स्विफ्टकार,ट्रॅव्हल बसच्या अपघातात ५ जण जागीच ठार

स्विफ्टकार,ट्रॅव्हल बसच्या अपघातात ५ जण जागीच ठार 

वेब टीम नगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर नगर कडून जाणारी ट्रॅव्हल बस (क्र . एम एच १९ वाय ७१२३) आणि औरंगाबाद कडून येणारी स्विफ्ट कार (क्र . एम एच २१ बी एफ ७१७८)यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.   देवगड फाट्याजवळ  हा अपघात पहाटे अडीचच्या दरम्यान झाला.  हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाच जण जागीच ठार झाले . मयत झालेले सर्वजण जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते.  स्विफ्ट कार आणि ट्रॅव्हल बस समोरासमोर धडक झाल्याने कारचा चक्काचूर झाला .  अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक अशोक नागरगोजे, पोलीस नाईक बबन तमनर ,पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुराडे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले. रुग्णांना नेवासा फाट्याजवळील ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु उपचारापूर्वीच पाचही जण मृत पावल्याचे सांगण्यात आले पुढील तपास नेवासा पोलिस करत आहेत. Post a Comment

0 Comments