सोशल मीडियावर असतील फोटोंसाठी ब्लॅकमेल करणारे आरोपी २४ तासात गजाआड

सोशल मीडियावर असतील फोटोंसाठी ब्लॅकमेल करणारे आरोपी २४ तासात गजाआड 

वेब टीम नगर : शाळा बंद असतांना व्हाट्सअँप द्वारे एका मुलाशी ओळख झाली. त्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यातून मुलाने मुलीकडे काही अश्लील फोटोंची मागणी केली बळजबरीने ते फोटो पाठवण्यासाठी भाग पाडले त्यामुळे त्या मुलीने काही फोटो पाठवले त्यानंतर पुन्हा मुलाने अश्लील फोटोंची मागणी केली मात्र त्यास मुलीने नकार दिल्याने त्या मुलाने मुलीला धमकी दिली कि तू जर मला आणखीन अश्लील फोटो पाठवले नाहीस तर मी तुझी सोशल मीडियावर फोटो टाकून बदनामी कारेन अशा आशयाची फिर्याद पीडित मुलीने २६ जानेवारी रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली. 

फिर्याद दाखल होताच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपी हा मु.पो शेलू खडसे ता.रिसोड जि.वाशीम येथील राहणार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने पथक रवाना करून आरोपीचा रिसोड पोलिसांच्या मदतीने शोध घेऊन त्याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कडे गुन्ह्याची विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याच्या व मित्राच्या फोन द्वारे सदर मुलीस अश्लील संदेश पाठवल्याचे तसेच तिचे फोटो अपलोड केल्याचे कबुल केले. ह्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याकडे असून त्यांनी आरोपी १.राहुल शिरसाठ,  २. विशाल  साबळे यांना आज कोर्टासमोर हजर करून त्यांना १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

हि कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर , सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार , गुन्हे शोध  पथकाचे पोना गणेश धोत्रे, पो कॉ कैलास शिरसाठ , सुशील वाघेला, पो ना विष्णू भागवत, नितीन शिंदे, योगेश भिंगारदिवे, शाहिद शेख , रवींद्र टकले, पो.कॉ.सुमित गवळी, भारत इंगळे , तानाजी पवार , प्रमोद लहारे , सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, प्रशांत राठोड, आदींनी केली.            

Post a Comment

0 Comments