खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी २ वर्षानंतर गजाआड

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी २ वर्षानंतर गजाआड 

वेब टीम पाथर्डी : खुनाच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी विष्णू लहानु दिनकर (वय 74, रा. आंबेडकर चौक, पाथर्डी) जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र आरोपी विष्णू फरार होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.

दि. 11 एप्रिल 2019 रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून बेबी अर्जुन शिरसाठ यांच्यावर आरोपी अर्जुन विक्रम दिनकर व विष्णू लहानु दिनकर यांनी धारदार हत्याराने वार करून खून केला होता. याबाबत फिर्यादीवरून नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात भादवि. कलम 302, 307 हस ऑर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी विष्णू दिनकर हा फरार होता. आरोपी विष्णू दिनकरचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली, की आरोपी दिनकर आंबेडकर चौक (पाथर्डी) येथे लपून छपून वास्तव्य करत आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार शेजवळ, पोना. माळी, चौधरी, ढाकणे, गायकवाड, माने यांनी पाथर्डी येथून आरोपी दिनकरला ताब्यात घेतले असून त्याला तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. Post a Comment

0 Comments