छेड काढणाऱ्या तरुणाची महिलांनीच केली धुलाई

 छेड काढणाऱ्या तरुणाची  महिलांनीच केली धुलाई 

वेब टीम धौलपूर : तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला त्या तरुणीसह संतापलेल्या इतर तरुणींनी बेदम चोप दिला. भरबाजारात हा प्रकार बराच वेळ सुरू होता. राजस्थानच्या धौलपूरमध्ये हा प्रकार घडला.

धौलपूर जिल्ह्यातील निहालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधी पार्क येथे बुधवारी संध्याकाळी एका तरुणाने महिलांसोबत गैरवर्तन केले. सुरुवातीला महिलेने आणि तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्या तेथून निघून जात असताना, गांधी पार्कजवळ बाजारात त्याने मोटरसायकल आडवी घातली. त्यांना रोखले.

अखेर महिला आणि त्या तरुणीने तरुणाला चोप देण्यास सुरुवात केली. भरबाजारात हा धक्कादायक प्रकार सुरू होता. तरुणीने आणि महिलेने त्याला मारहाण केली. तरुणाने त्या तरुणीच्या हातून तार हिसकावली आणि त्यानेही दोघींना मारहाण केली. अर्धा तास हा हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू होता. मात्र, कुणीही त्यांना वाचवण्यासाठी पुढे आला नाही.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, काही वस्तू खरेदीसाठी त्या बाजारात गेल्या होत्या. तिच्यासोबत तरुणी होती. आरोपीने तरुणीचा मोबाइल फोन हिसकावला. त्यानंतर तिची छेड काढू लागला. तरुणी आणि महिलेने त्याला प्रतिकार केला. दरम्यान, तरुणीसह महिला आणि तरूणही निहालगंज पोलीस ठाण्यात गेले. मात्र, दोन्ही बाजूने पोलिसांत तक्रार देण्यात आली नाही. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments