नगर शहरातील पहिल्या अटल टिंकरिंग लॅबचे उदघाटन

 नगर शहरातील पहिल्या अटल टिंकरिंग लॅबचे उदघाटन

 वेब टीम नगर : रूढ शिक्षण पद्धतीत मूलं विचार व्यक्त करतांना दिसत नव्हती त्यामुळे आपली विचारसरणी एकांगी बनली. शिक्षणातील सर्जनशीलता हरवली त्यामुळे आपल्याकडे शोध कमी लागायचे. मात्र हल्लीच्या काळातही मुलं व्यक्त होऊ लागली आहेत. इंटरनेट आणि मोबाईल मुळेही अनेक गोष्टी कळायला लागल्या व्हाट्सअप , यु ट्यूब, गुगल वरून माहिती मिळते.मात्र ज्ञान मिळवण्यासाठी शालेय शिक्षणच महत्वाचे आहे. छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत मेंदू वापरला पाहिजे. आजच्या मुलांचे ज्ञान आमच्या पिढीपेक्षा जास्त आहे. अटल  टिंकरिंग लॅब सारख्या. वैज्ञानिक प्रयोग शाळा आता उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी तेथे जाऊन क्रियाशील प्रयोग करत राहावेत. प्रयोग शाळेतील वस्तू वापरा नवनिर्मिती करा तेव्हा आपल्यातच क्षमता असल्याची  जाणीव होईल असे मत कार्यक्रमाचे उदघाटक  जी.के.एन सिंटर मेटल्स कंपनीचे प्लांट डायरेक्टर  पुरुषोत्तम ऋषी यांनी व्यक्त केले. रेणावीकर विद्यालयात केंद्र सरकारच्या निती आयोगातर्फे सुरु करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅबच्या उदघाटन प्रसंगी  ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.आर.डी.इ अहमदनगरचे विवेक धावणे ( वैज्ञानिक डी ), तर विद्यालयाचे शाला समिती अध्यक्ष विजय भालेराव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर शाला समितीचे महामात्र अतुल कुलकर्णी ,डी.जे.नाईक , गरवारे कॉलेज पुणे च्या पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख विनय चाटी , रोबोकार्टचे प्रमोद पाटील या  कार्यक्रमास  उपस्थित होते.  

ज्या शोधांमुळे माणसाचे जीवन सुकर झाले, ते शोध आपोआपच लोकप्रिय झाले. ज्या काळात टाचणी , यु पिन स्टेपलर पिन चा शोध लागलेला नव्हता तेव्हा या गोष्टी प्रयोगातून अस्तित्वात आणण हि नवनिर्मिती होती माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम नेहेमी म्हणायचे विज्ञान हि मानवाला मिळालेली सर्वात सुंदर भेट आहे. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी  जय जवान जय किसान जय विज्ञान हि घोषणा दिल्याने बहुदा त्यांचेच नाव या प्रयोग शाळांना देण्यात आले आहे. चुकल्या शिवाय शिकता येत नाही तसेच अपयशाशिवाय यशाचं महत्वही कळत नाही. समाजमाध्यमाचा उपयोग नाविन्यासाठी करा असं आवाहनही धावणे यांनी ह्यावेळी केलं.

विद्यार्थ्यांनी सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यावा आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये यशस्वी होऊन स्वतःची सर्वांगीण प्रगती साधावी असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष .विजय भालेराव यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे महामात्र अतुल कुलकर्णी सर यांनी केले. मान्यवरांचा परिचय व सत्कार माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अटल टिंकरिंग लॅबच्या प्रमुख वंदना गोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका स्नेहल उपाध्ये यांनी केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मेकॅनिक्स , इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स वर आधारित विविध उपकरणांचे प्रदर्शन, थीम प्लॅनेटोरियम, पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन द्वारे शाळेतील विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या ड्रोन द्वारे संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करून यु ट्यूब वर थेट प्रक्षेपित केले.


Post a Comment

0 Comments