मुलगाच ठरला बापाचा काळ

 मुलगाच ठरला बापाचा काळ 

वेब टीम नागपूर: नागपुरातील भालदरपुरा येथे धक्कादायक घटना घडली. राहते घर विकले म्हणून चिडलेल्या मुलाने ७३ वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केली. आज, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरातील गणेश पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदरपुरा येथील मोहम्मद अली चौकात मुलानेच जन्मदात्या वडिलांची हत्या केली. शेख युसूफ मेहबूब शरीफ (वय ७३) असे मृताचे नाव आहे. युनूस (वय ५०) असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याने युसूफ यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मुलगा युनूस आणि शेख युसूफ शेख मेहबूब शरीफ यांच्यात घर विकल्याचा कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. युनूसने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाली असता, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. जखमी झाल्याने युसूफ यांचा मृत्यू झाला होता. याबाबत मृताची मुलगी रुकसाना परवीन शरीफ पठाण (वय ३५) हिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी युनूसविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments