दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद

 दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद

वेब टीम नगर  : दि ६/०१/२०२९ रोजी  कोतवाली पोलीस स्टेशनचे  पोलीस निरिक्षक राकेश मानगांबकर यांना रात्र गस्ती  दरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कायनेटीक चौक जवळ रोडच्या कडेला  तीन दुचाकी वाहनांवर काही  इसम संशयीत रित्या थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्यामूळे त्यानी लगेच रात्र गस्त च्याकर्मचाऱ्याना   तात्काळ बोलावून घेवून सदरठिकाणी जावुन खात्री करता सदर ठीकाणी तीन मोटार सायकल वर सात इसम हे संशयीत रित्या थांबलेले दिसले व  पोलीसाना 'पाहाताचसदर ठीकाणा  वरुन गाड्या सह पळुन जात असताना त्यातील  दोन  गाड्यांचा पोलीसांनी पाठलाग करुन त्यावरील ५ इसमांना पकडले व तिस-या मोटार सायकल वरिल २ इसम हे त्यांचे कडील मोटार सायकल वर भरधाव वेगात सदर ठीकाणा वरुन पळुन गेले . 

त्या वेळी पाठलाग करुन घरलेल्या इसमाना त्यांचे नाव विचारता त्यानी त्याचे नाव १) समीर ख्वाजा  शेख  रा झारेकर गल्ली अहमदनगर२) विशाल राजेंद्र भंडारी रा चिपाडेमळा सारसनगर अ नगर ३) परवेज मेहमुद सय्यद रा भासले आखाडा अ नगर ८) प्रतिक अर्जुनगर्जे रा सारसनगर अ नगर ५) अमोल संजय चांदणे रा विपाड मळा सारसनगर अ नगर अशी सांगितली त्या नंतर त्यांचे कडीलगाड्यांची व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कडे एक पल्सर मोटार सायकल  , विना क्रं ची एक्सेस मोपेड मोटार सायकल , २लोखंडी रोड, ४ मोबाईल फोन , मिरची पुड , ९ कोयता असे दरोड्या करिता वापरले साहीत्य मुद्देमालासह मिळुन आल्याने  त्या इसमांस ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे सखोल चोकशी कली असता आम्ही  चोरी करण्या करिता आलो होतो अशी त्यांनी कबुली दिली त्या प्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं २८/२०२९ भार्दाव ३९९५, ८०२ प्रमाणं गुन्हा दाखल करुन आरोपीताची अधिक चौकशी केली असता त्यांचे वर खालील प्रमाणे मालाविरुध्दचे गुन्हे  दाखल आहेत.

समीर ख्वाजा शेख याचेवर ७ विविध गुन्हे दाखल आहेत. तर  परवेज मेहमुद सय्यद याचेवर दोन या प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असुन इतर दोन आरोपींचा शोध घेणे चालु आहे त्याचे कडूनअजुन अशा प्रकारचे गुन्हयाची उकल होण्याची शक्‍यता आहे. पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करोत आहेत.ही कारवाई पोलीस अधिक्षक  मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक  सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारीविशाल शरद दुमे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर व गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोसई मनोज कचरे, पोना गणेश धोत्रे , पोना रविंद्र टकले, पोना विष्णु भागवत, पोनानितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोकौँ भारत इंगळे, पोकॉ सुमित गवळी, पोकाँ योगेश कवाष्टे, पो्को केलास शिरसाठ, पोकाँ

तान्हाजी पवार, पोकां प्रमोद लहारे, पोरका सोमनाथ राउत, पोका सुशिल वाघेला, पोकाँ सुजय हिवाळे यांनी सदरची कारवाई केली आहे. 

Post a Comment

0 Comments