द्रिश्यम २ तामिळरॉकर्स इतरही ऍप्स वर लीक

 द्रिश्यम २ तामिळरॉकर्स इतरही ऍप्स वर लीक 

वेब टीम मुंबई : दिग्दर्शक जीतू जोझेफचा 'दृश्यम 2' हा चित्रपट जबरदस्त चर्चेत  आहे. हा चित्रपट नुकताच अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आणि रिलीज झाल्यानंतर काही तासातच लिकही झाला. तमिळरॉकर्स या सोशल साईटवर हा लिक झाला आहे. पायरसी साइट तामिळरोकर्ससोबत इतर अनेक अ‍ॅप्सवरही हा प्रसारित केला जात आहे.

पायरसीवर कडक बंदी असूनही तामिळरॉकर्स तसेच इतर पायरसी साइट्स अद्यापही सक्रीय आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच अगदी काही तासांमध्ये मोठे चित्रपट यावर लिक केले जातात. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलीवूडचे सर्व चित्रपट या माध्यमांवर लिक झाले आहेत. यामुळे निर्मात्यांना बरंच नुकसान सहन करावं लागत आहे. साऊथ इंडियन सिनेमातील बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 2' ची लिक होण्यात तामिळरॉकर्ससोबत तामिळगुणसारख्या पायरसी वेबसाइटचाही हात असल्याचं समोर आलंय.

'दृष्यम 2' हा चित्रपट 19 फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि काही तासातच तो पायरसीचा बळी पडला. चित्रपटगृहात प्रदर्शित न करता थेट डिजिटल प्लॅटफ़र्मवर हा चित्रपट रिलीज केला गेला. मात्र पायरसीमुळे या चित्रपटाच्या कमाईवर मोठ्या प्रमाणात फरक पडण्याची शक्यता आहे.

रिलीजपूर्वी दृश्यम 2 चे स्टार मोहनलाल या चित्रपटाबाबत फार उत्सुक होते. या चित्रपटातील मुख्य पात्र जॉर्जकुट्टी हे सर्वांना आकर्षित करणारं पात्र ठरलंय. एखादी व्यक्ती, सामान्य माणूस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या संरक्षणासाठी कोणतीही पातळी गाठू शकतो हे या पात्राद्वारे दिसून येतं. दृश्यमचा पहिला भाग, बॉलिवूड रिमेक हा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. अजय देवगण आणि तब्बू यांच्या भूमिकेने आणि या चित्रपटाच्या कथेने सर्वांना विचारात पाडलं होतं. त्यामुळे दृश्यमचा बॉलिवूड रिमेक पाहिलेल्या प्रेक्षकांनाही आता दृश्यम 2 पाहणं फार औत्सुक्याचं ठरतंय.

Post a Comment

0 Comments