कोरोना अपडेट - 25-02-2021

कोरोना अपडेट 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज १६८ रूग्णांना डिस्चार्ज तर २७८ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

आतापर्यंत ७३ हजार १११  रुग्ण बरे होऊन परतले घरी : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्के

अहमदनगर: जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००६  इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२७ आणि अँटीजेन चाचणीत ३४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, अकोले ०६, जामखेड ०६, कर्जत ०५, नगर ग्रामीण ०९, पारनेर ०८, पाथर्डी ०२, राहाता १४, संगमनेर २०, श्रीरामपूर १०, मिलिटरी हॉस्पिटल ०१, इतर जिल्हा०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले ०२, कर्जत ०३, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०४,  नेवासा ०५, पारनेर ११, पाथर्डी ०२, राहता १४, राहुरी ०१, संगमनेर ३३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३४ जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, जामखेड १३, कर्जत ०३, नगर ग्रामीण ०२,पारनेर ०४, पाथर्डी ०१,  राहाता ०३, राहुरी ०२, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ३४, कर्जत ०१,  कोपरगाव ११, नगर ग्रामीण १८, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता २४, राहुरी ०६, संगमनेर २१, शेवगाव १०, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना अपडेट 

बरे झालेली रुग्ण संख्या:७३१११
उपचार सुरू असलेले रूग्ण: १००६
मृत्यू:११३४
एकूण रूग्ण संख्या:७५२५१
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

Post a Comment

0 Comments