योगसाधना

 योगसाधना

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शलभासन (एक) 

शलभ  म्हणजे टोळ  जमिनीवर बसलेल्या टोळा प्रमाणे  आसनामध्ये शरीर दिसले म्हणून हे नाव दिले आहे. 

 पद्धती : 

१)  जमिनीवर सरळ पालथे झोपा चेहरा जमिनीकडे असू द्या.  हात पाठीमागे लांबवा. 

२) श्वास सोडा आणि एकाच वेळी डोके, छाती व पाय जमिनीवऋण जास्तीत जास्त वर उचला.हात आणि बरगड्या जमिनीवर टेकलेले असता कामा नयेत शरीराचा फक्त पोटाचा भाग जमिनीला टेकले ला असेल आणि शरीराचा भार त्याच भागावर असेल. 

३) कमरेचा भाग आकुंचित करा आणि मांडीच्या स्नायूंना ताण द्या दोन्ही पूर्णपणे ताणलेले आणि सरळ ठेवा मांड्या ,गुडघे आणि घोटे एकमेकांशी जुळलेले असू द्या.  

४) शरीराचा भार  हातावर घेऊ नका पाठीच्या वरच्या भागातील स्नायुंना व्यायाम घडावा या साठी हात मागच्या दिशेला पूर्णपणे राहू द्या. 

५) नेहमीप्रमाणे श्वसन करत शक्य तितका अधिक वेळ या स्थितीत राहावे .  

६) प्रारंभी छाती आणि पाय जमिनीवरून उचलून धरणे कठीण जाते . परंतु पोटाचे स्नायू सशक्त होत जातील तसतसे ते सोपे बनते. 

 परिणाम : या आसनामुळे पचनाला मदत होते.  जठर विषयक त्रास कमी होतात . आणि वातरोग नाहीसा होतो.पाठीचा कणा ताणला गेल्यामुळे लवचिक बनतो आणि त्रिकास्थीजवळच्या व कंबरेजवळचा वेदना या आसनांमुळे थांबतात . कण्यातील चकत्या सरकलेल्या  व्यक्तींना सक्तीची विश्रांती किंवा शस्त्रक्रिया यांची आवश्यकता न लागता हे आसन नियमित पणे करण्यामुळे फायदा होतो असा माझा अनुभव आहे. या आसनामुळे  मूत्राशय आणि प्रॉस्टेट ग्रंथी यांना निकोप पणा लाभतो. 

 पाठीच्या खालच्या भागातील कळा कमी करण्यासाठी एक वेगळा प्रकार करून पाहता येईल, या प्रकारात पाय गुडघ्याशी  वाकवले जातात.  मांड्या एकमेकींपासून दूर ठेवल्या जातात आणि नडग्या जमिनीशी काटकोनात ठेवल्या  जातात. मग श्वास सोडून मांड्या जमिनीवरून उचलला जातात आणि गुडघे एकमेकाला लागतील इतक्या मांड्या एकत्र आणल्या जातात . मात्र नडांग्या काटकोनातच  राहतात . 

Post a Comment

0 Comments