आजही बाळ बोठेचा अटक पूर्वजामीन फेटाळला

 आजही बाळ बोठेचा अटक पूर्वजामीन फेटाळला  

वेब टीम नगर : यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्ष   रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला आज झालेल्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनच्या सुनावणीत कोणताही  दिलासा मिळाला नाही . पत्रकार बाळ बोठेच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी २९ जानेवारी २०२१ रोजी होणार होती मात्र  खंडपीठाने ही सुनावणी  पुढे ढकलली होती मात्र आज दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेऊन कोर्टाने बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णय दिल्याने बाळ बोठेला  कोणताही डीईलसा मिळाला नाही . 

  यापूर्वी पत्रकार बाळ बोठेने आपल्या अटकपूर्व जामिनासाठी  पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र पारनेर न्यायालयाने ते अर्ज फेटाळले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस काढली होती त्यानंतरही तो न सापडल्याने  जिल्हा पोलिसाकडून स्टॅंडिंग अर्ज दाखल करून पत्रकार बोठेला फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती ती मागणी न्यायालयाने मंजूर करून पत्रकार बाळ बोठे याला फरार आरोपी म्हणून घोषित केला होता.

३० नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथून अहमदनगर मध्ये येताना जाते गावाच्या घाटात यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षरेखा जरे  यांची  हत्याााा करण्यात आली होती . यानंतर या प्रकरणात अहमदनगर पोलिसांनी कारवाई करत अवघ्या तीन दिवसात या हत्या मागील पाच आरोपींना अटक करून पत्रकार बाळ बोठे  हा  या हत्यामागील मुख्य सूत्रधार आहे अशी माहिती  सार्वजनिक केली होती.   मात्र या घटनेला दोन महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप जिल्हा पोलीस पत्रकार बाळ बोठेला पकडण्यात अयशस्वी आहे. यादरम्यान पत्रकार बाळ बोठे हा कधी नगर मध्येच आहे तर कधी नाशिक मध्ये आहे अशी चर्चा सुद्धा जिल्ह्यात रंगली होती .बाळ बोठे च्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी असून राज्यातील राज्यातील ११०० पोलीस ठाण्यातील पोलीस सध्या बाळ बोठेचा शोध घेत आहेत. पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयाने आणि आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता बाळ बोठे आता सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे अथवा पोलिसांना शरण येणे एवढेच मार्ग उरले आहेत. 

   


Post a Comment

0 Comments