठी इंद्रलोक, सुतल नामक पाताळलोक, श्रीकृष्णासाठी द्वारकानगरी, वृंदांवन, राक्षसांसाठी लंका, तसेच पांडवांसाठी हस्तीनापूर आणि इंद्रप्रस्थ, गरुड भवन आदिंची निर्मिती करुन श्रीरामांना देखील सहकार्य केले होते. त्यामुळे त्यांना विश्वंकर्मा सृष्टीचा सृजन कर्ता आहे ही ओळख होते.

     प्रारंभी विश्वुकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सर्वांनी अभिवादन केले. प्रसादाचे वाटप झाल्यावर श्री.भुजबळ, श्री.सटाणकर, श्री.दळवी यांनी देखील विश्वंकर्मा यांच्या कार्याची माहिती देत ब्रह्मांडातील शिल्पकार, वास्तूकार आणि अभियंता म्हणून त्यांची ख्याती असल्याचे सांगितले. त्यांच्या जयंतीला पुजनाच्या निमित्ताने या यंत्र शस्त्रांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करावा, असे सांगितले.

     यावेळी विश्वतकर्मा यांची आरती करण्यात आली. शेवटी माऊली गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्राच्या ५४ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा शानदार शुभारंभ

    वेब टीम  नगर :  सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन सानिध्यात महाराष्ट्राच्या 54 व्या तीन-दिवसीय प्रादेशिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ हर्षोल्हासपूर्ण वातावरणात आज ‘संपूर्ण अवतार बाणी’ तसेच ‘सम्पूर्ण हरदेव बाणी’च्या पावन पदांच्या गायनाने होत आहे.  जगभरातील लाखो भाविक-भक्तगण घरबसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील हजारो निरंकारी भक्तगण समागमात प्रत्यक्ष सहभागी होत असत पण सद्य परिस्थितीत व्हर्च्युअल स्वरुपात घरबसल्या या आध्यत्मिक समागम सोहळ्याचा आनंद घेत आहेत, अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख किशोर खुबचंदानी यांनी दिली.

     समागमाचे प्रसारण व्हर्च्युअल रूपात दि.२६, २७ व २८ फेब्रुवारी रोजी  सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टी.व्ही. चॅनलवर केले जाणार आहे.या कार्यक्रमामध्ये सद्गुरुंच्या पावन दर्शनाबरोबरच भक्तीसंगीत आणि व्याख्यानांच्या माध्यमातून संत-महात्म्यांचे ओजस्वी व प्रेरणादायी विचार श्रवण करता येतील. या वर्षी कोरोना महामारीमुळे समागमाची व्यवस्था व्हच्र्युअल रूपात अशा प्रकारे करण्यात आली आहे ज्यायोगे भक्तगणांना तशीच अनुभूती यावी जशी खुल्या प्रांगणातील समागम मंडपामध्ये बसून मिळते.

     या वर्षी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ठेवण्यात आला आहे. मानवतेने युक्त सहज, सरळ व सुंदर जीवन जगण्यासाठी जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये स्थिरतेची नितांत आवश्यकता आहे. मग ही स्थिरता आहे तरी काय? ती प्राप्त करण्याचा उपाय कोणता आणि मानवी जीवनाशी तिचा संबंध तरी काय आहे? या सर्व तथ्यांच्या बाबतीत समागमाच्या तिन्ही दिवशी वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चा केली जाईल. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाच्या शेवटी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. 

     पूर्वेतिहास पाहिला तर दरवर्षी समागमाचा प्रारंभ महाराष्ट्राच्या विविध भागांसह देशाच्या इतर प्रांतांतील लोकसंस्कृतींचे प्रतिनिधित्व करत अनेकतेत एकतेचे दर्शन घडविणार्याा रंगीबेरंगी शोभायात्रेद्वारे होत आला आहे. तथापि, या वर्षी समागमामध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोलीभाषांसह देशातील अन्य भाषांच्या माध्यमातून भक्तीगीते, अभंगवाणी, कविता आणि व्याख्यानांच्या माध्यमातून अनेकतेत एकतेचा अद्भुत संगम पहायला मिळेल ज्यातून सर्वांना सद्भाव आणि एकत्वाची प्रेरणा प्राप्त होईल.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तरुण नेतृत्वामुळे समाजात चांगले बदल घडतील

हभप विश्वतनाथ राऊत : वारकरी सेवा संघाच्यावतीने प्रशांत गायकवाड व किरण काळे यांचा सत्कार

     वेब टीम नगर :  राजकीय पदाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्नक सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन ते सोडविले पाहिजे. राजकारणाबरोबरच समाजकारण केल्यास यश हे मिळत असते. समाजाने ज्या विश्वा साने आपल्यावर जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे सांभाळून वंचित घटकांसाठी काम केले पाहिजे हेच काम प्रशांत गायकवाड व किरण काळे करत आहेत. प्रशांत गायकवाड यांनी आपल्या कार्याने अनेक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. तर किरण काळे नगर शहरातील प्रश्नांससाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असाच आहे. या तरुण नेतृत्वामुळे समाजामध्ये बदल घडून चांगली कामे त्यांच्या हातून घडेल, असा विश्वातस जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष हभप विश्वानाथ राऊत यांनी केले.

     अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नूतन संचालकपदी प्रशांत गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल तसेच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा  वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष हभप विश्वझनाथ राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  अॅवड.रमेश नागवडे, अनंता गारदे, सय्यद खलील, झावरे, विकास राऊत, सुभाष राऊत आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी प्रशांत गायकवाड व किरण काळे यांनी सत्काराबद्दल आभार मानून आपण राजकारणापेक्षा समाजकरणाल महत्व दिले आहे. समाजातील प्रश्न  सोडविण्यासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला आहे. लोकांची कामे झाली पाहिजे ही प्रामाणिक भावना असून, आपल्या सारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करत राहू, असे सांगितले.

     याप्रसंगी अॅाड.रमेश नागवडे, अनंता गारदे यांनी शुभेच्छा देऊन दोघांचेही अभिनंदन केले. शेवटी सुभाष राऊत यांनी आभार मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

न्यू आर्टस् कॉमर्स महाविद्यालयाची प्रगती अभिमानास्पद  : ॲड.भुषण बऱ्हाटे

          वेब टीम नगर : मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या न्यू आर्टस् कॉमर्स अॅ-ण्ड सायन्स महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना घडवत उच्च पदस्थ केले आहे. आज देशातील कानाकोपर्यां मध्ये विद्यार्थी विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्याी या  मोठ्या महाविद्यालयाला आता स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळविल्याने महाविद्यालयाने केलेली प्रगती अभिमानास्पद आहे. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून याबद्दल मला आनंद होत आहे, असे प्रतिपादन वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड.भुषण बऱ्हाटे यांनी केले.

          शहर वकिल संघटनेच्यावतीने न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांचा अध्यक्ष ॲड.. भुषण बऱ्हाटे यांनी सत्कार केला. तसेच भ्रमणध्वनीवरुन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे व सचिव ॲड.. विश्वासराव आठरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचेही अभिनंदन केले. यावेळी वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष  ॲड.. लक्ष्मण कचरे , केंद्र सरकारचे वकिल सुभाष भोर, ॲड..सुनिल तोडकर आदि उपस्थित होते.

          यावेळी ॲड.. सुभाष भोर म्हणाले, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शतकोत्तर वर्षात अजून एक मानाचा तुरा संस्थेच्या मस्तकी विराजमान झाला आहे. महाविद्यालयाला मिळालेल्या स्वयत्त दर्जामुळे महाविद्यालयाची मोठी प्रगती भविष्यात होणार आहे. संस्थेच्या सल्लागार मंडळावर काम करतांना आनंद होत आहे.

          यावेळी प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांनी वकिल संघटनेने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तरुण पिढीसाठी थोर स्वातंत्रसैनिक सावरकर यांचे विचार प्रेरणादायी

ॲड. जय भोसले : नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदे तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी  साजरी                 

वेब टीम  नगर : थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेले असे जहाल मतवादी क्रांतीकारक होते.देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण असे योगदान आहे.सावरकरांनी भारतमातेसाठी जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा भोगली.देशासाठी प्रखर अशी देशभक्ती त्याच्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा,प्राण तळमळला' या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाप्रति असलेलं प्रेम व्यक्त होतं.आजच्या तरुण पिढीसाठी थोर स्वातंत्रसैनिक सावरकर यांचे विचार प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.जय भोसले यांनी केले.                                                     

नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंगदला तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथीनिमित्त चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड जय भोसले,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे , मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे ,शहर सह मंत्री श्रीकांत नांदापूरकर , निलेश चिपाडे,मुकुल गंधे  प्रकाश भंडारे,उमाकांत जांभळे, मनोहर भाकरे उपस्तिथ होते.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'ते' शासन निर्णय तात्काळ निर्गमीत करण्याची शिक्षक परिषदेची मागणी 

बाबासाहेब बोडखे : स्थानिक विकास निधीसाठी एक कोटीची तरतूद

शिक्षकांप्रति राज्य सरकारची दृष्ट मानसिकता असल्याचा आरोप

वेब टीम नगर : स्थानिक विकास निधीसाठी एक कोटीची वाढ करणार्याद महाविकास आघाडी सरकारने शिक्षकांप्रती असलेली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून २० टक्के वेतन अनुदान व २०टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचे तसेच अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधीसह अनुदानास पात्र घोषित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन आमदार गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

दि.23 फेब्रुवारी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून प्रतिवर्षी रुपये एक कोटीची वाढ करण्यात आली. ही वाढ करताना शासनाला कोरोनाचे संकट आडवे आले नाही. परंतु राज्य मंत्रिमंडळाने तीन वेळा घेतलेले निर्णय, त्या आधारावर निर्गमित केलेले शासन निर्णय, विधिमंडळात मंजूर केलेला निधी या सर्व संविधानिक बाबी पूर्ण झाले असताना शासनाने शिक्षकांना दि.१ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वाढीव अनुदान वितरित करण्याचा शासन आदेश निर्गमित केलेला नाही. तसेच अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधीसह अनुदानास पात्र घोषित घोषित करण्याचा निर्णय घेऊन आदेश निर्गमित केलेला नाही. ही बाब शिक्षकांप्रति शासनाची असलेली दृष्ट मानसिकता सुस्पष्ट करणारी आहे. आमदारांच्या प्रभावाखाली रुपये ३६६ कोटींची तरतूद करणार्याश शासनाची पंधरा ते वीस वर्षापासून विनावेतन काम करणार्यां शिक्षकांना तटपुंजे २० टक्के वेतन अनुदान व२० टक्के वाढीव वेतन अनुदान देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मानसिकता नाही. ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

याबद्दल शासनाचा शिक्षक परिषद व शिक्षक समुदायाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, शिक्षकांप्रती असलेली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून शिक्षकांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी. तर २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचे तसेच अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधीसह अनुदानास पात्र घोषित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, माजी राज्याध्यक्ष बाबासाहेब काळे, मा.आ. संजीवनीताई रायकर, भगवानआप्पा साळूंखे, महिला आघाडी प्रमुख पुष्पाताई चौधरी, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, नरेंद्र वातकर आदींसह राज्यातील पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रांझा पाटील प्रवृत्तीच्या मंत्र्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी जनतेला पुढाकार घ्यावा लागणार 

अॅंड. गवळी  :  दिखाव्यापुरती कारवाई न करता त्यांना मंत्रीपदापासून कार्यमुक्त करावे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदची मागणी

वेब टीम नगर : महाराष्ट्रातील सत्तेत असणारे मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करीत असून, त्यांच्यावर दिखाव्यापुरती कारवाई न करता त्यांना मंत्रीपदापासून कार्यमुक्त करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अॅपड. कारभारी गवळी यांनी दिली.

महाराष्ट्रातील सत्तेत असणारे मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग प्रतिबंधक कायदा१९८८ चा भंग करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गहिनीनाथ गड या दोन्ही ठिकाणी दोन मंत्र्यांनी मोठ्या संख्येने अनुयायी जमा करून मत गंगोत्री प्रदूषित केली. या मंत्र्याविरोधात महिलांवर अन्याय, अत्याचार केल्याचा आरोप आहे. अशा मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेण्याची व या मंत्र्यांनी देखील न्यायालयाच्या चौकशीला तोंड देण्याची गरज होती. न्याय मंदिरात निर्दोष असल्याचे सिध्द होणे जनतेला अपेक्षित होते. मात्र धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव एकत्र करून बडवे-पुजारी यांच्या मदतीने स्वतःला निर्दोष घोषित करण्याचा घाट या मंत्र्यांनी घातला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

कौरव सभेत द्रोपदीचे वस्त्रहरण झाले. सध्या लोकशाहीत अनेक महिलांचे प्राणहरण होत आहे. अशा वेळी रांझा पाटील प्रवृत्तीच्या मंत्र्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी जनतेला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अशा मंत्र्यांमुळे लोकशाहीची मत गंगोत्री प्रदूषित होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर देखील लोकशाही वांझोटी ठरत असून, सर्वसामान्य जनता न्याय, हक्क व विकासापासून वंचित राहत असल्याचे अॅाड. गवळी यांनी म्हंटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्य सरकारी कर्मचार्यांनी पाळला निषेध दिन

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध  

वेब टीम नगर : केंद्र सरकार कोरोना महामारीची ढाल पुढे करुन कामगार विरोधी धोरण राबवित असल्याच्या निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने निषेध दिन पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालया समोर सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करुन, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे, विलास पेद्राम, भाऊसाहेब डमाळे, संदिपान कासार, प्रसाद कराळे, विजय काकडे, रविंद्र तवले आदी उपस्थित होते.  

राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या आर्थिक, सेवा व हक्क विषयक अधिकारांचे जतन करण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गेल्या साठ वर्षापासून केंद्र व राज्य पातळीवर सतत लढा दिला आहे. देशातील २७ राज्यातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचारी या महासंघाच्या छत्राखाली एकसंघ राहिले आहेत. केंद्र शासनाने गेल्या आठ महिन्यात कोरोना महामारीची ढाल पुढे करून कामगार, कर्मचारी विरोधी कायदा अर्थविषयक लाभांचा संकोच व सेवाविषयक बाबतीत कर्मचारी जीवन विरोधी धोरण जाहीर करून कर्मचार्यांरच्या शाश्वयत सेवा जीवनालाच आव्हान देण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला आहे. देशाचा अन्नदाता शेतकर्या‍ला सुद्धा मारक धोरणे लादून देशोधडीला लावण्याचे प्रकार सुरू आहे. फायद्यात असणारे शासकीय उद्योग विक्रीला काढून सुसह्य सामजिक जीवनासाठी आवश्यक असणारी मिश्र अर्थव्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे देशभरातील राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांना तसेच कामगारांना स्वतःच्या अस्तित्वालाच आव्हान मिळाल्याचे चित्र दिसून येते. या भयग्रस्त वातावरणात ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरिता संपुर्ण देशात शुक्रवारी (दि.२६ फेब्रुवारी) कामगार, कर्मचारी व शिक्षक निषेध दिन पाळत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सर्वांना १९८२ जुनी पेन्शन योजना लागू करावी, खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचार्यां च्या सेवा नियमित कराव्यात, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करावे, कामगार कर्मचार्यांजना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करावे, केंद्रीय कर्मचार्यां ना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचार्यां्ना मंजूर करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावी व ही पदे भरतांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट द्याव्या, चतुर्थश्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांयचे प्रलंबित प्रश्नर तात्काळ सोडवावे, वेतनश्रेणी त्रुटी दूर करण्यासंदर्भात बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करावा, अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करावे, दरमहा ७ हजार पाचशे रुपये बेरोजगार भत्ता मंजूर करावा व प्रत्येक गरीब व्यक्तीला दरमहा १० किलो अन्नधान्य पुरवावे, प्रत्येक गरजू व्यक्तीला मनरेगा मार्फत किमान दोनशे दिवसांचा रोजगार मिळेल असे धोरण लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments