नगरटुडे बुलेटिन 22-02-2021

 नगरटुडे बुलेटिन 22-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रभाषा रत्न राज्यस्तर पुरस्कार संजय भुसारी यांना प्रदान

वेब टीम नेवासा : श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या गोगलगाव येथील सुदामराव मते पाटील विद्यालयाचे शिक्षक संजय भुसारी यांना राष्ट्रभाषा रत्न राज्यस्तर पुरस्कार  नुकताच प्रदान करण्यात आला.

जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भुसारी यांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते मिरामार पणजी येथे आयोजित राज्यस्तर संमेलनात प्रदान करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातून सोळा अध्यापक व अध्यापिकाना सन्मानित करण्यात आले. संजय भुसारी हे गेल्या वीस वर्षांपासून हिंदी विषयाचे अध्यापन करत असून, हिंदी विषय तज्ञ म्हणून राज्यस्तर, जिल्हास्तर , तालुका स्तरावर काम केलेले आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा हिंदी अकादमीचे अध्यक्ष सुनील शेठ, स्वागताध्यक्ष कैलास जाधव उपस्थित होते.  

संजय भुसारी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी  आ नरेंद्रजी घुले पाटील, जिल्हा बँकेचे संचालक, ना. राजश्री घुले पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, सभापती क्षितिज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ आण्णा नवले, सचिव अनिल शेवाळे, संचालक बबनराव भुसारी, काकासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी दिनकरराव टेकणे, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के,  समन्वयक डॉ. रामकिसन सासवडे, मुख्याध्यापक कैलास भारस्कर यांनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाणीदार महाराष्ट्रासाठी"मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना" गावागावात राबवा 

शरद पवळेंच्या पाठपुराव्याला यश

वेब टीम पारनेर : राज्यात सतत पडणारा दुष्काळ व त्यातुन राज्याच्या तिजोरीवर वाढत चाललेला भार लक्षात घेता पाण्याच्या पुरातन जलश्रोतांचे प्लॅस्टीक पेपर अस्तरीकरण व विशेष दुरुस्तीच्या माध्यमातुन पुनर्जीवन होणे अत्यंत गरजेचे आहे यासंदर्भात शासणासोबत दि.२०डिसेंबर २०२० पासुन पत्राद्वारे करत असलेल्या पाठपुराव्याला दि.१७फेब्रुवारी २०२१च्या "मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या"अनुषंगाने मोठे यश प्राप्त होत आहे तरी याबाबत महाराष्ट्र शासनाचे आभार मानत आहोत.या योजने अंतर्गत शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली ७,९१६ जलश्रोतांची विशेष दुरुस्ती करुन सिंचन क्षमता पुनर्स्थापीत करण्यात येणार आहे.  यामध्ये पाण्याची गळती होणारे लघुसिंचन तलाव,गाव तलाव,पाझर तलाव,माती नालाबांध,सिमेंट नालाबांध,साठवण बंधारे,कोल्हापुरी बंधारे,वळवणीचे बंधारे इ.प्रकल्पांचा सामावेश असून संबंधित कामे ही शाखा अभियंता,कंत्राटदार व प्रशिक्षीत कर्मर्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कामाच्या प्रत्येक टप्याच्या व्हीडीओ चित्रिकरणामध्ये करणे अनिवार्य असेल, तसेच केलेल्या कामांचा तपशिल ग्रामसभेसमोर ठेवणे देखील बंधनकारक राहील.या योजनेच्या यशस्वी अमलबजावणीने राज्यातील ७,९१६ जलश्रोत पूर्ण कार्यक्षमतेने वापरात येतील व राज्यावर परत दुष्काळाचे अनिष्ठ ओढावणार नाही अशी अपेक्षा असून यासाठी महाराष्ट्रातील गावागावातील नागरीकांनी आपापल्या भागातील जलश्रोतांचा आढावा घेवुन मृद व जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करावा असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पुरातन जलश्रोतांच्या पुनर्जीवनाच्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला "मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या रुपाने मोठे यश प्राप्त होत असुन भविष्यात पुर्ण क्षमतेने जलश्रोतांचा वापर होवुन महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याच स्वप्न यातुन पूर्ण होणार आहे~शरद पवळे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्य युवक परिषदेचे अध्यक्ष डॉ.संतोष साळवे यांचा मनसेत प्रवेश

    वेब टीम नगर : नगर जिल्ह्यात जात पडताळणी कार्यालय सुरु होण्यासाठी वेळोवेळी आंदोलन, पाठपुरवठा करणारे राज्य युवक परिषदेचे अध्यक्ष डॉ.संतोष साळवे यांनी आपल्या समर्थक, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी डॉ.साळवे यांची मनसेत स्वागत केले.

     यावेळी बोलतांना डॉ.संतोष साळवे म्हणाले, मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांचे नेतृत्व पूर्वीपासूनच मनात कोरलेले आहे. त्यांचे ज्वलंत विचार प्रभावीत आहेत. त्यामुळेच सामाजिक कार्याला जोड देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला आहे. आता मनसेच्या झेंंड्याखाली काम करुन सर्वसामान्यांच्या प्रश्नांडसाठी अधिक जोमाने काम करु, असे सांगितले.

     याप्रसंगी सचिन डफळ म्हणाले, डॉ.संतोष साळवे हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे राहिले आहेत, त्यांनी  सर्वसामान्य नागरिकांचे वेळोवेळी प्रश्नल सोडविण्यासाठी संघर्ष व आंदोलने केली आहे. यापूर्वी त्यांनी एस.टी. महामंडळांच्या गाड्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र्य बैठक व्यवस्था ठेवण्याचा प्रश्नह मार्गी लावला. शेतकर्यांाना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न. दिव्यांग, बेसहारा व अडचणीतील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे चांगले सामाजिक काम करणारे व्यक्ती मनसेत आल्याने पक्षाची ताकद वाढणार असल्याचे सांगून स्वागत केले.

     यावेळी तुषार डोंगरे, संकेत खेतमाळीस, महेश चव्हाण, सार्थक दळवी, विकी गायकवाड आदि उपस्थित होते.  मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक शाम कांबळे, वकिल संघटनेचे सदस्य अॅाड.संदिप बुरके यांनी डॉ.साळवे यांना शुभेच्छा दिल्या.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चर्मकार विकास संघाच्या युवा प्रदेश कार्याध्यक्षपदी अमोल बोर्हा-डे यांची नियुक्ती

वेब टीम नगर : चर्मकार विकास संघाच्या युवा प्रदेश कार्याध्यक्षपदी युवा उद्योजक अमोल बोर्हा-डे यांची नियुक्ती करण्यात आली. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी शहरातील संपर्क कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ नेते रामदास सोनवणे, प्रदेश सचिव प्रा. सुभाष चिंधे, कारभारी देव्हारे, गोरक्षनाथ कांबळे, राजेंद्र कांबळे, रघुनाथदादा वाकचौरे, अरुण मोढे, रंजना मोढे, कबीर मोढे आदी उपस्थित होते.

अमोल बोर्हारडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान व युवकांमध्ये असलेले संघटन कौशल्य पाहून त्यांची चर्मकार विकास संघाच्या युवा प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये कार्यरत राहून त्यांनी अनेक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे कार्य केले. तर विविध सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्नय सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार असल्याची भावना प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना बोर्हायडे यांनी सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार राहणार असून, महाराष्ट्रातील युवकांचे संघटन करण्याचे कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी बोर्हा डे यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 भारतीय नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा सत्कार

वेब टीम नगर : भारतीय नौदलात देशसेवेसाठी रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग या युवकाचा कास्ट्राईब महासंघाचे कार्याध्यक्ष वसंत थोरात यांनी सत्कार केला. यावेळी दत्ता रणसिंग, सुनिल थोरात, लक्ष्मणराव सांगळे, हर्ष रणसिंग आदी उपस्थित होते.

यश हा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता रणसिंग यांचे चिरंजीव आहे. भारतीय नौदलाच्या भरतीत पात्र होऊन खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन नुकतेच तो विशाखापट्टणम येथे देशसेवेच्या कार्यासाठी रुजू झाला आहे. वसंत थोरात म्हणाले की, जिद्द व परिश्रमाच्या बळावर स्वप्न साकार होत असतात. सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने स्वत:च्या कर्तृत्वावर भारतीय नौदलात भरती झाली असून, ही भुषणावह बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात

रंगतदार कुस्त्यांचा थरार

वेब टीम नगर: ६४  वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत२०२०-२१  स्पर्धेसाठी नगर शहर तालीम सेवा संघाच्या वतीने सर्जेपुरा येथील छबु पैलवान तालीम येथे शहराची निवड चाचणी उत्साहात पार पडली. यावेळी शहरातील मल्लांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला तर मल्लांचे रंगतादार कुस्त्यांचे सामने रंगले होते.

माजी नगरसेवक संभाजी लोंढे यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करुन व कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै.नाना डोंगरे, उपमहाराष्ट्र केसरी पै.अनिल गुंजाळ, पै.विलास चव्हाण, नगर शहर तालिम संघाचे अध्यक्ष पै.नामदेव लंगोटे, उपाध्यक्ष सुनिल भिंगारे, बजरंग महांकाळ, सचिव मोहन हिरणवाळे, कार्याध्यक्ष अजय अजबे, खजिनदार कैलास हुंडेकरी, पै.काका शेळके, पै.संग्राम शेळके, सुरेश आंबेकर, तुषार अरुण आदींसह मल्ल उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात कुस्ती मल्लांचे मोठे नुकसान झाले. सराव, व्यायाम व खुराकाचा प्रश्नु बिकट बनला असताना शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या कुस्ती स्पर्धा जाहीर झाल्या असून, त्या अनुशंगाने निवड चाचणी स्पर्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करुन होत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी नगरसेवक संभाजी लोंढे यांनी अहमदनगर जिल्ह्याला कुस्तीचा मोठा इतिहास व परंपरा आहे. कुस्तीची आवड असलेल्या युवकांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावे. अनेक उत्तम कुस्तीपटू पुढे येत असून, कुस्तीपटूंनी सराव व व्यायाम न थांबविण्याचे त्यांनी आवाहन केले.

या निवड चाचणीत राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी ५७, ६१ , ६५ , ७० ,७४ ,७९ , ८६ , ९२ , ९७  व महाराष्ट्र केसरी गटसाठी ८६  ते १२५  किलो वजनगटासाठी (गादी व माती) निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विजयी मल्ल गादी विभागसाठी सौरभ जाधव, कौस्तुभ आंबेकर, लक्ष्मण धनगर, चैतन्य शेळके, विशाल मेहेत्रे, ऋषीकेश लांडे, राहुल ताकवणे, युवराज खैरे, माती विभागासाठी करण मिसाळ, निखील शिंदे, किरण धनगर, बंटी साबळे, मयुर जपे, आदेश डोईजड, तर महाराष्ट्र केसरी गटासाठी तुषार अरुण (माती) व महेश लोंढे (गादी) या मल्लांची जिल्हा निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहे. या निवडचाचणीसाठी पंच म्हणून पै.संभाजी निकाळजे व पै. नाना डोंगरे यांनी काम पाहिले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अन्यथा कामगारांचा मेहेर बाबांच्या धुनी जवळ मुक सत्याग्रह

अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची मागणी : महागाईच्या काळात जगण्यासाठी पगारवाढ द्यावी

वेब टीम नगर : अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांचे वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे सुरु असून, २३ फेब्रुवारी रोजी शेवटची सुनावणी होणार आहे. या पार्श्वपभूमीवर शिवजयंती दिनी लाल बावटा संलग्न अवतार महेरबाबा कर्मचारी युनियनची अरणागाव (ता. नगर) येथे बैठक पार पडली. वाढती महागाई, कोरोना महामारीमुळे ओढवलेले आर्थिक संकटामुळे कामगारांचे अत्यल्प पगार असल्याने दरमहा चार हजार पाचशे तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा पाच हजार पाचशे रुपये पगारवाढ देण्याची मागणी केली आहे. शेवटच्या तारखेत पगारवाढीवर तोडगा न निघाल्यास मेहेर बाबांच्या धुनी जवळ न्याय मिळण्यासाठी मुक सत्याग्रह करण्याचा निर्णय सदरच्या बैठकित घेण्यात आला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन युनियनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅचड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबांच्या श्रध्देपोटी अनेक दिवसापासून कामगार सेवा देत आहे. मात्र या महागाईच्या काळात जगणे देखील अवघड झाले असताना पगारवाढची मागणी करण्यात आलेली आहे. मागील करारात ट्रस्टने चार हजार दोनशेची पगारवाढ दिली होती. या करारात फक्त कामगार चार हजार पाचशे रुपये पगार वाढची मागणी करीत आहे. ट्रस्टनी मनाचा मोठेपणा दाखवून पगारवाढ देण्याची मागणी सर्व कामगारांच्या वतीने करण्यात आली. लाल बावटाचे जिल्हा सेक्रेटरी अॅठड.कॉ. सुधीर टोकेकर यांनी सर्व कराराची, डिमांड नोटिसा व मध्यस्थी बाबत माहिती दिली. युनियनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी वेतनवाढीची अवाजवी मागणी केली नसून, किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा या पध्दतीने कामगारांना वेतनवाढ मिळाली पाहिजे. ट्रस्टचा बॅलेन्सशीट चांगला असून कोट्यावधीची उलाढाल सुरु असताना कामागारांप्रती सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची गरज असल्याची भूमिका मांडली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या पहिल्याच बैठकित गावातील विकास कामे मार्गी लावण्याचा निर्णय

महिला सरपंच व उपसरपंच यांचा धडाकेबाज निर्णय

वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच रुपाली जाधव व उपसरपंच अलका गायकवाड यांनी पदभार स्विकारुन पहिल्याच बैठकित गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्याचे सुचवले. या बैठकित ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुन्नाबी शेख, प्रमोद जाधव, किरण जाधव, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, कर्मचारी दिपक जाधव उपस्थित होते.

महिला सरपंच व उपसरपंचांनी पहिल्याच बैठकित गावातील विकासकामांना प्राधान्य देऊन स्मशानभूमीत हायमॅक्स, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, पिंपळगाव ते खंडू जाधव वस्ती पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, पाझर तलाव दुरुस्ती, कब्रस्तानमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हरीजन वस्तीत बंदीस्त गटार योजनेचे काम पुर्ण करण्याचे सुचविले. या कामांना उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी सहमती दर्शवली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नोटाबंदी , जीएसटीनंतर महागाईच्या भडक्यात जनता होरपळत आहे

खासदार वीरसिंग : बहुजन समाज पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

नगर जिल्ह्यात गाव तेथे बुथ अभियानाचा निर्णय

 वेब टीम नगर : बहुजन समाज पार्टी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहे. सत्ताधारी भाजपने फक्त नागरिकांना आश्वावसन देऊन दिवसा स्वप्न दाखविले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न. सुटण्यास अवघड झाले असताना, नोटाबंदी व जीएसटीनंतर महागाईच्या भडक्यात जनता होरपळून निघत आहे. सत्ताधारी महागाई रोखण्यात अपयशी ठरत असताना सर्वसामान्यांना जगणे देखील अवघड झाले असल्याची भावना बसपाचे राष्ट्रीय महासचिव खासदार वीरसिंग यांनी व्यक्त केली.

बहुजन समाज पार्टीच्या मुंबई, चेंबूर येथील कार्यालयात अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी खासदार वीरसिंग बोलत होते. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष अॅाड. संदीप ताजने, प्रदेश सचिव सुदिप गायकवाड, एस.एस. तायडे, वाघमारे, अहमदनगर जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे आदी उपस्थित होते.

या बैठकित खासदार वीरसिंग यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रदेश अध्यक्ष अॅाड. संदीप ताजने यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभेत पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकार्यां ना सूचना केल्या. जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या पक्षाच्या कार्याची माहिती देऊन, गाव तेथे बुथ स्थापन करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. अहमदनगर बसपाच्या वतीने राष्ट्रीय महासचिव खासदार वीरसिंग व प्रदेश अध्यक्ष अॅ ड. संदीप ताजने यांचा सत्कार करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कॉ. एकनाथराव भागवत स्पर्धेत फर्ग्युसन व वारणा कॉलेजला विजेतेपदवेब टीम नगर : कॉम्रेड एकनाथराव भागवत यांच्या स्मृतिनिमित्त न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर मध्ये आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेत यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघाने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. वादविवाद स्पर्धेत प्रणाली पाटील आणि गणेश लोळगे यांच्या संघाने प्रथम क्रमांक तर गोविंद अंभोरे आणि आशिष साडेगावकर, वृत्तपत्र आणि जनसंवाद विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. ऋषभ चौधरी आणि अनिकेत डमाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत दिपक कसबे आणि चैतन्य बनकर या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. तर रेवन्नाथ भोसले आणि महेश उशीर, सदगुरु गगनगिरी महाराज महाविद्यालय कोपरगाव या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. सामाजिक व राजकीय विषयावरील सर्वोत्कृष्ट वक्त्याचा करंडक चैतन्य बनकर या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने मिळवला. तर स्त्री विषयासाठीचा करंडक रेसिडेन्शियल ज्युनिअर कॉलेजच्या ऋतुजा गंगावणे हिने मिळवला. प्रज्वल नरवडे, साईनाथ महादवाड यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

पारितोषिक वितरणाच्या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड कारभारी उगले तर अध्यक्ष म्हणून अ.जि.म.वि.प्र.स. संस्थेचे उपाध्यक्ष मा. रामचंद्रजी दरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आता नाहीरे वर्गातील तरुणांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, संघर्षाशिवाय काही मिळणार नाही असे सांगितले. तर अध्यक्षांनी कॉम्रेड भागवत यांच्या आठवणींना उजाळा देत विजेत्यांचे विशेष कौतुक करत भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी मा. राहुल विद्या माने (पुणे) व मा. ज्ञानेश्वर जाधवर (पुणे) यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. परिक्षणाबद्दल बोलतांना माने यांनी स्पर्धकांना आपली अभिव्यक्ती लोकशाही मूल्यांसाठी वापरण्याचे आवाहन केले. तर जाधवर यांनी स्पर्धकांनी इतरांच्या प्रभावातून बाहेर पडून स्वतःच्या बोलण्यात आणि विचारांमध्ये प्रगल्भता आणावी अशी सूचना केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. बी. बी सागडे यांनी केले. या प्रसंगी मा. निर्मलाताई काटे, सीतारामजी खिलारी, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. के. पंधरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी. के. मोटे हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. ज्ञानदेव कोल्हे यांनी आभार व्यक्त केले.Post a Comment

0 Comments