गोरक्षनाथ डोंगरे आणि त्याचे तीन साथीदार हद्दपार

 गोरक्षनाथ डोंगरे आणि त्याचे तीन साथीदार हद्दपार 

वेब टीम नगर : संघटीतपणे टोळीतयार करुन घातकशस्त्रे, रिव्हाल्वर, तलवार, लाकडी दांडके इ. हत्यारे जवळ बाळगून लोकांना धमकावने, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करुन दुखापत व गंभीर दुखापत करणे, अनाधिकाराने  घरात प्रवेश करणे, दरोडा टाकणे, दरोडयाची तयारी करणे, बळजबरीने चोरी करणे, चोरी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणारी राहुरी तालुका परिसरातील हद्दपार टोळीतील टोळीप्रमुख मनोज गोरक्षनाथ डोंगरे, वय २६ वर्ष, रा. कारखाना राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर व टोळीतील इतर ३ सदस्यांना मनोज पाटील, हद्दपार प्राधिकरण तथा, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्हयातुन १वर्ष ६ महिने करीता केले हद्दपार.

दिनांक २७/०७/२०२० रोजी पोलीस निरीक्षक, राहुरी पोलीस स्टेशन यांनी राहुरी तालुका परिसरातील संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुध्द हद्दपारीचा कारवाई व्हावी याकरीता राहुरी पोलीस स्टेशन हद्दपार टोळीप्रस्ताव क्रं ०७/२०२० महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार करुन प्रस्तावामधील ४ इसमाविरुध्द अहमदनगर जिल्हयातुन २ वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

सदर प्रस्तावावर  मनोज पाटील, हद्दपार प्राधिकरण तथा, पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी सदर हद्दपार टोळीविरुध्द राहुरी तालुका परिसरात संघटीतपणे घातकशस्त्रे, रिव्हाल्वर, तलवार, लाकडी  दांडके इ. हत्यारे जवळ बाळगून लोकांना धमकावणे , जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे, मारहाण  करुन दुखापत व गंभीर दुखापत करणे, अनाधिकाराने  घरात प्रवेश करणे, दरोडा टाकणे, दरोडयाची तयारी करणे, बळजबरीने चोरी करणे, चोरी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

सदर संघटीतपणे गुन्हे कारणारी टोळीतील टोळीप्रमुख अ.नं १) मनोज गोरक्षनाथ डोंगरे, बय २६ वर्षे, रा. कारखाना राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर, टोळीसदस्य अ.नं २) स्वप्नील रमेश बोरुडे, वय २७ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी जि. अहमदनगर, टोळीसदस्य अ.नं ३) आबासाहेब बाळासाहेब वरखेडे, वय ३४ वर्ष, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी जि. अहमदनगर व टोळीसदस्य अनं. ४) आदेश ऊर्फ आदिनाथ रविंद्र जाधव, वय २३ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांची राहुरी तालुका परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी तसेच सदर टोळीची सर्वसामान्य नागरीकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी तसेच टोळीच्या गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सदर टोळीचे टोळीप्रमुख व टोळीतील नमुद ३ सदस्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार कारवाई करुन १ वर्ष ६ महिने करीता संपूर्ण अहमदनगर जिल्हा हद्दीतुन दिनांक १६/०२/२०२१ रोजी हद्पारीचा अंतिम कारवाई करुन खालीलप्रमाणे हद्पारीचा आदेश पारित केला आहे.

Post a Comment

0 Comments