बाप लोकांनीच केली महिलेची हत्या :आठवडाभरानंतर उकलले हत्येचे गूढ

बाप लोकांनीच केली महिलेची हत्या :आठवडाभरानंतर उकलले हत्येचे गूढ 

वेब टीम हरदोई : उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये आठवडाभरापूर्वी महिलेची हत्या झाली होती. आठवड्या नंतर  हत्येचे गूढ उकलले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अनैतिक संबंधांवरून त्या महिलेची हत्या झाल्याची माहिती उघड झाली आहे. प्रियकराने त्याच्या दोन मुलांच्या मदतीने महिलेची हत्या केली होती.

महिला आपल्या प्रियकराकडे वारंवार पैशांची मागणी करत होती. यावरून त्या दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. हरदोईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला लोथू गावात २८ जानेवारीला एका महिलेची हत्या झाली होती. तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळला होता. धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

महिलेचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना तपास करत असताना मिळाली. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेच्या चौकशीसाठी पोलीस पथक नेमण्यात आले. सर्व्हिलान्सच्या आधारे गावातीलच कमर खान याने तिची हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर मृतदेह शेतात फेकला. पोलिसांनी कमर याच्यासह त्याच्या दोन मुलांना अटक केली.

तीन वर्षांपासून महिलेचे अनैतिक संबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमर खान आणि महिलेचे तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. महिला त्याच्याकडे पैशांची वारंवार मागणी करत असे. त्याचवेळी कमर याला त्याच्या दोन मुलांनी आणि पत्नीने विरोध केला. घरात भांडणे वाढली. महिलेची हत्या करण्याचा कट बापलेकांनी रचला. तिघांनीही तिची हत्या केली. आरोपींना अटक केली असून, तिघांना अटक केली

Post a Comment

0 Comments