प्रामाणिक परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते
मेजर कुंडलिक ढाकणे : कथक पदवीका परीक्षे मध्ये पूर्वजा बोज्जा महाराष्ट्र राज्यातून प्रथम आल्या बद्दल सहजयोग परिवाराच्या वतीने सत्कार
वेब टीम नगर : टिळक विदयापीठ, पुणे येथे नुकत्याच झालेल्या कथक पदवीका परीक्षे मध्ये पूर्वजा श्रीनिवास बोज्जा ही महाराष्ट्र राज्यातून प्रथम आल्या बद्दल प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार, अहमदनगर च्या वतीने सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव मेजर कुंडलिक ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी सहजयोगी राहुल सातपुते, विनोद पेंटा, श्रीनिवास बोज्जा, मा. नगरसेविका वीणा बोज्जा,वासंती वैद्य, गीता सातपुते, तोगे आजी, अथर्व बोज्जा व कार्तिक ढाकणे हे उपस्थित होते.
या वेळी बोलतांना मेजर ढाकणे म्हणाले. पूर्वजा हीने प्रामाणिक पणे परिश्रम केल्यानेच तिला हे यश प्राप्त झाले आहे. पूर्वजा चे यश हे सहजयोग परिवारासाठी अभिमानाची तर आहेच परंतु महाराष्ट्र राज्यात प्रथम येऊन तिने ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नाव रोशन केले आहे. अश्याच प्रकारे यापुढे ही तिने कथक नृत्या मध्ये परिश्रम घेऊन नगर शहरातील इतर विध्यार्थी घडवावे व त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन करून तिला पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
या वेळी मा. नगरसेविका वीणा बोज्जा म्हणाले हा सत्कार पूर्वजा साठी महत्वाचा तर आहेच पण आमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा ऊर्जा देणारी बाब असून असेच शुभेच्छा व आशीर्वाद आपणा सर्वांचे राहावे. पूर्वजा चे सत्कार केल्या बद्दल आभार मानून सहज भुवन, गोविदपुरा येथे दर रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत विनामूल्य साप्ताहिक ध्यान सुरु झालेले असून याचा लाभ नगर मधील साधकांनी घ्यावे असे आवाहन बोज्जा यांनी केले.
या वेळी इतर सहजयोगी उपस्थित होते.
0 Comments