शहराची अवस्था गाढवाचा नांगर फिरवल्यासारखी

 शहराची अवस्था गाढवाचा नांगर फिरवल्यासारखी 

सुहासभाई मुळे : सक्कर चौकातील सिग्नलला चपलांचा हार घालून आंदोलन  

वेब टीम नगर : आपल्या अहमदनगर शहराची अवस्था गाढवाचा नांगर फिरवलेल्या सारखी झालेली असताना रस्ते खड्डे बंद असलेले सिग्नल गंजलेले सिग्नल ट्रॅफिक पोलिसांची उदासिनता आणि अतिक्रमणांनी वेढलेले चौक नांगरलेले रस्ते या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शहर वाहतूक शाखेचा वर्धापन दिवस आणि वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियान याचे नुसते नाटकी फोटोसेशन ते देखील ज्यांना नगर शहराविषयी काही घेणे देणे नाही अशा बाहेरच्या पुढाऱ्यांना घेऊन हे वेळ काढू अधिकारी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी नुसते फोटो सेशन करत आहेत, 

मनपा देखील भिकेला लागल्यागत याबाबत उदासीन आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही जागरूक नागरिक मंचातर्फे सक्कर चौकातील, पाच वर्षांपासून बंद असलेल्या गंजलेल्या सिग्नलला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. 


Post a Comment

0 Comments