मूलमंत्र आरोग्याचा

मूलमंत्र आरोग्याचा  

 योग सुरु करण्यापूर्वी ...... 

योगाची साधना सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याच बरोबर शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्यां साठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.

लक्षात ठेवा, तुम्हाला एखादा गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल. कुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. उदा : सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये.

रक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे. अशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते.

योगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.

 अंगकाठीने कमजोर प्रकृती असणार्यांरनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता.

सुरवातीला पूरक व्यायाम करणे गरजेचे असते त्यामुळं शरीरात व सांध्यांच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात लवचिकता निर्माण होते . 

शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते.

नियमित व्यायामामध्ये; ताणण्याचे व्यायाम, श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा.व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते.व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो. बैठे व्यायामही करता येतात.

==व्यायामाचे प्रकार== 

 १. ताणण्याचे व्यायाम

उदा. योगासने, सूर्यनमस्कार

२. श्वासाचे व्यायाम

उदा. प्राणायाम

=व्यायामाचे फायदे=

वजन नियंत्रित राहण्यास मदत

शारीरिक क्षमते मध्ये वाढ

नैराश्याचे प्रमाण कमी होणे

उत्साह वाढणे

शरीर पिळदार होणे

रोग प्रतिकार क्षमता वाढते

स्नायू मजबूत होतात.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 

पालक सूप 

साहित्य : पालक , २-३ चामचे हिरवी मुग डाळ, पत्ता कोबी अर्धी वाटी, आल-लसून-कांदा , सेंधव , काळीमिरी पावडर, जिरे पावडर, चिली फ्लेक्स. 

कृती : पालक , मुगडाळ,पत्ताकोबी , आलं-लसून-कांदा, सर्व कुकर मध्ये ३ शिट्या करून शिजवून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सर मध्ये प्युरी करून घ्यावे . गरज वाटल्यास गळून घ्यावे. त्यानंतर ते उकलायला ठेवावे व त्यात सेंधव , काळीमिरी , जिरे पावडर , चिली  फ्लेक्स आदि घालावे. आवडत असल्यास बटर घालून सर्व्ह करावे. 

टीप ; पालक मधील आयर्न , कॅल्शियम , फायबर , व्हिटॅमिन k ,तसेच मूगडाळीतील प्रोटीन यामुळे पॊषण मूल्य युक्त असे हे सूप तयार होते.             

अनुपमा वैभव जोशी - 9404318875  (आहारतज्ञ्)

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak       


Post a Comment

0 Comments