सावधान वॅक्सीनच्या नावाखाली होतेय सायबर फसवणूक .....

सावधान वॅक्सीनच्या नावाखाली होतेय सायबर फसवणूक ..... 

वेब टीम नगर : भारतामध्ये कोरोना वैक्सीन येत असल्याचे बातम्या प्रसार माधयमांकडून आपल्या पर्यंत येत आहेत. त्यामुळे जनमानसात एक समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक नागरिकाला कोरोना वैक्सीन घेण्याची अपेक्षा वाढलेली आहे. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार किंवा हॅकर घेत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना मानसिक,आर्थिक व शारिरीक त्रास सोसावा लागत आहे. 

कोरोना वैक्सीन च्या नावाखाली सायबर गुन्हेगार तसेच हॅकर कशाप्रकारे नागरिकांची फसवणूक करतात ते पाहूया -

सायबर गुन्हेगार व हॅकर हे नागरिकांना फोन कॉल करून विचारतात की तुम्हाला  कोरोना वैक्सीन पाहिजे आहे का, आपण त्यांना अनुमती दिली असता ते आपल्याला रजिस्ट्रेशन च्या नावाखाली आधार कार्ड ची माहिती विचारतात संबधित माहिती आपण सायबर गुन्हेगार तसेच हॅकर यांना सांगितली असता आपल्या मोबाईल क्रमांकावर ६ डिजिट किंवा ४ डिजिट चा OTP आलेला असतो. सायबर गुन्हेगार किंवा हॅकर सदर OTP आपल्याला विचारतात. संबधित OTPआपण सायबर गुन्हेगार किंवा हॅकर यांना सांगितला असता आपले कोरोना वैक्सीन रेजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल असे कळविण्यात येते. व त्यानंतरच आपल्याला कोरोना वैक्सीन मिळेल अशी आशा दाखविली  जाते. आपण ज्यावेळेस OTPसायबर गुन्हेगार तसेच हॅकर यांना सांगतो त्याच वेळेस काही सेकंदाने आपले बँक अकाउंट सायबर गुन्हेगार रिकामे करून टाकतात व आपली फसवणूक केली जाते.

अशा प्रकारचे सायबर गुन्हे पासून वाचण्यासाठी पुढीप्रमाणे दक्षता घ्यावी -

१) आधार कार्ड बाबत माहिती विचारली असता ते सांगू नये.

२) रजिस्ट्रेशन च्या नावाखाली आपल्याला आपली स्वतची वैयक्तिक किंवा खाजगी माहिती विचारली असता ते कोणासही शेअर करू नये.

३) आपल्या मोबाईल वर आलेला OTP कुणाशी शेअर करू नये.

अशा प्रकारचे सायबर गुन्हे आपल्या सोबत घडले असल्यास आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलिस स्टेशन यांच्याकडे तक्रार करावी. अशाप्रकारचे गुन्हे घडत असून आपण योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.


Post a Comment

0 Comments