पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका जाहीर

  पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका जाहीर 

२६ मार्च ते २९ एप्रिल पर्यंत मतदान २ मे रोजी मतमोजणी 

वेब टीम नवी दिल्ली : आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.

निवडणुकांच्या तारखा..

केरळमध्ये एकाच टप्प्यात होणार विधानसभेची निवडणूक, ६ एप्रिल रोजी मतदान २ मे रोजी निकाल

आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार, २७ मार्च,तामिळनाडूमध्ये पण एकाच टप्प्यात निवडणूक, केरळ प्रमाणेच मतदान सहा एप्रिलला तर 2 मे ला निकाल. केरळ आणि तामिळनाडू एकाच दिवशी होणार.पश्चिम बंगलामध्ये आठ टप्प्यात निवडणूक होणार, ७ मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान

तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीच्या निवडणुका एकाच टप्प्यात सहा एप्रिल रोजी, तर आसामची निवडणूक तीन टप्प्यात होणार.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे

पहिला टप्पा - २७ मार्च मतदान,दुसरा टप्पा - १ एप्रिल मतदान,तिसरा टप्पा -६ एप्रिल मतदान,चौथा टप्पा - १० एप्रिल मतदान.,पाचवा टप्पा - १७ एप्रिल मतदानतर पुढील तीन टप्प्यात पश्चिम बंगाल मध्ये मतदान होणार असून शेवटचे मतदान २९ एप्रिल रोजी होईल .यासर्व राज्यांचा निकाल २ मे  रोजी मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. 

पश्चिम बंगालमध्ये आधीपासून निवडणुकीचे वारे वाहत आहे. आज निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात उतरतील. सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी सरकार आहे. मात्र, यावेळी भाजपने २०० हून अधिक जागा आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी मोठ मोठे मेळावे घेण्यात येत आहेत. याखेरीज डाव्या आणि काँग्रेसच्या युतीमुळे बंगालचे राजकारण आणखी रंजक झाले आहे.

१२६ जागा असलेल्या आसाम राज्यात सध्या भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आहे. येथे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत भाजपने येथे ६०जागा जिंकल्या होत्या. यावेळी येथे काँग्रेसही विजयाचा दावा करीत आहे. परंतु, मागील निकाल पाहता काँग्रेस १२२ जागा लढवून केवळ २६जागा जिंकू शकली. येथे सरकार स्थापन करण्यासाठी ६४ जागांची आवश्यकता आहे.

तामिळनाडूमध्ये सत्तेत येण्यासाठी जादुई आकडा११८  आहे. सद्यस्थितीत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम (AIADMK) येथे सरकार चालवत असून पलानीस्वामी हे राज्याचे प्रमुख आहेत. मागील निवडणुकीत एआयएडीएमकेने १३६ जागा जिंकल्या, तर मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने ८९ जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा १८८ जागा आहे.

केरळमध्ये सध्या सीपीआयच्या नेतृत्वाखालील डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकार आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे सरकार चालवल आहेत. मागील निवडणुकीत एलडीएफला ९१ आणि काँग्रेसच्या नेतृत्वात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) ४७जागा मिळाल्या. येथे बहुमतासाठी ७१ जागांची आवश्यकता आहे.

Post a Comment

0 Comments