रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांचे परवाने कधी रद्द होणार ?

रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांचे परवाने कधी रद्द होणार ? 

वेब टीम नगर : कोरोना काळात रुग्णांची लूट केल्या प्रकरणी १४ रुग्णालयांना अतिरिक्त रक्कम रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना परत कारण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या मात्र त्या सर्व नोटिसांना १४ पैकी १२  रुग्णालयांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने मनपाने या सर्व रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याची नोटीस देण्यात आली होती या नोटिसीचा "अल्टिमेटम पिरियेडही" संपलेला असल्याने आता कारवाई होणार का असा प्रश्न नागरकरांकडून उपस्थित केला जात आहे. 

या सर्व १४ रुग्णालयांनी मिळून कोरोना बाधित रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची ८३ लाख ७५ हजार २१७ रुपयांची लूट केल्याचे तपास अंती निश्चित करण्यात आले होते. त्या सर्व रुग्णांना रुग्णालयांनी आकारलेली अतिरिक्त रक्कम परत करण्यासाठी मनपा प्रशासनाने या रुग्णालयांना नोटीस काढल्या होत्या त्यानंतर साईदीप हॉस्पटिल ने १ लाख २८ हजार ८९० रुपयांचा परतावा रुग्णांना परत दिला होता. तर स्वास्थ्य हॉस्पिटल ने ५०० रुपयांचा परतावा दिला होता मात्र त्यानंतर पुन्हा या सर्व रुग्णालयांना आता परतावा परत करण्याची अंतिम नोट्स पाठवली होती या नोटिसीत परताव परत न दिल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येईल असे म्हटले होते. परवाच हि मुदत संपली. पण रुग्णालयांनी याही नोटिसीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने नोटिशीत म्हंटल्या प्रमाणे या सर्व  रुग्णालयांचे  परवाने रद्द व्हायला हवेत मात्र माहापालिका प्रशासन हि कारवाई करणार का असा सवाल सध्या रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.        

दरम्यान या संदर्भात आरोग्याधिकारी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता येत्या दोन दिवसात या संदर्भात जिल्हाधिकार्यांशी भेट घेऊन निर्णय घेतला जाईल असे मनसेच्या नितीन भूतारे यांनी सांगितल.  

Post a Comment

0 Comments