३९ लाख रुपये किमतीच्या फायबर बोटी नष्ट

 ३९ लाख रुपये किमतीच्या फायबर बोटी नष्ट 

वेब टीम श्रीगोंदा :  श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत आर्वी गावात मद्गलेश्वर महादेव मंदिराशेजारी भिमा नदीपात्रात काही इसम यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने विनापरवाना अवैध वाळुचा उपसा करीत असल्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देत मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी छापा टाकला असता, आर्वी गावचे शिवारात मद्गलेश्वर महादेव मंदिराशेजारी भिमा नदीपात्रात अशोक बापुराव भोसले रा. देऊळगाव राजे ता. दौंड जि. पुणे याच्या मालकीची दोन फायबर व एक सेक्शन बोट, गोकुळ रघुनाथ भंडलकर रा. खोरवडी ता. दौंड जि. पुणे याच्या मालकीची एक फायबर बोट व एक सेक्शन बोट मिळुन आले.

सदर ईसम हे बोटींना डिझेल इंजिन यंत्राच्या सहाय्याने नदी पात्रात अवैध रित्या गौण खनिज वाळुचा उपसा करत असताना पोलिसांना मिळुन आले. छापा टाकताच फायबर बोटी व सेक्शन मधील ईसम हे नदीतील पाण्यात उड्या मारुन पळुन गेले. तिन फायबर बोटी व दोन सेक्शन असा सुमारे ३९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जिलेटीनच्या सहाय्याने पोलिसांनी नष्ट केला आहे.दोन्ही आरोपीविरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भादवि. क. ३७९, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि दिलीप तेजनकर हे करीत आहेत.

नमूद कारवाई (मा.पोलीस अधिक्षक)मनोज पाटील, (अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल , (उपविभागीय पोलीस अधिकारी) अण्णासाहेब जाधव , यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, (सपोनि) दिलीप तेजनकर, (पोकॉ) प्रताप देवकाते, (पोकॉ) प्रकाश मांडगे, (पोकॉ) कुलदिप घोळवे, (पोकॉ) गोकुळ इंगवले, (पोकॉ) दादासाहेब टाके, (पोकॉ) किरण बोराडे, (पोकॉ) प्रकाश दंदाडे यांनी केली आहे.

 


Post a Comment

0 Comments