लॉरेन्स स्वामीच्या पोलीस कोठडीत वाढ

 लॉरेन्स स्वामीच्या पोलीस कोठडीत वाढ 

वेब टीम नगर :  मोक्‍याच्या गुन्ह्यात अटकेट असलेला लॉरेन्स स्वामी याच्या पोलिस कोठडीत २० जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स स्वामीची पोलीस कोठडी मुदत संपल्याने त्याला  विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते.

विशेष सरकारी वकील ॲड. अर्जुन पवार यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना म्हणाले की आरोपी विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपासात प्रगती आहे.  इतर व्यवसाय बँकेचे व्यवहार मोबाईल डाटा याची तपासी अधिकाऱ्याला माहिती घ्यायची असल्याने आरोपी लॉरेन्स स्वामीची पोलिस कोठडीत वाढ करावी असे युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲड. अर्जुन पवार यांच्याकडून न्यायालयात करण्यात आला. दोन्ही बाजूच्या युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी लॉरेन्स स्वामी पोलिस कोठडीत २० जानेवारीपर्यंत वाढ करण्याच्या निर्णय दिला .

भिंगारमध्ये २३ नोव्हेंबर  रोजी दुपारच्या वेळी फुलचंद जोशी हे आपल्या गाडीतून जात असताना त्यांना लॉरेन्स स्वामी यांनी आपल्याकडील फॉर्च्यूनर आडवी मारून त्यांच्याजवळील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पन्नास लाखांची खंडणी मागितली पैसे न दिल्यास तुझ्या भावाला ठार मारेल अशी धमकी दिली याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात भ.दा.वी ३८७,३४१,३२५ खंडणी आणि आर्मॲक्ट प्रकरणी गुन्हा दाखल झाले आहे, या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामी यांना अटक करण्यात आली आहे.
Post a Comment

0 Comments