नगर बुलेटीन 24-02-2021

 नगर बुलेटीन 24-02-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अतुलनीय 

किरण काळे  : पुण्यतिथी निमित्त अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्यावतीने अभिवादन कार्यक्रम

वेब टीम नगर : देशाचे पहिले शिक्षणमंत्री, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष स्व. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान हे अतुलनीय आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळे बोलत होते. अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख होते. 

यावेळी काळे म्हणाले की, मौलाना कलाम यांनी महात्मा गांधी यांच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केले. खिलाफत चळवळ उभी केली. गांधीजींच्या असहकार चळवळ मध्ये सहभागी होत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अग्रभागी राहिले. त्यांचे स्वातंत्र्य सेनानी म्हणून कार्य अतुलनीय आहे.

अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष अज्जूभाई शेख म्हणाले की, मौलाना कलाम आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील काम मोठे आहे. त्यांच्या रूपाने मुस्लिम समाजाला देश पातळीवर शिक्षणासारख्या महत्त्वाच्या मंत्रिपदाची पहिली संधी मिळाली होती. मुस्लिम समाजाला त्यांच्या गौरवशाली कार्याचा अभिमान आहे. 

यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा सचिव अन्वर सय्यद, शरीफ सय्यद, सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, इम्रान बागवान, वाहिदभाई शेख, शाहीन बागवान, शेख परविन, निखत शेख, सादभाई शेख, रजिक कुरेशी, वजीर शेख आदींसह अल्पसंख्यांक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवाजीराव कर्डिले यांचा सर्वसामान्यांच्या प्रश्नां-साठी नेहमीच पुढाकार

प्राचार्य चौगुले : जिल्हा बँकेचे नूतन संचालक शिवाजीराव कर्डिले यांचा राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने सत्कार

  वेब टीम  नगर : अहमदनगर जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याबद्दल  त्यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व प्राचार्यां च्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाणेश्वदर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक नेते प्राचार्य चंद्रकांत चौगुले, शिवाजीराव केदार, संपत झावरे, गुंजाळ सर आदी उपस्थित होते.

     याप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत चौगुले म्हणाले, शिवाजीराव कर्डिले यांनी जनसामान्यांच्या प्रश्नां साठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मातीशी नाळ जुळलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. अभ्यासूपणे सर्वांचे प्रश्ना समजावून घेऊन ते सोडविले आहे. शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या प्रश्नांनबाबत त्यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे अनेक प्रश्नेही मार्गी लागले आहेत. जिल्हा बँकेत दिलेल्या योगदानामुळेच त्यांची पुन्हा  जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे. त्यांची यापुढे अशीच घौडदौड सुरु राहील, अशा शुभेच्छा दिल्या.

     सत्काराला उत्तर देतांना शिवाजीराव कर्डिले म्हणाले, मी पदापेक्षा कामांना महत्व देतो. सर्वसामान्यांचे कामे झाली पाहिजे, त्यांचे प्रश्नर सुटले पाहिजे यासाठी आपण काम करतो. जिल्हा बँक ही शेतकर्यांाची कामधेनू असल्याने शेतकर्यांजची उन्नत्ती व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्वांच्या सहकार्याने आपणास हा विजय मिळला असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर महाविद्यालयाच्या  डॉ.राळेगणकर व डॉ.लामरुड यांच्या शोध निबंधास प्रथम पारितोषिक

    वेब टीम  नगर : नागपूर विद्यापीठ व अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रिसेंट अॅ डव्हान्सेस इन मटेरियल सायन्स आणि नॅनो टेक्नोलॉजी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत अहमदनगर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सचिन राळेगणकर (पदार्थ विज्ञान विभाग) व प्रा.डॉ.प्रसाद लामरुड (वनस्पतीशास्त्री विभाग) यांच्या शोध निबंधास सर्वोत्तम शोध निबंधाचे प्रथम पुरस्कार मिळाला.

     या ई- परिषदेमध्ये भारतासह जर्मनी, रशिया, पोलंड, स्पेन, चीन, सिंगापूर, इजिप्त, दुबई, स्वीडन आदि देशातील १६५ च्या पेक्षा अधिक संशोधकांनी सहभागी होऊन आपले सादरीकरण केले होते.

     या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचे कौतुक करुन अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ.प्रविण मोरे उपस्थित होते. प्रा.राळेगणकर व प्रा.लामरुड यांचे उपप्राचार्य डॉ.अरविंद नागवडे, डॉ. बी.एम.गायकर, डॉ. सय्यद रज्जाक, रजिष्टार अरुण बळीद आदिंसह प्राध्यापकांनी अभिनंदन केले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रभाग 2 मध्ये नगरसेवकांच्या समन्वयाने तीन कोटींची कामे

 सुनिल त्र्यंबके : सूर्यनगर, एसटी कॉलनीत ड्रेनेज कामाचा शुभारंभ

     वेब टीम नगर :  वाढत्या वसाहतीबरोबरच नागरिकांचे प्रश्नज वाढतात. प्रभाग दोन हा सर्वात मोठा असल्याने आमच्या या प्रभागात चारही नगरसेवकांच्या समन्वयाने तीन कोटींची कामे मंजूर झाली असून, अनेक कॉलनीतील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची फेज - 2 लाईन, ड्रेनेजची कामे झाली असून, येत्या महिन्याभरात प्रभागात विकासाची गंगा वाहताना दिसेल, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

     तपोवन रोड, सूर्यनगरमधील एसटी कॉलनीतील बंद पाईप गटार  कामाचा शुभारंभ उद्योजक राजू बुधवंत यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्र्यंबके बोलत होते. यावेळी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, पांडूरंग दरंदले, डॉ.दिपक दरंदले, पवन काळे, सचिन गाडे, अफझल भाई, उस्मान सय्यद, नासीर सय्यद, अनिकेत गवळी, प्रविण कोहोक, संदिप वाघमारे, राजू शहाणे, राजेेंद्र गाडे आदि उपस्थित होते.

     नगरसेवक सुनिल त्र्यंबके पुढे म्हणाले, नागरिकांशी रोजचा असलेला संपर्क व आम्हा नगरसेवकांची एकी यामुळे प्रभागात सर्वच प्रश्न  मार्गी लावले जात आहे. फेज-2 च्या कामामुळे लवकरच पाण्याचा प्रश्नम सुटेल. रस्त्याच्या डांबरीकरणापूर्वी  ड्रेनेजची कामे सुरु आहेत. या कामासाठी नागरिकांनीही सहकार्य केले. स्वत:हून दारासमोरील ओटे काढल्याने कामात अडचण आली नाही. सर्वांच्या सहकार्यामुळे प्रश्न  सुटतात, असे ते म्हणाले.

     यावेळी सविता काळे, शैला काळे, शारदा विधाते, संतोषी गवळी, कुसूम कुंद, रेणुका गाडे, निर्मला वाघ, संगिता बारवेकर, ज्योती वाघमारे, वंदना दरंदले, उर्मिला उपाध्ये, पाठक काकू, पालवे ताई आदिंसह महिला, नागरिक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निरंकारी मंडळातर्फे बाबा हरदेव सिंहजी जन्मदिवस वृक्षारोपणाने साजरा

    वेब टीम  नगर : निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या ६७ व्या जन्मदिनी  संत निरंकारी मिशनतर्फे दि.२१ ते २३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान देश-विदेशात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रत्येक निरंकारी परिवाराने जास्तीत जास्त रोपे लावून त्याचे तीन वर्षांपर्यंत संगोपन व संरक्षण करावे, हा अभियानाचा उद्देश असून, बाबा हरदेव सिंहजी महाराजांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण साकार करावे, असे आवाहन करण्यात आले.

     विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने संत निरंकारी मंडळाच्या नगर शाखेच्या वतीने मिस्कीन रोड, गुलमोहोर रोड, सावेडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या वृक्षांचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली. निरंकारी सेवा दलचे क्षेत्रीय संचालक आनंद कृष्णानी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी निरंकारी सेवादलच्या महिला व पुरुष सदस्य तसेच सत्संग सदस्य, अबालवृद्ध उत्साहात या अभियानात सहभागी झाले होते.

     यावेळी निरंकारी भवन परिसरात ज्येष्ठ नागरिक सिंगासनी देवी यांच्या हस्ते व गुलमोहोर रोड परिसरात ज्येष्ठ महिला निर्मलादेवी टकले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातही निरंकारी भक्तांनी आपआपल्या भागात वृक्षारोपण केले. यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन व सेवा दल च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 रस्ता डांबरीकरण करण्याबाबतचे आ.संग्राम जगताप यांना नागरिकांचे निवेदन                                                                                                                
                               

वेब टीम नगर : गणेशनगर हा परिसर अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे.गणेशनगर जवळच संजय सोसायटी,विणकर सोसायटी,शांतीनगर व रायगड हाइट्स इत्यादी ठिकाणे आहेत.सुमारे पाचशे कुटुंब वास्तव्य करून राहत असून अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत.गणेश नगर येथील रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत. सर्वांना जाण्यासाठी गणेशनगर मधील मुख्य रस्ता हाच एकमेव रस्ता आहे.येथील रहिवाशांना व शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना सतत या रस्त्याचा वापर करावा लागतो.खराब रस्त्यांमुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून चालावे लागते. आ.संग्राम जगताप यांनी स्थानिक विकास निधीतून मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून द्यावेत अशी मागणी गणेशनगर परिसरातील रहिवाशांची आहे.                                                    

    कल्याणरोड येथील  गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून मिळणे बाबत आ.संग्राम जगताप यांना गणेशनगर परिसरातील स्थानिक नागरिकांकडून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गणेशनगर सोसायटीचे चेअरमन गणेश शिंदे,अनिल राऊत,अतुल वामन,सदाभाऊ शिंदे,सागर शिंदे,मनोज कुंजीर,सुबोध कुलकर्णी,राजेंद्र ताकपेरे,राजू वाळके,महेश शिरसुल,महेश रसाळ,आण्णा   जंगम,अशोक तावरे,गणेश मंचिकटला,नाना देवतरसे,उमेश गोरे,विकी सुपेकर,धर्मनाथ घोरपडे, विशाल माने,वाघस्कर,पोपट शेळके,महादेव जगताप,गरड ,नितीन गाली,राजकुमार शिंदे,राजू तेल्ला,संतोष लयचेट्टी,गागरे,पिसाळ,ढोले आदी उपस्थित  होते.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भूमीगुंठा योजनेतंर्गत स्मॉल इंडस्ट्री फ्रॉम होम योजनेचा प्रस्ताव 

शिवाजी महाराजांचा विसर पडल्यामुळेच स्वतंत्र्योत्तर काळात भ्रष्टाचार, अत्याचार, अनागोंदी माजली 

अॅवड. गवळी : भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी जिजाऊ शिव जाणिव जागरण कार्यक्रम जारी

वेब टीम नगर : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने नव्या पिढीत राजमाता जिजाऊंच्या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडविण्यासाठी जिजाऊ शिव जाणिव जागरण कार्यक्रम जारी करण्यात आला. तर भूमीगुंठा योजनेतंर्गत स्मॉल इंडस्ट्री फ्रॉम होम योजनेचा प्रस्ताव हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित मांडण्यात आला. 

प्रारंभी दिवंगत न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अॅ्ड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, पोपट भोसले, कारभारी वाजे, बळीराम पाटोळे, नंदाबाई साबळे, दत्तात्रय वाजे, किशोर शेरकर, नाना चौरे, फरिदा शेख, पद्मा झेंडे, शोभा चोभे, अंबिका जाधव आदी उपस्थित होते.

आत्मनिर्भर भूमी गुंठा योजनेअंतर्गत स्मॉल इंडस्ट्री फ्रॉम होम अशी योजनेचा प्रस्ताव संघटनेच्या वतीने मांडण्यात आला. तर या संघटनांनी आज जारी केली आत्मनिर्भर घरकुल आणि आत्मनिर्भर रोजगार यासाठी नगर एमआयडीसी शेजारी असलेल्या निंबळक येथील सर्वे नंबर ५४ मध्ये घरकुलांसाठी ८० हजारात रुपयात एक गुंठा तसेच घराशेजारी स्मॉल इंडस्ट्री उभी करण्यासाठी दुसरा भूमी गुंठा देखील ८० हजार रुपयात उपलब्ध करुन देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. एकाच ठिकाणी राहण्यासाठी निवारा आणि त्याच ठिकाणी रोजगार अशा दोन्ही प्रश्नय मार्गी लावून घरकुल वंचित सक्षम होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

नवीन पिढी शिवाजी महाराजांच्या विचाराने व संस्काराने मार्गक्रमण करीत नसल्याने अनेक प्रश्ना त अडकली आहे. नव्या पिढीत शिवाजी महाराजांसारखे संस्कार रुजविण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराजांवरील लिहिलेल्या ऐतिहासिक पुस्तकावर आधारित जिजाऊ शिव जाणीव जागरण कार्यक्रम जारी करण्यात आला. शाहीर व लोककलाकारांच्या माध्यमातून जिजाऊ शिव जाणीव जागरण कार्यक्रम कार्यान्वीत केला जाणार आहे.  

अॅकड. कारभारी गवळी म्हणाले की, रेशनकार्डवर घरकुल देण्याची सत्ताधारी भाजप सरकारची कुवत नाही. देशातील सुशिक्षित बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही. घरकुल वंचितांना स्मॉल इंडस्ट्रीच्या माध्यमातून रोजगार चालणा देण्याच प्रयत्न आहे. तर नवीन पिढी सुसंस्कारीत घडण्यासाठी जिजाऊ शिव जाणिव जागरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांसारखा आदर्श राज्यकर्ता आणि शासक आजपर्यंत झाला नाही. शिवाजी महाराजांचा विसर पडल्यामुळेच स्वतंत्र्योत्तर काळात भ्रष्टाचार, अत्याचार, अनागोंदी माजली असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाबासाहेब धीवर यांना राज्यस्तरीय  शिवछत्रपती समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान

     वेब टीम नगर :  संगमनेर येथील संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने देण्यात येणार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार 2021’ नुकताच नगर तालुक्यातील कौडगांवचे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब धिवर आ.सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, विधानसभेचे अध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, आ.डॉ.सुधीर तांबे, पद्मश्री राहिबाई पोपरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार निकम, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वार सानप, सचिव गोरख भवर, प्रा.अनिल धिवर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी ना. बाळासोहब थोरात म्हणाले, संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या उन्नत्तीसाठी काम करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न  सुटले पाहिजे, यासाठी शासन काम करत आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांनीही शासनाच्या योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. आज पुरस्कार प्राप्त खर्याब अर्थाने सर्वसामान्यांची सेवा करत आहेत. त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे, असे सांगितले.

     यावेळी बाबासाहेब धीवर यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे आपण सर्वसामान्यांसाठी काम करत आहोत. या कार्यात योगदान देणार्याब सर्वांचा पुरस्कार रुपाने गौरव झाला असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

     बाबासाहेब धीरव यांना मिळालेल्या राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती समाजरत्न जीवन गौरव पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ॲड. रमेश झरकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा हिंदसेवा मंडळास अभिमान 

 संजय जोशी : ८५ व्या वाढदिवसानिमित्त  अभीष्टचिंतन

वेब टीम नगर : स्थापनेचे शतक पूर्ण केलेल्या हिंदसेवा मंडळाच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थांना दर्जेदार ज्ञानदान करणारी हिंदसेवा मंडळ ही जिल्ह्यातील मोठी शैक्षणिक संस्था आहे. ॲड. रमेश झरकर हे संस्थेच्या प्रगतीसाठी गेल्या ४५ वर्षापासून तनमनधनाने भरीव योगदान देत आहेत. त्यांच्या माध्यमातून कर्जत मधील शाळांमधून विद्यार्थ्यांना चांगल्या सोईसुविधा मिळत आहेत. ॲड. रमेश झरकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा हिंदसेवा मंडळास अभिमान आहे, असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केले.

      हिंदसेवा मंडळाचे जेष्ठ संचालक ॲड. रमेश झरकर यांच्या ८५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात संस्थेच्या वतीने ॲड. रमेश झरकर यांना सचिव संजय जोशी यांच्या हस्ते विशेष मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. मधुसूदन मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यध्यक्ष अजित बोरा, भाईसथ्था नाईट स्कूलचे अध्यक्ष  डॉ.पारस कोठारी, मराठी शाळेचे अध्यक्ष  मधुसूदन सारडा, पाटणी विद्यालयाचे अध्यक्ष  अनिल देशापांडे, खटोड विद्यालयाचे अध्यक्ष  अशोक उपाध्ये, रणजीत श्रीगोड, दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष ॲड. सुधीर झरकर आदींसह शिक्षक व विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.

      यावेळी सत्कारास उत्तर देतांना ॲड. रमेश झरकर हे भावनावश झाले, ते म्हणाले, हिंदसेवा मंडळाच्या कारभारात स्वतःला झोकून देत मी काम केले आहे. संस्थेने मानपत्रा देवून केलेल्या सन्मानामुळे मी भारावून गेलो आहे.

      यावेळी सुरेश खेतमाळस, शरद गोखले, सचिन मुळे, विठ्ठल उरमुडे, कल्याण लकडे, अधिक जोशी, विलास साठे आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

येणार्या  काळात नगर शहर विकसीत शहर म्हणून ओळखला जाणार

आ.संग्राम जगताप : केडगाव, मोहिनी नगरला बंद पाईप गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ

वेब टीम नगर : केडगाव, मोहिनी नगर येथील शिक्षक व कायनेटिक कॉलनीतील बंद पाईप गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी पुणे महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा व महानंदाच्या माजी अध्यक्षा  वैशाली नागवडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक गणेश नन्नवरे, राहुल कांबळे, बहिरू कोतकर,  निंबाळकर, गोडकर, शरद खरात, बाबा औशिकर, प्रसाद आंधळे, काळे सर, बच्चन कोतकर, अजित कोतकर, विजय सुंबे, अॅोड. भोट, सचिन भोसले, अशोक गदादे, नाथा कोतकर, अशोक तांबे, अविनाश विधाते, विजय सुंबे, रानडे, कुलट, आयरेकर आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.                  

आ. संग्राम जगताप म्हणाले की, केडगाव, मोहिनी नगर भागात अनेक दिवसांपासून ड्रेनेजचा प्रश्नज प्रलंबीत होता. सदर कामाचा पाठपुरावा करुन नगरसेवक मनोज कोतकर यांनी सदर कामाला गती दिली. शहराचा व उपनगराचा झपाट्याने विकास होत असताना लोकवस्ती देखील वाढत आहे. येणार्याी काळात नगर शहर विकसीत शहर म्हणून ओळखला जाणार. हे व्हिजन ठेऊन विकासात्मक दृष्टीने वाटचाल सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 शहरातील उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव द्यावे

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची मागणी

वेब टीम नगर : शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून, या पुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, ताज खान, शहानवाझ शेख, सुफीयान शेख, सुजात दिवटे, नयना शेलार, सरफराज कुरेशी, शाहरुख शेख, वसीम शेख, सोहेल सय्यद आदी उपस्थित होते.

पुणे, नाशिक, औरंगाबाद शहराच्या धर्तीवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत असावी, या हेतूने शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. अहमदनगर शहराला दिडशे वर्षांपुर्वीचा ऐतिहासिक वारसा लाभला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास अहमदनगरशी जोडला गेलेला आहे. शिवाजी महाराज हे सर्व समाजाची अस्मिता व भूषण आहे. शहरातील सदरील उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे प्रशासकीय स्तरावर नामकरण होणे हे प्रत्येक नगरकरांची इच्छा आहे. या उड्डाणपूलास कोणत्याही राजकीय पुढार्यांरचे नाव देण्यात येऊ नये. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने स्थानिक शहरवासियांच्या मागणीचा विचार करून शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रुईछत्तीसी जनता विद्यालयातील शिक्षकास मारहाण

शिक्षक संघटनांच्या वतीने निषेध : आरोपीस अटक करुन कारवाई करण्याची मागणी

वेब टीम नगर : रुईछत्तीसी (ता. नगर) येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवून, शिक्षकांना मारहाण करणार्या् आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व इतर शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांना देण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, दत्तापाटील नारळे, शिरीष टेकाडे, संजय कोतकर, प्राचार्य पी.एस. गोरे, सुनिल म्हस्के, बद्रीनाथ शिंदे, आशिष आचारी, दिनकर मुळे, भाऊसाहेब जिवडे आदींसह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मंगळवार दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी रुईछत्तीसी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डी.जी. महारनवर व कोरके यांना गावातील विकास खाकाळ यांनी मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. दुपारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविला. तर शिक्षकांना मारहाण करणार्याक आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

अवतार मेहेरबाबा कामगार युनियन : महागाईचा विचार करुन पगारवाढ देण्याची मागणी

ट्रस्टने देऊ केलेली तोकडी पगारवाढीचा प्रस्ताव कामगारांनी फेटाळला

वेब टीम नगर : आयुक्त कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांचे वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे सुरु असून, विश्वतस्त अत्यल्प पगारवाढ देत असल्याचा आरोप करुन विश्वणस्तांनी देऊ केलेली पगारवाढ कामगारांनी फेटाळली.वाढती महागाई, कोरोना महामारीमुळे ओढवलेले आर्थिक संकटामुळे कामगारांचे अत्यल्प पगार असल्याने दरमहा चार हजार पाचशे तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा पाच हजार पाचशे रुपये पगारवाढ देण्याची मागणी केली. यावेळी लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅहड. कॉ. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च २०२० मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. कोरोना महामारीचे व इतर कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सात ते आठ तारखा झाल्या. यापैकी मोजक्या तारखांना विश्वुस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा एक हजार चारशे पहिल्या वर्षीसाठी, दुसर्या  वर्षी दोन हजार आठशे व तीसर्याव वर्षी चार हजार दोनशे अशा टप्प्याटप्यांनी वाढ देण्यास सहमती दर्शवली. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसल्याने कामगारांनी ट्रस्टचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे जिल्हा परिषद समोर उपोषण

जिल्ह्यासह राज्यातील संगणक परिचालकांचा सहभाग

वेब टीम नगर : ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारींचा दर्जा देऊन १५ हजार किमान वेतन देण्यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर सुनिता वाणी व सोनू तिरमारे यांच्यासह संगणक परिचालकांनी आमरण उपोषण केले. या उपोषणात निवृत्ती गायकवाड, इमरान शहा, नारायण मोटे, राकेश चिमनकर, यशवंत पोटे, विकास शिंदे, प्रविण वाघ, रामचंद्र मरकड, वैशाली देशमुख, गीता भोसले, कल्पना भूसारे आदींसह जिल्ह्यातील व राज्यातील संगणक परिचालकांनी उपोषणात सहभाग नोंदवला.

सन २०११सालापासून संगणक परिचालक कार्यरत असून, सेवा देत आहे. संगणक परिचालकांना अत्यंत तटपुंजे असून, ते वेळेवर देखील मिळत नाही. कंपनीचे ठेकेदार कडून कायमची पिळवणूक होत असते. ग्रामपंचायत कडून ठेकेदार एक रकमी चेक घेतात, मात्र त्यातली पुर्ण रक्कम संगणक परिचालकांना मिळत नसल्याचा आरोप संगणक परिचालकांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती असून, हा प्रकार अकरा वर्षापासून सुरू आहे. ही बाब शासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरी देखील शासनाकडून सदर प्रश्नीे संगणक परिचालकांना न्याय मिळालेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

संगणक परिचालकांना महिन्याचे मानधन विशिष्ट तारखेला अदा करण्यात यावे, कामाची शाश्वहती देण्यात यावी, संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचार्यांिचा दर्जा देण्यात यावा, संगणक परिचालकांना१२ ते १५ हजार रुपये पर्यंत मानधन देण्यात यावे, विनाकारण कामावरून कमी करण्यात आलेल्या संगणक परिचालकांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील डाटा ऑपरेटरांना संगणक परीचारकाप्रमाणे न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments