कोरना अपडेट २४-०२-२०२१

कोरना अपडेट  २४-०२-२०२१ 

आज १७४ रूग्णांना डिस्चार्ज तर १७६ नव्या बाधितांची रुग्ण संख्ये भर

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ९४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८९८  इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११४ आणि अँटीजेन चाचणीत १३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०७, पारनेर ०६, शेवगाव ०८, मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, अकोले ०५, कर्जत ०३, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ०३,  पारनेर ०३, पाथर्डी ०५, राहता ०७, राहुरी ०१, संगमनेर ३१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, नेवासा ०१,पारनेर ०१,  राहाता ०३, राहुरी ०६, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, अकोले ०१, जामखेड ०३, कर्जत ०१,  कोपरगाव ०९, नगर ग्रामीण २६, नेवासा ०१,  पारनेर १७, पाथर्डी ०६, राहाता २५, राहुरी ०८, संगमनेर २०, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना अपडेट

बरे झालेली रुग्ण संख्या:७२९४३

उपचार सुरू असलेले रूग्ण: ८९८

मृत्यू:११३२

एकूण रूग्ण संख्या:७४९७३

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

Post a Comment

0 Comments