बोठेच्या अटके साठी "स्टँडिंग वॉरंट" साठी अर्ज दाखल

 बोठेच्या अटके साठी "स्टँडिंग वॉरंट" साठी अर्ज दाखल 

वेब टीम नगर : रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सुरधार बाळ बोठे याचा पोलीस यंत्रणा कसून शोध घेत असली तरी गेला महिनाभर तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र आता त्याच्या "स्टँडिंग वॉरंट" साठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज केल्याने बाळ बोठेच्या अडचणीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 

३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी  रेखा जरे यांची जातेगाव घाटात गळा चिरुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटकही  केली आहे मात्र मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पोलिसांच्या नजरेआड आहे. दरम्यान बाळ बोठे याच्यावर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल असतांनाच अन्य एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून ह्या गुन्ह्या नंतर  दोनच दिवसात आणखीन एका महिलेनेने बोटे याने १० लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

महिनाभर पोलिसांना  गुंगारा देणाऱ्या बाळ बोठेच्या शोधासाठी पुणे,नाशिक,मुंबई,औरंगाबाद  या शहरांमध्ये पोलीस पथके पाठविण्यात आली होती. मात्र तरीही बाळ बोठे पोलिसांच्याबी नजरेआडच आहे. त्याला अटक करण्यासाठी आता पोलिसांनी पारनेर न्यायालयात "स्टँडिंग वॉरंट" साठी अर्ज केला असून येत्या सोमवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे.         

Post a Comment

0 Comments