आता झेड पी ची सर्वसाधारण सभा ऑनलाईन

 आता झेड पी ची सर्वसाधारण सभा ऑनलाईन  

वेब टीम नगर : राज्यासह जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे तसेच सध्याच्या  स्थितीला जिल्ह्यात कोरोना बाधित आकडेवारीही वाढू लागली असल्याने कोरोनामुळे गेल्या वर्षभर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात झालेली नाही मध्यंतरी करोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने सभागृहात बैठका घेण्यास परवानगी दिली.  त्यामुळे २६ फेब्रुवारीला होणारी सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केली होती.  परंतु दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई केली असल्याने तसेच सभेला ५० पेक्षा जास्त जणांना उपस्थित राहण्यास निर्बंध घालण्यात आले असल्याने २६ तारखेला होणारी सर्वसाधारण सभा पूर्वीप्रमाणेच व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे होणार असल्याचा निर्णय अध्यक्ष राजश्री घुले व सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी यांनी घेतला आहे.  जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या तालुक्यातील 

पंचायत समिती कार्यालयातून या सभेत सहभागी व्हावे असे या निर्णयात म्हटले आहे. Post a Comment

0 Comments