शेतकऱ्यांसाठी अण्णा हजारेचे ३० तारखेपासून उपोषण

 शेतकऱ्यांसाठी अण्णा हजारेचे  ३० तारखेपासून उपोषण 


वेब टीम राळेगण : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी येत्या ३० जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केलीय. अण्णांनीचप्रसार माध्यमांशी बोलतांना  ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता येण्याआधी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. पण अजून सरकारनं स्वामिनाथन आयोगाच्या  शिफारशी लागू केल्या नाहीत, असा आरोप करत अण्णा हजारे यांनी उपोषणाचं अस्त्र उगारलंय.

दरम्यान, सध्या दिल्ली-हरियाणाच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचं ३ कृषी कायदे मागं घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनाही अण्णा हजारे यांनी सुरवातीच्या काळात पाठिंबा दिला. त्यावेळीच त्यांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्यातलं शेवटचं आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर अण्णांचं हे उपोषण होतंय.

Post a Comment

0 Comments