कोरोना रुग्णांच्या पैश्यासाठी ५मार्च पासून माणसे रस्त्यावर उतरणार

 कोरोना रुग्णांच्या  पैश्यासाठी ५मार्च पासून माणसे रस्त्यावर उतरणार 

वेब टीम नगर : कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या खाजगी हॉस्पिटल मधील वाढीव रक्कमेची बिलांची शासन नियमांप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्यांच्या समिती मार्फत तपासणीअंती वसूल पात्र रक्कम खाजगी हॉस्पिटल कोरोना रूग्णांना देत नसल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलने झाली . शरद पवार यांच्या दौऱ्यात मनसेने  या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना फलक दाखविण्यात येणार होते परंतु जिल्हाधिकारी व मनसे तसेच पोलीस अधीक्षक यांच्या मध्ये बैठक होऊन एक महिन्याच्या आत खाजगी हॉस्पीटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना त्यांच्या वाढीव बिलांची रक्कम आम्ही परत मिळवुन देऊ असा शब्द दिला होता.

परंतु तो पाळताना जिल्हाधिकारी  दिसत नसून महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्या प्रमाणेच उलट त्या लुटमार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे पक्षाचे अध्यक्ष तसेच महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक खा.  शरद पवार यांना देखील या संबंधी निवेदन दिले व त्यांनी सुध्दा या संबंधी आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी देखील दिलेला शब्द पाळताना दिसत नसल्यामुळे त्यांनी सुध्दा  जिल्हाधिकारी यांच्या प्रमाणे अहमदनगर मधील गोरगरीब जनतेचा विश्वास घात केला आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात खाजगी हॉस्पिटल मधील कोरोना रुग्णांची वाढीव बिलांची वसूल पात्र रक्कम त्या त्या रुग्णांना संपुर्ण महाराष्ट्रात परत मिळते. मग अहमदनगर जिल्ह्यातच ही  वाढीव बिलांची रक्कम परत का मिळत नाही? हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व जनतेचा  सवाल आहे. त्यातच पुन्हा कोरोना रुग्ण वाढत चालले असुन सरकारी यंत्रणा ही परिस्थिती हाताळण्यात सक्षम नसल्यामुळे पुन्हा सर्वसामान्य जनतेला खाजगी हॉस्पिटल लाखो रुपयांचे बिले भरावे लागणार असल्यामुळे मागच्या सारखी खाजगी हॉस्पीटल मध्ये कोरोना रुग्णांची लुटमार होऊ नये म्हणुन तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना वाढीव बिलांची रक्कम परत खाजगी हॉस्पिटल कडून परत मिळुन दिली नसल्यामुळे मनसे ५ मार्च पासुन रोजी कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना वाढीव बिलांची रक्कम परत मिळण्याकरिता रस्त्यावर उतरणार असल्याचा ईशारा मनसेने नितीन भूतारे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.

या वेळी मनसेने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत महिला जिल्हाध्यक्ष ॲड.  अनिता दिघे , तसेच रस्ते आस्थापना चे जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसे उपशहराध्यक्ष व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मनसेने नितीन भुतारे यांनी दिली आहे.(फोटो-  भुतारे )

Post a Comment

0 Comments