योगसाधना : वातायनासन

 योगसाधना

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वातायनासन 

वातायन  म्हणजे घोडा.  या आसनाचे घोड्याच्या तोंडाशी साम्य  असल्यामुळे त्याला हे नाव मिळाले. 

 पद्धती : 

1)  जमिनीवर बसा आणि डावे पाउल  उजव्या मांडीच्या मुळाशी ठेवून अर्ध पद्मासन करा. 

2)  दोन्ही हात कंबरेच्या बाजूला जमिनीवर टेकवा.  श्वास सोडा,धड  जमिनीवरून उचला आणि डाव्या गुडघ्याचा वरचा भाग जमिनीवर ठेवा.   वाकवलेल्या डाव्या गुडघ्या नजिक उजवे पाऊल ठेवा आणि उजवी मांडी जमिनीशी समांतर राहू द्या. 

3)  ओटीपोट पुढे खेचा.  डावी मांडी  जमिनीशी काटकोनात ठेवा हात उचला पाठ ताठ करा आणि शरीर तोलून धरा तोल  सांभाळतांना पुढे वाकू नका पाठ सरळ राहू द्या.  

4)  कोपर वाकवा  आणि हात  छातीच्या पातळीला न्या  उजव्या दंडाची कोपरा जवळची मागची बाजू,डाव्या  दंडाच्या  कोपराच्या सांध्याच्या वरच्या बाजूस टेकवा   कोपरा पुढील हात एकमेकांभोवती लपेटा.  नेहमीसारखे श्वसन करत या स्थितीत ३० सेकंद राहा. 

5)  हात मोकळे करा जमिनीवर बसा आणि पाय लांब करा. पुन्हा हेच आसन दुसऱ्या बाजूने करा आता उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा आणि डावे पाऊल  जमिनीवर वाकावंलेल्याउजव्या गुडघ्याशी  ठेवा . छाती समोर हात एकमेकाशी लपेटा  डावा हात उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या सांध्यापाशी  येऊ द्या.  डावी मांडी जमिनीशी समांतर ठेवून शरीर तोलून धरा . दोन्ही बाजूकडील आसनाला  सारखाच वेळ द्या.  नंतर पूर्वस्थितीत येऊन जमिनीवर विसावा घ्या .

6)  प्रारंभी तोल सांभाळणे कठीण जाईल आणि गुडघ्यातून कळा येतील परंतु अभ्यासाने कळा नाहीशा होऊन तोल सांभाळता येईल. 

 परिणाम : या सणामुळे कमरेच्या सांध्याचे रक्ताभिसरण योग्य तऱ्हेने होऊ लागते आणि कंबर व मांड्या यांच्यामधील किरकोळ विकृती दुरुस्त होतात या आसनामुळे पाठीच्या त्रिकश्रोणिफलक भागातला ताठरपणा नाहीसा होतो.



Post a Comment

0 Comments