योगसाधना
चतुरंग दंडासन
चतुर म्हणजे चार ,अंग म्हणजे अवयव किंवा त्यांचा भाग आणि दंड म्हणजे सोटा
जमिनीवर पालथे झोपा आणि शरीराचा भार तर हातावर आणि पायाची बोटे यावर सांभाळा श्वास सोडा आणि शरीर जमिनीशी समांतर अवस्थेत छोट्या प्रमाणे ताठ ठेवा शरीराला दोन हात आणि दोन पावले हे चार अवयव आधार देतात. पाश्चात्य व्यायामातील 'डिप्स 'या प्रकाराशी या आसनाचे साम्य आहे.
पद्धती :
1) जमिनीवर पालथे झोपा ,तोंड जमिनीकडे असू द्या.कोपरे वाकवा तळहात कमरे नजीक असू द्या.
2) पावले एकमेकांपासून चार फूट अंतरावर असू द्या श्वास सोडा आणि हात व पायाची बोटे यावर भार देऊन शरीर जमिनीवरून चार इंच वर उचला. डोक्यापासून चवड्यांपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीशी समांतर आणि काठी प्रमाणे ताठ ठेवा. गुडघे घट्ट आवळलेले असू द्या. नेहमीप्रमाणे श्वसन करत या स्थितीत रहा.
3) हळूहळू टप्प्याटप्प्याने सबंध शरीर पुढल्या बाजूस ताणा व पायाच्या बोटाच्या वरच्या भागावर पावलाचे वजन येऊ द्या.
4) या स्थितीत नेहमी सारखे किंवा दीर्घ श्वसन करत सुमारे वीस सेकंद राहा या हालचालीची अनेकदा पुनरावृत्ती करण्यास हरकत नाही . नंतर जमीनीवर पडून विसावा घ्या.
परिणाम : या आसनामुळे हातामध्ये शक्ती येते आणि मनगटे लवचिक आणि शक्तिमान बनतात. या आसनामुळे पोटामधील अवयव आकुंचित होतात व सुधारतात.
0 Comments