रेखा जरे हत्याकांड खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा

 रेखा जरे हत्याकांड खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा

रुणाल जरे याचे पोलीस अधीक्षकांना निवेदन 

सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम, ॲड.उमेश यादव पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी 

वेब टीम नगर :  रेखा जरे हत्याकांड खटल्यात आरोपीना फाशीचीच शिक्षा व्हावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा .  सरकार पक्षातर्फे खटला लढण्यासाठी विशेेेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम अथवा उमेश यादव पाटील यांच्यापैकी कोणाचीही नियुक्ती करण्याची मागणी रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी केली आहे. तसे निवेदन  रुणाल जरे आणि ॲड. सचिन पटेकर यांनी  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. 

बाळ बोठे फरार होऊन एका महिन्याच्या वर कालावधी लोटला असून ,राज्यातील ११०० पोलिसस्टेशनच्या माध्यमातून बाळ बोठेचा शोध सुरू आहे.  मात्र, एवढे करूनही बोठेचा तपास अजूनही लागलेला नाही.

 जरे हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी यात केली आहे. त्यात , रेखा जरे खून प्रकरणामध्ये सुनावणी होण्याकरीता तसेच मूळ फिर्यादींना लवकरात लवकर न्याय मिळून या खुन खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ विशेष सरकारी वकिल ॲड. उज्वल निकम किंवा ॲड. उमेश यादव पाटील यांची नेमणूक व्हावी, अशी मागणीही यात केली आहे. निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ  बोठेविरुध्द सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयातील अन्य आरोपी अटक झाले असुन मुख्य सुत्रधार बोठे अजून फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन नगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.तरीही गेल्या दिड महिनाभरापासून बोठे पोलिसांना सापडत नाही .   त्यामुळे खून प्रकरणाची चौकशी खोळंबली आहे. त्यामूळे संशयाला वाव आहे.  बोठे याचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर बोठेचा ब्लॅकमेल हा एकमेव व्यवसाय आहे. या खून प्रकरणामुळे संपुर्ण  महाराष्ट्रात चर्चेच्या विषय बनला आहे. बोठेचा मोबाईल तपासात जप्त करण्यात आला. त्याच्यामध्ये असणारे कॉल डिटेल हा मुख्य पुरावा ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये या खून खटल्याच्या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी होण्याकरीता तसेच मूळ फिर्यादींना लवकरात लवकर न्याय मिळून जरे खून खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होणे कामी जेष्ठविधीज्ञ विशेष सरकारी वकिल ॲड.उज्वल निकम किंवा ॲड.उमेश यादव पाटील यांची नेमणूक करावी. तसेच हा खुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्वरीत न्यायनिवाडा करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments