वांबोरीत जुगार अड्ड्यावर छापा
१ लाख ३ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ४ आरोपी ताब्यात
वेब टीम नगर : आज दि. २३/०२/२०२१ रोजीपोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत वांबोरी येथील कुसमुडे वस्ती जवळ काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपी क्र. १) संतोष नवनाथ कुसमुडे वय ३४ वर्ष रा. कुसमुडे वस्ती वांबोरी ता. राहुरी २) राहुल सतीश नन्नवरे वय २१ वर्षे रा.राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी ३) शंकर सुखदेव कात्रज वय ३८ वर्षे रा. गडाख वस्ती वांबोरी ता. राहुरी४) किरण राजेंद्र कुसमुडे रा. राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी यांचेसह १,०३,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य दोन आरोपी फरार असून सर्व आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. १७७/२०२१ मुंबई जुगार कायदा कलम १२( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, डॉ. दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक ,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.
0 Comments