फॅशनट्रेंड :
चला जुन्या साडयांना देऊ नवा लुक
आपल्या वॉर्डरोब मध्ये अनेक रंगीबेरंगी साड्या ओळीने सजलेलल्या असतात. साडी सर्वच दिवसात लोकप्रिय असली तरी त्यातही वैविध्य पाहायला मिळते. मात्र नेहमी नेहमी साडी नेसून कंटाळा आल्यानंतर या साड्यांना आपण वेगळा टचही देऊ शकतो. इंडोवेस्टर्न पेहरावांचा प्रभाव तरुणाईवर जास्त असल्याने त्या पद्धतीची फॅशन तुम्ही सहजपणे कॅरी करू शकता. पारंपारिक साडीपेक्षा तुम्ही या प्रकारच्या कपड्याचा प्रयोग नक्की करून बघा . एखाद्या जुन्या साडी पासून नानाविध कपडे तयार करता येतील. या साडी पासून लांब अनारकली गाऊन, वन पीस घागरा चोळी, स्कर्ट ड्रेस, पॅन्ट आणि असे अनेक प्रकार बनवू शकता आणि तेही सिल्क, शिफॉन, जॉर्जेटच्या जुन्या साड्यांपासून.
ज्यांना पूर्णपणे इंडियन किंवा इंडो-वेस्टर्न स्टाइलिंग करायची नसेल ते पूर्णपणे वेस्टर्न स्टाइल करू शकतात. लॉंग टॉप, क्रॉप टॉप ,ब्लेझर, विंटर स्पेशल हाय नेक टॉप, वन पीस सिक्वेन्स वर केलेले गाऊन किंवा वनपीस तुम्ही परिधान करू शकता. प्लाझो पॅन्ट करून तिथेही आपले वेगळेपण सहज सिद्ध करता येते.
साडी आणि नव्या फॅशन या दोन्हीचा बॅलन्स साधत आपण कुर्ती स्टायलिंग करू शकतो. पंजाबी ड्रेस, धोती स्टाइल कुर्ती आणि लेगिन्स अंगरखा कुर्ती आणि पलाझो शर्ट कुर्ती,कफ्तान कुर्ती,केपकुर्ती वर मिरर वर्क वेगवेगळ्या प्रकारचे भरतकाम जरीचा सिल्वर गोल्डन वर केलेले कपडे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ते प्रकारही साडीला वेगळा टच देतांना उपयोगी पडतात या व्यतिरिक्त टॉप आणि जॅकेट हे कॉम्बिनेशन सुद्धा अनेकदा उठून दिसते.
0 Comments