साहेब फरार बाळ बोठेला अटक करण्याचे आदेश द्या

 साहेब फरार बाळ बोठेला अटक करण्याचे आदेश द्या 

ॲड.सुरेश लगड : राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिले विनंती पत्र 

वेब टीम नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचे नाव त्या गुन्ह्यात निष्पन्न झाल्या पासून बाळ बोठे फरार आहे. रेखा जरे हत्या कांडातील इतर ५ आरोपी तात्काळ जेरबंद केले मात्र हे हात्याकांड घडून जवळपास २ महिने झाले तरी सहावा फरार आरोपी बाळ बोठे आपल्या अधिपत्याखाली अहमदनगर येथील कार्यक्षम अशा पोलीस दलाला सापडत नाहीत हि बाब अत्यंत गंभीर असल्याचे नगर येथील प्रथित यश वकील सुरेश लगड यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सामाजिक बांधिलकीतून लिहिलेल्या विनंती पत्रात म्हंटले आहे. 

येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अनेक सराईत व फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत मात्र डॉक्टरेट व वकिलिची  डिग्री  संपादन केलेला मास्टर माईंड शोध घेऊनही सापडत नाही हि अतिशय धक्कादायक बाब आहे. आज या प्रकरणाकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलॆले आहे. हा फरार आरोपी आपल्या अधिपत्याखाली कार्यक्षम अशा पोलीस दलाला सापडत नाही याचे विशेष वाटते. बऱ्याच कालावधी पासून फरार असलेले आरोपी निलेश शेळके व विश्वजित कासार हे पोलिसांना सापडू शकतात मग उच्च विद्याविभूषित पदवीधर आरोपी का सापडू शकत नाही. मनोज पाटील हे कार्यक्षम अधिकारी नगरला आल्याने आम्हा तमाम नगरकरांना खूप आनंद झाला. पोलीस दलाला अनेक गुन्ह्यातील आरोपी सापडतील अशी आमची अपेक्षा आहे. आता आमची एकच विनंती आहे. या गुन्ह्याच्या तपासाचा वेग वाढवण्याचे व कुठल्याही परिस्थितीत या फरार बाळ बोठेच्या मुसक्या आवळण्याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांना आदेशित करावे अन्यथा समाजात पोलीस दला बाबत चुकीचा संदेश जाईल तसेच या फरार आरोपीचा जामीन उच्च न्यायालाट कसा फेटाळला जाईल यासाठी स्वतः तपासी अधिकाऱ्यांनी जातीने हजर राहून प्रयत्न करावेत. असे निर्देश देण्यात यावेत अशी विनंतीही देशमुख यांना पाठवलेल्या विनंती पत्रात केली ॲड.सुरेश लगड यांनी केली आहे.           

Post a Comment

0 Comments