शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नगरमध्येही ट्रॅक्टर रॅली

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नगरमध्येही ट्रॅक्टर रॅली

वेब टीम नगर :गेल्या २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या कृषिविधेयकाच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नगर शहरातही ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून सुरु झालेल्या या रॅलीचा शहिद भगतसिंग स्मारक येथे  समारोप करण्यात आला. या रॅलीत शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाले होते.शहराच्या मुख्य रस्त्यांवरून हि रॅली काढण्यात आली. 

कृषी विधेयक मागे घ्यावे या मागणी साठी गेल्या २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने हा मुद्दा प्रस्तिष्ठेचा बनविल्याने यात कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात जवळपास चर्चेच्या १२ फेऱ्या झाल्या. मात्र शासनाचे आडमुठे धोरण आंदोलनात तोडगा निघण्यात अडथळा ठरत आहे. 

नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातही आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राळेगण सिद्धी येथेही आज ट्रॅक्टर रॅली  काढण्यात आली.तसेच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आझाद मैदान येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी नगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी रवाना झाले आहेत.तर ३० तारखे पासून अण्णा हजारेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बेमुदत आंदोलन सुरु करत आहेत.       

Post a Comment

0 Comments