आरोग्य आहार : मेथी भाजीचा [तिखट] केक...

 आरोग्य आहार 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेथी भाजीचा [तिखट] केक...

साहित्य  : 

१ मेथीच्या जुडीची पाने,कोवळ्या दांड्या असल्या तर चालतील..धुवुन जाडसर चिरुन घ्यावी..

१ कप जाड रवा,३/४ कप बेसन,१ कप तेल,१ कप दुध,१ कांदा बारीक चिरलेला,१ टिन क्रीम स्टाईलअमेरिकन कॉर्न,

(अमेरिकन कॉर्न थोडया दुधात वाफवुन घेतले तरी चालेल )हिरवी मिरची+आले वाटुन केलेली पेस्ट ३ चमचे(मिरचीचा तिखटपणा व आपली आवड त्याप्रमाणे),मीठ चवीनुसार,हळद १ टी स्पुन, १ टी स्पुन बेकिंग पावडर, २ टी स्पुन साखर,१ कप काजु+बदाम तुकडे(भरपुर हवे),

किसलेले सुके/ओले खोबरे अर्धी वाटी( केक बेक करण्याआधी वरुन पेरायला)

कृती: 

एका मोठया बाऊल मधे तेल,दुध,मिरची-आले पेस्ट,मीठ, साखर ,हळद घालुन मिश्रण ढवळुन घ्यावे..आता कांदा,रवा,बेसन व बेकिंग पावडर घालुन मिक्स करा.काजु-बदाम व मेथीची भाजी,कॉर्न घालुन मिक्स करा.बेकिंग ट्रे ला [मोठा ]केक टिन चालेल] तेलाने कोटींग करुन घ्या..त्यात केक मिश्रण टाकुन चमच्याने नीट एकसारखे पसरवुन घ्या..वरुन खोबरे किस पेरा..अगदी हलक्या हाताने किस चिकटेल इतपत दाबा ..ओव्हन मधे ३५० फॅ.वर सधारण ४५ मिनिटे ते एक तास पर्यंत बेक करा. थंड झाल्यावर वडयांच्या आकारात कापा..

Post a Comment

0 Comments