नगर शहरात "रमैनी" सोहळा उत्साहात

 नगर शहरात "रमैनी" विवाह सोहळा उत्साहात  

जगद्गुरू रामपालजी महाराज यांच्या प्रेरणेने पार पडला विवाह 


वेब टीम नगर :  जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी चालविलेल्या समाज सुधारणेच्या चळवळीचा एक भाग म्हणून प्रचलित असलेला रमैनी पद्धतीच्या विवाह सोहळ्यात माधवराव पवार रा.जाशी ता.मान जी.सातारा यांचे चिरंजीव महेश आणि प्रमोद भापकर रा.सावेडी अहमदनगर यांची कन्या प्रांजली यांचा विवाह हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे उत्साहात पार पडला. यावेळी वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी समाजातील मान्यवर उपस्थित होते. 

जगद्गुरू संत रामपाल महाराज यांनी स्त्रीभ्रूण हत्या बंदी,नशामुक्ती , दारू मुक्ती , भ्रष्टाचार मुक्ती, जातीभेद वर्णभेद धर्मभेद न करणे , आदी समाजसुधारणा कार्यास सहभाग देऊन आदर्श समाजाचे प्रतीक बनले. 

याच समाजसुधारणेचा एक भाग म्हणून रमैनी विवाह पद्धती समाजा मध्ये रूढ होऊ पाहत आहे. रमैनी विवाह पद्धती म्हणजे कोणत्याही प्रकारचा हुंडा,संसारोपयोगी वस्तू, आहेर, मान पान दिला व घेतला जात नाही. तसेच कोणत्याही प्रकारची पूजा ,साखरपुडा, हळद, मंगलाष्टका, अक्षदा, हार ,फटाके डीजे बँड, आणि वरात यावर खर्च केला जात नाही.या विवाह पद्धती मुळे मुलीच्या आई- वडिलांना कोणत्याही प्रकारचा खर्च येत नसल्याने त्यांच्यावरील आर्थिक ओझे कमी होते.त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण कमी झाले आहे.  

पूज्य कविर्देव कबिर साहेब व त्यांचे अवतार संत रामपाल महाराज यांच्या आशीर्वादाने 17 मिनिटांच्या रमैनी आरतीने हा विना हुंडा ,विना खर्च विवाह सोहळा पार पडला. 

आज विवाहित झालेली वधू भक्तमती प्रांजली ही व्यवसायाने सी ए असून वर भक्त महेश हा आय टी इंजिनियर आहे. सुशिक्षित असलेल्या या दाम्पत्याने आशा पद्धतीने विवाह करून समाजा समोर नवा आदर्श निर्माण केला आहे. या विवाहास आयशर ट्रक व बस चे नगर चे वितरक श्री पाटील, जेष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, समाजातील अन्य मान्यवरांसह उत्तमदास कदम ,चंद्रकांतदास पाटील, गणेशदास कासार , प्रमोददास भापकर,आदींनी हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

             


Post a Comment

0 Comments