नगरटुडे बुलेटिन 15-02-2021

 नगरटुडे बुलेटिन 15-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्हॅलेंटाईन डे निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश

जागरूक नागरिक मंचचा अनोखा उपक्रम

वेब टीम नगर : जागरूक नागरिक मंचातर्फे पत्रकार चौका मधील शहीद भगतसिंग उद्यानात व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वांनी देशावर प्रेम व्यक्त करत जातीयवाद नष्ट करू हा संदेश देण्यासाठी अनोख्या उपक्रमचे आयोजन संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. यावेळी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा.सुनील पंडित, हरजितसिंग वधवा, अर्षद शेख व डेव्हिड चांदेकर यांना यांना एकाच मंचावर बोलावून त्यांच्या हाती तिरंगा देऊन गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले. भारतमातेच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

          यावेळी बोलतांना सुहास मुळे म्हणाले, व्हॅलेंटाईन डे च्या दिवसी प्रेम व्यक्त करायचेच असेल तर आपल्या देशावर प्रेम वक्त करा. सध्या जातीयवादाच्या किडीने संपूर्ण भारतास पोखरले आहे. राजकीय पक्ष व त्यांचे पुढारी या किडीला मुद्दाम खतपाणी घालत जातीयवादचा रोग पसरवत जाती धर्मात फुट पडून राज्य करत आहे. याला आपण छेद दिला पाहिजे. शहीद भगतसिंग सारख्या अनेकांनी देशावर प्रेम व्यक्त करत आपल्याला स्वतंत्र्य मिळवून दिले. त्यांचा आदर्श घेवून हम सब  है भाई भाई.... या संकल्पनेने देशावर प्रेम व्यक्त करून एकत्रितपणे या जातीयवादाला समूळ नष्ट करू. आपल्या देशात संस्कृतीत कोठेही जातीयवाद नाहीने त्यामुळे शकडो वर्षांनुवर्षे हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र या राजकीय पक्ष आपल्या आपल्यात भांडणे लावत आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी देशावर प्रेम व्यक्त करत हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई...., हम सब है भाई भाई.... हा नारा पुन्हा एकदा देवून जातीयवाद नष्ट करू, असे आवाहन त्यांनी केले.

          प्रा.सुनील पंडित, अर्षद शेख यांनी चांगला संदेश देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी एक राहण्याचे आवाहन केले. यावेळी जागरूक नागरिक मंचचे सुरेखा सांगळे, शारदा होशिंग, मेहरुदा शेख, प्रा.मंगेश जोशी, अभय गुंदेचा, कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब भुजबळ, बी.यू.कुलकर्णी, योगेश गणगले, सुनील कुलकर्णी, जय मुनोत, अमेय मुळे, प्रसाद कुकडे, राजेश सटाणकर, प्रकाश भंडारे आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वंचित महिलांचे जीवन परिवर्तन  करण्यासाठी फुलर्टन इंडिया कटिबद्ध :शौकत शेख

वेब टीम नगर : देह व्यापारातील बळी महिलांना जीवनाची नवी उमेद मिळण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन जीवन परिवर्तन  करण्यासाठी फुलर्टन इंडिया कटिबट्ट असे प्रतिपादन  फुलर्टन इंडियाचे क्लस्टर मॅनेजर शौकत शेख यांनी केले. फुलर्टन इंडिया आणि स्नेहालय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित महिलांसाठी कोपरगाव येथील फुलर्टन ग्रामसखी कार्यालयात आयोजीत व्यावसायिक  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत  होते. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर  अध्यक्षस्थानी फुलर्टन इंडियाचे शाखा व्यवस्थापक गौरीकुमार बंडे, प्रकल्प व्यवस्थापक संतोष हासे, स्नेहालय संस्थेचे विश्वस्त सदस्या संगीता शेलार, स्नेह्सक्षम प्रकल्प व्यवस्थापक राहुल देशमुख  आदि उपस्थित होते.  

शौकत शेख  म्हणाले की,  वंचित महिलांना विविध  व्यावसायिक प्रशिक्षण आणि शासकीय व्यवसायाविषयीचे योजनाची  मदत मिळून देण्यास फुलर्टन इंडिया स्नेहालय सोबत काम करेल. आपल्या अध्यक्षीय भाषणात गौरीकुमार बंडे म्हणाले की,  वंचित महिलांनी संघटित होऊन आपले प्रश्न समाजासमोर मांडले पाहिजे. रोजगाराच्या कामाव्यतिरिक्त इतर पर्यायी व्यवसाय निवडणे महत्वाचे आहे. यावर्षी कोरोना या महामारीने जगभरात आर्थिक मंदीचे सावट आलेले आहे. त्यामुळे बचतीची सवय व पैशाची काटकसर करणे आवश्यक आहे.

 राहुल देशमुख  यांनी महिलांना आवाहन केले की, समाजच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपली मानसिकता बदलावे.   वंचित महिलांच्या प्रतिनिधी संगीता शेलार   यांनी  विविध शासकीय योजना, घरकुल योजना आणि शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी येणाऱ्या अडी अडचणी याबाबत माहिती दिली तसेच  शासनाच्या विविध योजनांसाठी  कागदपत्रांची मागणी केली जाते, ती कागदपत्रे वंचित महिलांकडे नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे महिलाच्या मदतीचे निकष बदलले जावेत, असे संगीता शेलार  यांनी आग्रहाने सांगितले तसेच महिलांच्या पुनर्वसनाची मागणी  केली. मा. संतोष हासे यांनी या प्रशिक्षणातून महिलाना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल तसेच महिलांनी चागल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय केला तर त्यांना पुढील आर्थिक नियोजनासाठी फुलर्टन इंडिया कंपनी कडून कर्ज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत  माधुरी वाघ  यांनी स्नेहालय आणि स्नेह्ज्योत प्रकल्पाबाबत माहिती देवून वंचित महिलांनी समाजासाठी कोणकोणते उपक्रम राबवले या बाबत सांगितले.   यावेळी १५ वंचित महिलांनी आपले ३ दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे यावेळी त्यांना  रुपये ७००० प्रत्येकी असे एकूण १०५००० रुपयांचे कीटचे (हातपंप, ग्लोव्हज, सँनिटायजर लिक्विड, मास्क, फेस शिल्ड) मान्यवरांच्या हस्ते वंचित महिलांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  माधुरी वाघ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकल्प व्यवस्थापक राहुल देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता शेलार, माधुरी वाघ, राहुल देशमुख  आदींनी  परिश्रम  घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संवादातून विचाराची देवाण-घेवाण

 प्रमिला दुमाटे : हळदी-कुंकू कार्यक्रमात स्त्री जन्माचे स्वागत करुन ठेव पावती सुपूर्द

     वेब टीम नगर : भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यामध्ये महिलांना विशेष महत्व असून, या सण-उत्सवामधून महिलांना प्रेरणा मिळत असते. संक्रात व त्यानंतरचे हळदी-कुंकू समारंभ हा महिलांचा आवडता सण यानिमित्त महिला एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करत असतात. यानिमित्त होणार्याा संवादातून एक चांगल्या समाजाची निर्मिती होत असते. संत नामदेव महिला मंडळाच्यावतीने महिलांसाठी नेहमीच सामाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त स्त्री जन्माचे स्वागत करा ही संकल्पना घेऊन स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी समाजामध्ये जागृती करण्याचा व स्त्री जन्माचे स्वागत करुन त्यांच्या नावे ठेव पावती ठेवून स्त्रीचा सन्मान करण्याचा प्रयत्न महिला मंडळाच्यावतीने करण्यात आला असल्याचे प्रतिपादन संत नामदेव महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रमिला दुमाटे यांनी केले.

     सावेडी, शिंदे मळा येथील संत नामदेव महिला मंडळाच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त मुलींच्या नावे ठेवण्यात आलेल्या ठेव पावतीचे वितरण मंडळाच्या अध्यक्षा प्रमिला दुमाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टच्या उपाध्यक्षा हेमलता वडे, मंडळाच्या सहसेक्रेटरी निर्मला लोळगे, उपाध्यक्षा सविता दुमाटे, कार्याध्यक्षा प्रफुल्ला काकडे, जयश्री नेवासकर,  कल्पना हेंद्रे, अंजली काकडे, मंजुश्री सातपुते, सुनंदा गोंदकर आदि उपस्थित होत्या.

     याप्रसंगी हेमलता वडे म्हणाल्या, स्त्रीयांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी स्त्रीयांनीच पुढाकार घेतला पाहिजे. सण- उत्सवानिमित्त एकत्र होणार्याा महिलांमध्ये समाजातील अनिष्ठ प्रवृत्तीविषयी जागृती करुन त्यांच्या आत्मसन्मान जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नामदेव महिला मंडळाच्यावतीने स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम हा कौतुकास्पद असाच असून, अशा उपक्रमांचे सर्वत्र आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

     ठेव पावतीसाठी हेमलता वडे, कल्पना हेंद्रे, निर्मला लोळगे यांनी सहकार्य केले. त्या कु.सृष्टी बगाडे, शरण्या माळवदे, ऐश्वमर्या माळवदे, स्वानंदी बगाडे, आराध्या माळवदे यांच्या नावे ठेवण्यात आल्या.

     याप्रसंगी निर्मला लोळगे यांनी संत नामदेव महिला मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री नेवासकर यांनी केले तर आभार कल्पना हेंद्रे यांनी मानले. याप्रसंगी स्वाती हेंद्रे, स्वाती औसरकर, शुभांगी लीमकर, मंगल वनारसे, नयन होमकर, शैला लोळगे, प्रतिभा काकडे, सुवर्णा भस्मे, मनिषा लोळगे, सुरेखा धोत्रे आदिंसह महिला उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पतसंस्थेच्या उपक्रमांद्वारे सभासदांना सक्षम करण्याचा प्रयत्न 

 अविनाश घुले : स्व.शंकरराव घुले माथाडी कामगारांची सहकारी पतसंस्थेची वार्षिकसभा खेळीमेळीत 

    वेब टीम  नगर : हमाल-मापाड्यांच्या विविध प्रश्नां साठी संघटनेने नेहमीच पुढकार घेऊन ते सोडविले आहेत. हमाल-मापड्यांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी स्व.शंकरराव घुले यांनी पतसंस्थेची स्थापना करुन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. संचालक मंडळ, सभासदांच्या सहकार्याने पतसंस्था प्रगतीपथावर आहे. हमाल-मापाड्यांना गरजेवेळी तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध होत असल्याने त्यांच्या गरजाही पूर्ण होत आहेत. पतसंस्थेच्यावतीने सभासदांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आर्थिक बाबत सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सभासदांनीही वेळेत कर्जफेड करुन संस्थेचा लौकिक टिकून ठेवावा. गेल्या वर्षी कोरोना काळात हमाल-मापाड्यांवर जे संकट आले होते, त्यावेळी सर्वांच्या सहकार्याने यावर आपण मात करु शकलो, असे प्रतिपादन हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

     स्व.शंकरराव घुले माथाडी कामगारांची सहकारी पतसंस्थेचे वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना अविनाश घुले बोलत होते. यावेळी अध्यक्ष  बबन अजबे, व्हाईस चेअरमन नारायण गिते, सचिव संजय महापुरे, संचालक सचिन ठुबे, सचिन करपे, जालिंदर नरवडे, दिगंबर सोनवणे, बाळासाहेब म्हसे, केरबा पोळ, नवनाथ लोंढे, आशाबाई रोकडे, रत्नाबाई आजबे आदिंसह गोविंदराव सांगळे, सतीश शेळके, भैरु कोतकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी चेअरमन बबन आजबे म्हणाले, पतसंस्थेने नेहमीच हमाल-मापडी यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करुन त्यांची आर्थिक बाजू सक्षमपणे सांभाळली आहे. पतसंस्थेतून देण्यात येणार्या- सुविधांमुळे सभासदांचे गरज तर भागविली जातेच त्याचबरोबर जमा-पुंजीही सुरक्षित होत असल्याने एक आर्थिकस्थैर्य सभासदांना मिळत आहे.  संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्याने पतसंस्थेचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु आहे. पुढील काळात सभासदांच्या हितांचे निर्णय  पतसंस्थेच्या माध्यमातून घेऊन ती सक्षम करण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्य करु, असे सांगून पतसंस्थेचा ताळेबंद सभासदांसमोर सादर केला.

      उपाध्यक्ष  नारायण गिते यांनी गेल्या वर्षभरात पतसंस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संजय महापुरे यांनी केले तर आभार सचिन ठुबे यांनी मानले. यावेळी रविंद्र भोसले, गुंजाळ, रामा पानसंबळ, अशोक जायभाय, किसन सानप, ढाकणे आदिंसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सभासद उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पतसंस्थेच्यावतीने गौरव करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लक्ष लक्ष सूर्यनमस्कार घालून जागतिक विक्रम करणार

योग विद्या धामच्यावतीने शिवजयंतीनिमित्त उपक्रम 

    वेब टीम नगर : रथ सप्तमी  या जागतिक सूर्यनमस्कार दिनी  व  महाराष्ट्र तेजाची प्रतिमा असणार्या- शिवजयंती  निमित्ताने शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी  सूर्योदय ते सूर्यास्त सूर्यनमस्कार या मोहीमे अंतर्गत एक लक्ष शास्त्रशुद्ध सुर्यनमस्कारांचा जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न येथील योग विद्या धाम करणार आहे, अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे यांनी दिली.

     योग विद्या धाम व सुंदर नेत्रालय अ’नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सूर्योदय ते सूर्यास्त एक लक्ष सूर्यनमस्कार प्रकल्पात विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी  करूण घेतले जाणार   आहे. या विक्रमात सहभागी होणार्याप सर्व साधकांना पार्टीसिपेशन सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

     या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपणास दि.  १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६:४० वाजेपर्यंत आपल्या सवडीच्या वेळी खाली निर्देशित ठिकाणी येऊन नाव नोंदवणे व आपापल्या क्षमते नुसार (किमान १२+२ पूर्णमंत्र व जास्तीत जास्त कितीही) सुर्यनमस्कार घालणे अपेक्षित आहे.

     १. योग भवन, चिंतामणी कॉलनी, सावेडी,नगर.  २ . सुंदर भवन, भूतकरवाडी रोड, झोपडी कॅन्टीन. ३. योग हॉल, सिद्धीबाग तालमीच्या वर, नगर शहर या ठिकाणी १९ तारखेच्या मुख्य कार्यक्रमा बरोबरच  सुर्यनमस्कारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊ इच्छिणार्याव साधकांसाठी दि १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ६ ते ७ व दुपारी ४ ते ५ या वेळेत योग विद्या धाम चे प्रशिक्षित योग शिक्षक मोफत मार्गदर्शन व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यार आहेत.

     तसेच दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी नियमित साधक सामूहिक १०८ सुर्यनमस्कार दि १९ रोजी सकाळी ६ वाजता योग भवन, सावेडी येथे घालणार आहेत. तरी या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन योग विद्या धामचे दत्ता  दिकोंडा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अनिरुद्ध भागवत९४२३१६२४३८   यांचेशी संपंर्क साधावा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एकदंत गणेश मंडळाचे कार्य हे परमार्थाची सेवा

 जालिंदर बोरुडे : आरोग्य, दंत, नेत्रतपासणी, मोतिबिंदू शिबीर व औषध वाटप

    वेब टीम  नगर : मोफत शिबीर म्हटलं कि रुग्ण पाठ फिरवित असतात कारण शिबीरात शस्त्रक्रिया चांगली होईल की नाही अशी भिती वाटायची पण सध्या नगर शहर, उपनगरात, ग्रामीण भागात सध्या सेवा-भावी संस्थांनी मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे घेवून हजारो रुग्णांना दृष्टी देऊन मोफत शिबीरात चांगले काम होत असल्याचे सिद्ध केले.  गणेश जयंती म्हणजे एक धार्मिक कार्यक्रम, या कार्याक्रमाच्यावतीने माध्यमातुन मंडळाने मोफत आरोग्य शिबीरे घेवुन  मंडळाचे कार्य हे एकप्रकारची परमार्थाची सेवा आहे, दुवा बरोबर दवा देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी केले.

      श्री गणेश जयंती निमित्त दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत श्री एकदंत गणेश मंदीराच्यावतीने गणेश भाविकांना भव्य नेत्र तपासणी, अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत आरोग्य तपासणी, दंत तपासणी व मोफत औषध वाटप शिबीराप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोरुडे बोलत होते. यावेळी दंततज्ञ डॉ.अंजली गोरे, डॉ.प्रशांत सुरकुटला आदींसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     डॉ.अजंली गोरे म्हणाल्या कि, शिबिरातही चांगल्या शस्त्रक्रिया होतात हे गरजू रुग्णांना समजल्याने शिबीरांचे महत्व लक्षात आले, चांगला प्रतिसाद प्रत्येक शिबीरास लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

     प्रस्तविकात मंडळाचे सुरेखा कोडम म्हणाले कि, महागाईच्या काळात आरोग्याकडे सर्वसामान्य नागरीक दुर्लक्ष करतात. त्यामुळे मोठा आजारा होऊन विविध संकटांना सामोरे जावे लागते. अशा गरजु रुणांसाठी गणेश जयंतीनिमित्त मंडळाच्यावतीने एक प्रयत्न म्हणून हे मोफत आरोग्य तपासणी शिबीरे घेण्यात येतात. जेणे करुन गरजु रुग्णांनाचे आरोग्य चांगले राहिल. असे त्यांनी सांगितले.

     या आरोग्य  शिबीरात१३८ रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधे वाटप करण्यात आले. डॉ.प्रशांत सुरकुटला यांनी आरोग्य तपासणी करुन योग्य ते मार्गदर्शन केले. तर  नेत्र तपासणी  शिबिरात १५८ रुग्णांनी तपासणी होऊन ४४ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवडले. या शिबीरात आनंदत्रषी नेत्रालयाचे डॉ.किरण कवडे, डॉ.ओकांर वाघमारे, डॉ.संजय शिंदे यांनी रुग्णांनी नेत्र व मोतीबिंदू तपासणी केली. तसेच दंत तपासणी शिबीरात डॉ.अजंली गोरे,डॉ.स्वप्निल आंधळे, डॉ.ऋषिकेश यांनी ६६ रुणांची तपासणी करुन योग्य ते मार्गदर्शन केले.

     शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व एकदंत महिला बचत गट सदस्यांनी परिश्रम घेतले. परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा कोडम यांनी केले, तर आभार श्रीकांत आडेप यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पत्रकार फाउंडेशनतर्फे सत्कार


वेब टीम नेवासा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवाभावी फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच महेशराजे म्हस्के व उपसरपंच शोभा गोरक्षनाथ कानडे व सदस्यांचा फाउंडेशनचे अध्यक्ष बन्सीभाऊ एडके, सचिव नवाब शहा यांनी सत्कार केला. यावेळी फाउंडेशनचे सदस्य युसुफभाई सय्यद, इंनुस पठाण,  जेऊर हैबतीचे माजी सरपंच संतोष म्हस्के, ऍड. अजय रिंधे, शरद शिंदे, रामदास खराडे, दत्तोबा महाराज रिंधे, महेश उगले, कैलास म्हस्के, गोरक्षनाथ कानडे, शरद जाधव, खंडू कोकरे, राजेंद्र कोकरे, नितीन गायकवाड, रंगनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंनुस पठाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments