अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग

 अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर जिल्ह्यात महानुभाव पंथाचा प्रसार 

चक्रधर स्वामींचे आगमन शके ११९१-९२ च्या सुमारास झाले . महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक,संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे आगमन नगर जिल्ह्यात झाले. त्यावेळी राजेगाव,शिंगवे, केशव व मिरी असे त्यांचे मार्गक्रमण झाले. त्याचा पुरावा "स्थान पोथीत" आहे. त्यावेळी ते ज्या मंदिरात उतरले तेथील वर्णनही त्यात आले आहे. श्री चक्रधर स्वामी यांचे एक शिष्य रामदेव भट पाठक हे होते त्यांना दादोबा म्हणत त्यांनी गीतेवर थोडक्यात टीकात्मक भाष्य केले. त्यांच्या आग्रहाखातर श्री चक्रधर स्वामी मिरी गावाबाहेरच्या बनेश्वर मंदिरात ३ दिवस राहिले. त्यानंतर २० दिवस पश्चिमेकडील महालक्ष्मीच्या मंदिरात  मुक्कामास राहिले.या २० दिवसांपैकी पहिल्या काही दिवसात एक प्रसंग घडला त्याचे वर्णन "लीळा चरित्राच्या" उत्तरार्धात केले आहे.राजेगावाहून,"मिरीज देवी महालक्ष्मीज अवस्थाने महालक्ष्मीज देवळी दिस वीस अवस्थां ; एक ही रात्रीचा पूजा स्वर जाला".स्वामी म्हणले "आम्ही सात-आठ दिवस राहिलो आता जाऊ द्या, पुढे कोठे राहणार घाटावर नंतर दादासे बीठरा निघाले साधे तिघी बंदुका वैसवीयाची आसे ती" तेव्हा दादोबा म्हणाले "महात्मा बिढरा जाती तेव्हा आम्हाला तुमच्या बरोबर येऊ द्यावे असे उत्तर तिघींनी दिले ; त्यांना भिक्षा मिळणार नाही , प्रवासात हाल होतील,परंतु त्यांनी हट्ट सोडला नाही; मग स्वामींनी तिघींना दीक्षा दिली. मग सर्वज्ञ म्हणितले हा पैलः पाठा जात असे तेणे मार्गे जा हो का ? जिमग निघालीया देव निघाले मग गोसावी बीज केले ।।२०६।। महानुभाव पंथाच्या दृष्टीने हा दीक्षांत समारंभ फार महत्वाचा ठरला आणि तो मिरी गावात मिरीज देवी महालक्ष्मी मंदिरात हा समारंभ घडला महानुभाव पंथाच्या संस्थापकांचा स्मृतींनी रंगलेले महालक्ष्मीचे हे मंदिर आज रोजी मिरी या गावी आहे.       

अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालया  मध्ये महानुभाव पंथाची ३ फूट बाय ३ फूट लांबी रुंदीची वंशावळ आहे. त्याबरोबरच ऐतिहासिक हस्तलिखित पोथी आणि संकेत लिपीतील  ९-१० पोथ्या आहेत. 

१२व्या १३व्या शतकात महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते.यादव राजे वैदिक संस्कृतीचे पूजक होते या दरम्यान जैन व बौद्ध धर्माचा चांगला प्रसार झाला होता. यादवांच्या राज्यात महानुभाव पंथाची श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधर स्वामींनी स्थापना करून प्रसार केला. या काळात भागवत धर्माची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी सुरु केली आणि आपापल्या परीने धर्म प्रसार केला. महानुभावांना महाराष्ट्र देश नेहेमीच आपला वाटला.श्री चक्रधर स्वामींनी गुजरात,महाराष्ट्र, आंध्र,कर्नाटक,इत्यादी प्रांतात भ्रमण केले. या ठिकाणच्या संस्कृती, लोकजीवन,रूढी,परंपरा  यांचा बारकाईने अभ्यास केला,काही अनुभव घेतले.म्हणून "

कान्नड देशा,तेलंग देशा न वचावे महाराष्ट्र असावे कारण ते देश विषय बहळदेश तेथे अवधूत मान्य" असा आदेश श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना देतात. ' एकदा केसोबांनी नाग देवाचार्यांना संस्कृत मध्ये काही विचारले तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, " पंडितः केशव देयः तुमचा " " अस्मात - कस्मात " मी नेणेगाः मज श्री चक्रधरे निरूपिली - मऱ्हाटी तियाची पुसाः " 

संदर्भ - मिरीचे ऐतिहासिक दर्शन  

 

लेखक : नारायणराव आव्हाड (बी.ए) 

महाराष्ट्र शासन प्रमाणीत मोडीलिपी वाचक  

९८८१९६३६०३             

Post a Comment

0 Comments