नगरटुडे बुलेटिन

 नगरटुडे  बुलेटिन 

वाडियापार्कसह इतर मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी सूरू  करा 

माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी 


वेब टीम नगर : राज्यात गेल्या अनेक दिवसापासून कोरोना महामारीमुळे बंद असलेली क्रीडांगणे वाडियापार्क सह इतर मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी सुरु करण्यात यावीत त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील या बाबत मी स्वतः दि १९-१०-२०२० रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पत्र दिले होते , परंतु त्या बाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही . 

अनेक दिवसापासून मैदाने बंद असल्याने नागरिकांना मोकळा श्वास घेता येत नाही ,अनेक नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्याची सवय लागलेली असताना अचानकपणे सर्व बंद असल्याने नागरिकांना फिरता येत नाही , परिणामी त्याच्या  आरोग्यावर परिणाम होत आहेत 

आता सर्वत्र हळूहळू सर्व कामकाज सुरळीत सुरु झाल्याने सर्व मैदाने सुरु करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन केली आहे.



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना काळात राबविलेले उपक्रम कौतुकास्पद

पालकमंत्री हसन मुश्रिफ : सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या शैक्षणिक उपक्रमाचे  कौतुक

    वेब टीम  नगर : परिस्थिती कोणतीही असो आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये हा ध्यास घेऊन सतत प्रयत्नशील असणारे सेवाभावी शिक्षक लाभणे ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू न देत शिक्षक व संस्थेच्यावतीने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी काढले.

     शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवून विविध डिजिटल माध्यमातून ९६२ स्वनिर्मित व्हिडिओज् युट्युब चॅनलमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. याबाबतची पालकमंत्री हसन मुश्रिफ यांना संस्थेच्या सेक्रेटरी र.धों.कासवा, मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी माहिती दिली असता कौतुक केले. याप्रसंगी विनोद कटारिया उपस्थित होते.

     याप्रसंगी र.धों.कासवा म्हणाले, या कोरोनाचा काळात प्रशालेत मोफत कोविड अ‍ॅटीजेन तपासणी केंद्र सुरु करण्यात आले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ४५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. प्रशालेतील सर्व कर्मचार्‍यांनी मिळून गरजू पालकांना शिधा वाटप केले तसेच स्टडी फॉर्म होम, व्हॉटस्अप ग्रुप तयार करुन ऑनलाईन तास घेणे, स्वाध्याय पिडीएफ निर्मिती, विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासणी, शिक्षकांकडून साप्ताहिक कामकाजाचा मुख्याध्यापकांमार्फत आढावा घेणे, ऑनलाईन पालक सभा, स्वाध्याय पुस्तिका व प्रश्‍नपेढी वाटप, गृहभेटी, शासकीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविणे असे विविध उपक्रम प्रशालेत राबविण्यात आले असल्याचे माहिती यावेळी दिली.

     या विषयी माहिती देतांना मुख्याध्यापिका योगिता गांधी सांगितले की, कोरोना काळातही आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून शहरी भागातल्या अतिसामान्य घरातील विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या वाटांचा अवलंब करत एकमेकांच्या साथीने नव्या डिजिटल माध्यमांचा सुयोग्य वापर शिकून या सर्वांनी मिळून मुलांच्या शिक्षणासाठी लॉकडाऊन काळात पूर्व प्राथमिक वर्ग ते इ.७ वी पर्यंतच्या प्रथम सत्राचे अभ्यासक्रमावर आधारित तब्बल ९६२ स्वनिर्मित व्हिडिओज युट्युब चॅनलमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविलेले आहेत तर द्वितीय सत्राचे व्हिडिओज् डिसेंबर अखेर युट्युब चॅनलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल, असे सांगितले.

     सध्या शाळा जरी बंद असलीतरी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु ठेवल्या उपक्रमाचे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जागतिक दिव्यांग दिन  साजरा


वेब टीम नगर : महानगरपालिका समावेशित शिक्षण विभाग,युवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था भारत अहमदनगर, चॅप्टर,रायझींग ट्रायबलस् फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तविद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्ताने  कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये रिमांड होम केंद्रातील विशेष शिक्षक उमेश शिंदे यांनी दिव्यांग मुलांच्या अध्यापनासाठी स्वाध्याय पुस्तिका तयार केली , त्याचे प्रकाशन दिनेश सिनारे सहा.आयुक्त महानगरपालिका,  आयुक्त प्रभारी उपायुक्त सचिन राऊत महानगरपालिका अ.नगर,यांच्या हस्ते झाले. 

.गेल्या  आठवड्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती,त्यातुन उत्कृष्ट चित्ररेखाटणारे  विद्यार्थी कला शिक्षकांच्या माध्यमातून निवडले आणि त्यातुन क्रमांक काढण्यात आले.जागतिक दिव्यांग दिना निमित्ताने बक्षिस वितरण दिनेश सिनारे सहा.आयुक्त  प्रभारी उपायुक्त सचिन राऊत महानगरपालिका अ.नगर, प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग सुभाष पवार, पर्यवेक्षक मनपा शिक्षण विभाग जुबेर पठाण ,युवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार भारत अ.नगर अध्यक्ष उमेश शिंदे ,रायझींग ट्रायबलस् फाऊंडेशन अध्यक्ष शिक्षक नेते प्रसाद शिंदे , महेश क्षीरसागर समन्वयक , शशिकांत गिते, शरद पवार यांच्या हस्ते बक्षीस करण्यात आले. तसेच युवा आतंरराष्ट्रीय मानवाधिकार भारत अहमदनगर चॅप्टरच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षक

 मौलवी वसीम हनीफ अ.नगर उर्दू हायस्कूल.थोरात प्रभाकर यादव.,ल.भा.पा.माध्य विद्या. ,अन्सार युसुफ शेख ए.टी.यु जदीद उर्दू प्रायमरी.,प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी .म.ग‌.ज.चितांबर विद्यामंदिर. या आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रशांत कुलकर्णी यांनी केले.आभार शशिकांत गिते यांनी मांनले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ईद हो, होली हो, दिवाली हो या रक्षा बंधन...सारे तेहवार मोहब्बत के लिए होते है

डॉ.कमर सुरुर :  मखदुम सोसायटीच्या मुशायर्‍यात  ‘सदभावनेचा जागर’ 

  वेब टीम नगर :  देशाच्या भवितव्या संबधी असणारे शुभचिंतणाऱ्या  मखदुम सोसायटीच्या मुशायर्‍यात  ‘सदभावनेचा जागर’ आणि विवेकाशील लोकांना प्रखरतेने याची जाणीव झाली आहे.   आमचा प्रिय भारत देश यावेळी अनेक समस्यांने होरपळुन निघत आहे. त्याला काळजी वाटते ती  या विद्वेषी प्रवृतीला प्रतिबंध घातला नाही तर परिस्थिती फारच चिंताजनक होऊ शकते. वास्तविक पाहता आमचा देश अनेक समस्यांनी  ग्रासला आहे. गरीबी, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या सारख्या समस्येने सर्वसामान्य जनतेस वेठीस धरले आहे आणि हे ही तितकेच खरे आहे की या समस्या व्यतिरिक्त शांती आणि मानवतेला कलंकीत करणार्‍या घटना एक प्रमुख संकट आहे. यापासून देशाला देश वासियांना वाचविण्यासाठी मखदुम सोसायटीच्यावतीने  कौमी एकता सप्ताह हा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ.कमर सुरुर  यांनी केले.

     मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहांतर्गत रहेमत सुल्तान हॉल येथे सदभावनेसाठी महेफिले मुशायरयाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी डॉ.कमर सुरुर  बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य उर्दू संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरफुद्दीन शेख, शरीफ खान, प्रा. मेहेबुब सय्यद, मकबुल सर, अ‍ॅड.अमिन धाराणी, शौकत विराणी, कलीमुद्दीन भाई आदि उपस्थित होते.

     मुशायर्‍याच्या सुरवातीला अर्क अहेमदनगरी यांनी आपली रचना सादर करतांना म्हणाले की, ‘नफरत का यारो दामन छोडो.. दिल से दिल का रिश्ता जोडो...’ या कविताने चांगली सुरुवात झाली. यानंतर मुन्नवर हुसेन यांनी ‘अमन के दिप जलाना बहोत ज़रुरी है....ये भेदभाव मिटाना बहोत ज़रुरी है... या संदेश पूर्वक रचनेने मुशायरया मध्ये भरपुर रंग भरले...या नंतर नफिसा हया यांनी आपल्या कविताचे सादरीकरण करतांना म्हणाले की ‘युसूफ का कौन है वो खरीददार देखकर... मै आ रही हूं मिस्त्र का बाजार देखकर’ या  नाजुक शैलीच्या कवितेने रसिकांची भरभरुन दाद मिळविली...याच वातावरणाला पुढे नेत  आसिफ सर म्हणाले की ‘ या खुदा अब मुनसीफीभी खो गयी... झुठ तो सच के बराबर आ गया....या कवितांनी दादा वसूलकेळी.  या परिस्थितीत या मुशायर्‍याला याच वातावरणात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी एक अनुभवी  मन्सूर शाकिर यांनी पार पाडतांना सांगितले की ‘ देखता इन्सान के चेहरे बदलने का वो फन... फितरते इन्सान है कैसे सोचता है आयना...या दर्जेदार कवितेने रसिकांचा उत्साह बांधुन ठेेवला याला पुढं नेतांना  बिलाल अहेमदनगरी यांनी मांडले की ‘बुढापे में हमारे कदम डगमगाये... कोई ये समझा के हम पीकर आये...’ या सत्यावर आधारित कवितेने लोकांची वाहऽ वाह मिळविली.

     या नंतर डॉ.कमर सुरुर यांनी आपल्या रचना सादर करतांना म्हणाले की.... ईद हो, होली हो, दिवाली हो या रक्षा बंधन...सारे तेहवार मोहब्बत के लिए होते है...एक कमजोर से धागे ने बताया है कमर.....भाई बहनों की हिफाज़त के लिए होते है... या राष्ट्रीय एकात्मता व भाऊ-बहिणीच्या नात्यावरच्या कवितेने रसिक एकदम मंत्र मुग्ध झाले. या नंतर  सलिम यावर यांनी ‘ऐ आइने तफसीर मेरी उमर की लिख दे... एक तुही तो बचपनसे मुझे देख रहा है...’ या लोकांना  अंतर्मुख केले. शेवटी मुशायर्‍याचे अध्यक्ष शरीफ खान यांनी ‘चंदनसे साप लिपटा रहा मुद्दतो मगर.. ना पायी वैसी खुशबु कभी अपने बदनसे...’ या कवितीने कार्यक्रमाचा समारोप केला.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  सलीम यावर यांनी केले तर प्रस्तावीक आबीद दुलेखान यांनी केले. आभार  शफकत सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नादीर खान, आरिफ सय्यद, अबरार शेख, तारिक शेख, शहानवाज तांबोळी व मखदुम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले. या सदभावना मुशायरायाला अहमदनगरच्या रसिकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. मुशायर्‍यात शासनाचे सर्व नियम पाळण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवराष्ट्र सेना पक्षाच्या व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्षपदी विजय पितळे

    वेब टीम नगर - शिवराष्ट्र सेना पक्षाची कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीस पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे,  सचिव  खंडागळे, विजय पितळे, सतीश कुलकर्णी, हरिशेठ लखारा, अजय अपुर्वा, विनय गुंदेचा, संतोष पितळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या विविध विषयांवर चर्चा होऊन पुढील दिशा ठरविण्यात आली. याप्रसंगी पक्षाच्या व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्षपदी विजय पितळे यांची निवड करुन तसे  पत्र पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.

     याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, शिवराष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, शेतकरी, कामगार व व्यापारी यांचे विविध क्षेत्रातील प्रलंबित असणारे देश व राज्य पातळीवरील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकारी काम करावे. नियुक्त झालेले विजय पितळे यांचे सामाजिक व व्यापारी क्षेत्रात चांगले काम आहे. त्यांच्या निवडीने व्यापार्‍यांचे प्रश्‍नही पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मदत होईल, असे सांगून शुभेच्छा दिल्या.

     याप्रसंगी विजय पितळे म्हणाले, शिवराष्ट्र सेना पक्षाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रश्‍नांना वाचा फोडून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. समाजाचे प्रश्‍न मार्गी लावणार्‍या पक्षामध्ये मला काम करण्याची संधी मिळत असल्याने त्या माध्यमातून व्यापार्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे सांगितले.

     कार्यक्रमास संतोष ठाकूर, राजू पितळे, जितू गुगळे, विष्णू बल्लाळ, जितेश आहुजा, अभय बोरा, सतीश पितळे, सचिन जामगांवकर, उमेश बोरा, शांतीलाल गुगळे, सुनिल बोरा आदि उपस्थित होते. शेवटी सचिव भैरवनाथ खंडागळे यांनी आभार मानले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

वेब टीम नगर : जिल्हयामध्ये शनिवार दि.१२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार व नागरीकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीकांत आणेकर यांनी केले आहे.

    राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे सुचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय

लोकदालती मध्ये दाखलपुर्व व प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय अॅक्ट ची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबीक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी ॲक्टची समजोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी आपसी समझोत्याकरिता ठेवून तीसामंजस्याने सोडवण्याबाबतचे अवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीकांत आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले आहे.

      अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरीकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर येथे स्वतः येऊन कळवावे. असे आव्हान आयोजकांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिव्यांग बाप-लेकाचा प्रेरणादायी प्रवास इतरांसाठी दिशादर्शक 

 देविदास कोकाटे : जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग खेळाडू व लघु उद्योजक माने पिता-पुत्राचा गौरव

वेब टीम नगर:जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिव्यांग खेळाडू अभिजीत माने व लघु उद्योजक जगन्नाथ माने या दिव्यांग पिता-पुत्राचा गौरव करण्यात आला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांच्या हस्ते माने याला प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी रश्मी पांडव, दिनकरराव नाठे, अलीम शेख, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे आदि उपस्थित होते.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे म्हणाले की, दिव्यांग असलेले जगन्नाथ माने व त्यांचा मुलगा अभिजीत माने यांनी शुन्यातून विश्‍व निर्माण केले. या दिव्यांग बाप-लेकाचा प्रेरणादायी प्रवास इतरांसाठी दिशादर्शक आहे. परिस्थितीवर मात करुन एक यशस्वी खेळाडू घडविण्यात आला आहे. तर जगन्नाथ माने यांनी दिव्यांगावर मात करीत लघु उद्योजक पर्यंतचा गाठलेला प्रवास थक्क करणारा आहे. असे विद्यार्थी घडविणारी शाळा, शिक्षक व दिशादर्शक असलेले वडिल यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जगन्नाथ माने यांनी दिव्यांगाना प्रोत्साहन देऊन त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.

जगन्नाथ माने यांचे चिरंजीव असलेले अभिजीत माने हे मतीमंद दिव्यांग खेळाडू असून, तो एक उत्कृष्ट जलतरणपटू व मंतीमंद मुलांची शाळा टिळकरोड येथील विद्यार्थी आहे. त्यांनी जिल्हास्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत सलग चौथ्यांदा प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. तर राज्यस्तरीय स्पर्धेत देखील उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तर त्याचे वडिल जगन्नाथ माने एका छोट्या कंपनीची संचालकपदाची धुरा सांभाळून एलईडी स्ट्रीट लाईटचे उत्पादन करीत आहे. दिव्यांग खेळाडू व लघू उद्योजक ठरलेले माने पिता-पुत्राचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी सिकंदर शेख, दत्तात्रय आढाव व सतीश दगडे यांचा देखील दिव्यांग पुरस्कार देऊन सत्कार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम चौधरी यांनी केले. आभार ज्योती जाधव यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने
चायना मांजावर राज्यात बंदी घालण्याची मागणी

वेब टीम नगर : पर्यावरणाला हानीकारक असलेल्या व अनेकांचा बळी घेणार्‍या चायना तसेच नायलॉन मांजावर राज्यात गुटखा बंदीप्रमाणे बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, अत्तर खान, शहानवाझ शेख, वसीम शेख, फईम इनामदार, अनिकेत येमूल, शुभम रासकर, सचिन रायकर, शहेजाद खान, सोफियान शेख, अन्सार सय्यद, अन्वर शेख, सरफराज कुरेशी, मिजान कुरेशी, हाजी लाला, ताज खान, अन्सार सय्यद, सिध्दार्थ आढाव, मुन्नवर शेख आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात युवक पतंग उडवितात. पतंगबाजीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जीवघेण्या चायना (नायलॉन) मांजाचा वापर होत आहे. चायना तसेच नायलॉन मांजाची शहरात सर्रास विक्री होत असताना देखील डोळेझाक केली जात आहे. चायना मांजा लवकर तुटत नसल्याने, काही वर्षापासून अनेक नागरिकांचे गळे व हात कापले गेले आहेत. तर या मांजामुळे पशु, पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात बळी जावून, त्यांचे असतित्व धोक्यात आले आहे.

 या जीवघेण्या चायना व नायलॉन मांजावर राज्यात सुरु असलेल्या गुटखा बंदी प्रमाणे बंदी घालण्याची गरज आहे. केंद्र सरकार मेक इन इंडियाचा नारा देत असताना या चायना मांजाची एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री कशाप्रकारे होत आहे. प्रशासनाच्या वतीने फक्त दिखाव्यापुरती चायना मांजावर कारवाई करण्यात येते, मात्र त्यावर पुर्णत: बंदी आनण्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

मनुष्यासह पशु, पक्ष्यांचे जीव घेणार्‍या चायना मांजावर सक्तीने बंदी घालून, विक्री करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच याला कायमचा प्रतिबंध करण्यासाठी गुटखा बंदीप्रमाणे चायना तसेच नायलॉन मांजावर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. चायना मांजा पर्यावरणाला हानीकारक ठरुन अनेक पशु-पक्षी व मनुष्यांचा बळी घेत आहे. चायना मांजावर कायमची बंदी आणण्याची गरज आहे. दरवर्षी अनेकांचा बळी जात असताना यावर तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी व्यक्त केली.तर शहरात चायना मांजाची विक्री झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणार्‍या पोलीसाचा वाढदिवस साजरा

वेब टीम नगर : सण असो किंवा उत्सव नेहमीच बंदोबस्तासाठी सज्ज असलेले व आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणार्‍या ड्युटीवर नेमणुकीस असलेल्या पोलीसाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नगर तालुका पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल नरेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अ.भा. वारकरी मंडळ मंदीर कमिटीचे तालुका प्रमुख विजय भालसिंग यांनी सत्कार करुन त्यांच्या कार्यास सलाम केले. यावेळी महिला हेड कॉन्स्टेबल अमिना शेख, हेड कॉन्स्टेबल राजेद्र ससाणे, महिला पोलीस नाईक प्रमिला गायकवाड आदी उपस्थित होते.

विजय भालसिंग म्हणाले की, पोलीसांनी कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक सण, उत्सव व संकटसमयी पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांचा वाढदिवस असो किंवा काही आनंदक्षण त्यापेक्षा कर्तव्याला महत्त्व देऊन ते आपली ड्युटी करीत असतात. अशाच पोलीस दलातील कर्मचार्‍याचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 भ्रष्टाचार थांबवण्यासाठी शिव भोजन सेंटरमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवा

बाळासाहेब ढवळे : राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची मागणी

वेब टीम नगर: येथील एमआयडीसीत सुरु करण्यात आलेले  शिव भोजनालय सह्याद्री चौकात स्थलांतरित करावे व शिव भोजन मधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सर्व शिव भोजन सेंटरमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, तालुका सरचिटणीस सिताराम सकट, जितेंद्र गायकवाड, एमआयडीसी विभाग प्रमुख योगेश चोथे, अतुल साळवे, स्वप्नील रोकडे, श्रीकांत शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसीत ज्या ठिकाणी शिव भोजन सेंटर चालवले जाते, त्या ठिकाणी कंपनीतला प्रत्येक कामगार हा घरून जेवणाचा डबा आणत असतो. सह्याद्री चौकामध्ये गोर-गरीब हमाल, भाजीविक्रेते जवळपास पाचशे ते हजार लोक त्या ठिकाणी असतात. या ठिकाणी खर्‍या अर्थाने शिव भोजन सेंटरची गरज आहे. राज्य सरकारने गोर गरिबांची सोय होण्यासाठी शिव भोजन सुरु केले आहे. सध्या सुरु असलेल्या शिव भोजन सेंटरमध्ये किती कामगार त्याचा लाभ घेतात? याची चौकशी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सर्वसामान्यांना शिव भोजनाचा लाभ मिळण्यासाठी एमआयडीसी मधील शिव भोजन सेंटरचे सह्याद्री चौकात स्थलांतर करावे, तसेच शिव भोजनमध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी प्रत्येक शिव भोजन सेंटरमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. शिव भोजन सेंटरमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविल्यास भ्रष्टाचाराला अळा बसणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब ढवळे यांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंग प्रकल्प राबविण्याची मागणी


मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

वेब टीम नगर : महसुल गांव निंबळक (ता. नगर) सर्व्हे नं. ५४ येथील दहा एकर जमीनीवर अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंग प्रकल्प राबवून२३०घरकुल वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची मागणी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देऊन संघटनेचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी घरकुल वंचितांच्या प्रकल्पा संदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना संघटनेचे शिष्टमंडळ व जिल्हा प्रशासनातील संबंधीत अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे सुचना केल्या असल्याची माहिती अ‍ॅड. गवळी यांनी दिली.

  स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर देखील लाखो लोकांना स्वत:च्या मालकीची घरे नाहीत. घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने मागील सहा वर्षापासून आंदोलन सुरु आहे. लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना तंत्राचा वापर करून घरकुल वंचितांना प्रत्येकी एक गुंठा जमीन अतिशय स्वस्तात देणे शक्य झाले आहे. यासाठी फ्रिंज हाऊसिंग तंत्र स्वीकारण्याची गरज आहे. महापालिका हद्दीमध्ये ११हजार घरकुल वंचितांची यादी तयार आहे. आज पर्यंत एकाला देखील घर देता आलेले नाही. शहराच्या हद्दीत एक गुंठा जागेची किंमत पंचवीस ते तीस लाख रुपये पर्यंत आहे. तर फ्लॅटची कमीत कमी किंमत ११ लाख एवढी आहे. महाग असलेले घर न परवडणारे असल्याने सर्वसामान्य घरकुल वंचितांना स्वत:चे घर घेणे अवघड बनले आहे. शहरालगत असलेला ग्रामीण भाग म्हणजेच फ्रींज एरियामध्ये पाणी, वीज, रस्त्यांची सोय नसल्यामुळे जमिनीचे भाव फारच कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये घरकुल वंचितांचे घरे या हद्दीत होणे शक्य असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

इसळक-निंबळक येथील जमीन खडकाळ व नापीक आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सहकार्य करून महापालिका हद्दीपासून सात किलोमीटर पर्यंत फ्रिंज फाऊसिंग स्वीकारण्यात यावी व राज्य सरकारकडे त्याची शिफारस करण्यात यावी. या योजनेतंर्गत वीज, पाणी व रस्त्यांची हमी सरकारने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी देण्याची गरज आहे. यामुळे एक गुंठा जमीन फक्त ८० हजार रुपयात मिळणार असून, त्यावर मिळणारे पंतप्रधान आवास योजनेच्या ५५०चौरस फुटाचे घर उभे राहू शकते. अनेक राष्ट्रीयीकृत बँका घरकुल वंचितांना ३ लाखापर्यंत कर्ज देण्यास तयार आहेत. अनुदान घरकुल वंचितांना मिळण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी शेतजमीन बिगर शेती करण्याची अट दूर केली आहे. त्यामुळे दहा एकर जमिनीबाबत प्रकल्प उभा राहत असताना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तर महापालिकेत असणार्‍या ११ हजार घरकुल वंचितांपैकी किमान 5 हजार घरकुल वंचितांना भूमी गुंठा योजनेखाली परवडतील अशा किमतीत घरे मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहेत. जगभरात विशेषत जपान, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, बांगलादेश या देशांनी लॅण्ड व्हॅल्यु कॅप्चर योजना स्वीकारून गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करुन दिली असल्याचे म्हंटले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments