आईने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला म्हणून मुलाने केली आत्महत्या

 आईने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला म्हणून मुलाने केली आत्महत्या

वेब टीम सातारा : आईने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला म्हणून चिडलेल्या मुलाने घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा तालुक्यातील नागठाणे येथील बाजार परिसरात ही खळबळजनक घटना घडली.

 पंजाबी ड्रेस घालू नको, तर तू साडी नेस असे त्या मुलाने आईला सांगितले, पण तिने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला. यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.शेरू शौकत भोसले (वय -१६) असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागठाणे गावात बाजार परिसरात भोसले कुटुंब राहतं. शेरूची आई घरातच होती. तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. यावेळी शेरूने तू ड्रेस का घातला, साडी नेसली का नाही, असे विचारले. पण तिने साडी नेसायला नकार देत पंजाबी ड्रेसच घातला. यावरून शेरूला राग आला. रागाच्या भरात तो घरातून निघून गेला; नंतर घरातल्या मंडळींनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी घरापासून जवळच असलेल्या एका झाडाला ओढणीच्या साह्याने त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

मुलाने आत्महत्या का केली, याचे कारण समजल्यानंतर बोरगाव पोलिसांना धक्काच बसला. आईने पंजाबी ड्रेस घातला म्हणून मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली. या घटनेचा सहाय्यक फौजदार आर. एल. फरांदे हे तपास करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments