मूलमंत्र आरोग्याचा :योगसाधना

 मूलमंत्र आरोग्याचा 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
उत्थित  हस्तपादांगुष्ठासन 



उत्थित म्हणजे उचललेला पादांगुष्ठ  म्हणजे पायाचा अंगठा एका पायावर उभे राहून दुसरा पाय पुढच्या बाजूस पसरून पसरलेल्या पायाचा अंगठा धरुन आणि डोके त्या पायावर टेकून हे आसन  करायचे असते. 

 पद्धती

१) ताडासनात  उभे रहा श्वास सोडा आणि गुडघा वाकवून  उजवा पाय वर करा.  उजव्या पायाचा अंगठा व तर्जनी आणि मधले बोट यांनी उजव्या पायाचा अंगठा घट्ट धरा .  

२) डावा हात डाव्या  कमरेवर  ठेवा आणि शरीर तोलून धरा दोनदा श्वास घ्या . 

३) श्वास सोडा उजवा पाय पुढे ताणा आणि ओढा  दोनदा श्वास घ्या.  

४) या स्थितीमध्ये ठामपणे उभे राहता आले म्हणजे उजवे पाऊल  दोन्ही हातांनी पकडा आणि अधिक उंचीवर न्या, दोनदा श्वास घ्या.  

५) आता श्‍वास सोडून उजव्या गुडघ्यापुढे  प्रथम डोके आणि नंतर नाक  आणि शेवटी हनुवटी ठेकवा या स्थितीत राहून काही वेळ दीर्घ श्वसन करा . 

६) श्वास सोडा हात  मोकळे करा आणि उजवा पाय जमिनीवर आणून ताडासन  करा.

७) हेच आसन  दुसऱ्या बाजूने करा या वेळी उजवा पाय जमिनीवर ठेवून डावा पाय उंच करा .

८)क्रमांक पाच आणि क्रमांक सहा या स्थितीमध्ये तोल सांभाळणे कठीण असते क्रमांक चारच्या स्थितीवर उत्तम प्रभुत्व मिळवलया खेरीज त्या  स्थिती नीट करता येत नाहीत. 

 परिणाम : या आसनामुळे पायाचे स्नायू सशक्त बनतात आणि तोल सांभाळण्या मुळे शरीराला स्थिरता आणि समतोल लाभतो.



Post a Comment

0 Comments