बोठेचा स्टँडिंग वॉरंट विरुद्धचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

बोठेचा स्टँडिंग वॉरंट विरुद्धचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला 

वेब टीम नगर : बाळ बोठे याने पारनेर न्यायालयाने काढलेल्या स्टँडिंग वॉरंट विरुद्ध पुनर्निरीक्षण अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केला होता. हा अर्ज आज प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश अणेकर यांनी फेटाळला व पारनेर न्यायालयाने दिलेला स्टँडिंग वॉरंटचा हुकूम कायम केला. 

दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी २५ ते ३३ या वयोगटातील आरोपी मोटर सायकल क्र. एम एच १७,  २३८० वर येऊन फिर्यादीच्या गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून फिर्यादीची मुलगी नामे रेखा भाऊसाहेब जरे हिच्याशी वाद घालून धारदार हत्याराने हिचे गळ्यावर वार करून तिला जीवे मारले आहे. यावरून सूपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. 

सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. ६ बाळ उर्फ बाळासाहेब बोठे हा दि. ३० डिसेंबर २०२० रोजी गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याचा शोध पोलिसांनी पुणे , नाशिक , बीड , उस्मानाबाद , धुळे , वैगेरे जिल्ह्यांमध्ये घेतला असता तो मिळून आलेला नाही. त्यामुळे उप विभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण यांनी सी आर पी सी कलम ७३ अन्वये वॉरंट मिळण्या कमी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पारनेर यांच्या न्यायालयात अहवाल सादर केला त्यावरून न्यायालयाने ६ जानेवारी २०२१ रोजी वॉरंटचा हुकूम केला या हुकुमा विरोधात आरोपी बाळ बोठे याने जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केलेला होता त्या मध्ये  वॉरंटचा हुकूम रद्द करण्या बाबत विनंती केली होती. 

आज प्रधान जिल्हा व स्तर न्यायाधीश यांनी आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपीने दाखल केलेला पुनर्निरीक्षक अर्ज फेटाळून लावला व पारनेर न्यायालयाने दिलेला स्टँडिंग वॉरंटचा हुकूम कायम केला.    

Post a Comment

0 Comments