आरोग्य आहार
मटार करंज्या
साहित्य : ४ वाट्या मटार , ४-५ हिरव्या मिरच्या , अर्धा इंच आलं ,७-८ लसूण पाकळ्या वाटून , १ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ , साखर , फोडणीचे साहित्य , २ वाट्या भरून मैदा , १ वाटीभर बारीक रवा आणि २ टे स्पून डाळीचे पीठ , ६ टे स्पून तेल कडकडीत मोहनाकरिता , १ चमचा मीठ , चिमूटभर ओवा , पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट , टाळण्या करीत तेल.
कृती : १ चमचा तेलाची फोडणी करून मटार घालून पाण्याचे झाकण ठेवून बोटचेपे कोरडेच उकडून घ्यावेत. २ वाटी मैदा , १ वाटी बारीक रवा , मीठ,तिखट,हळद,ओवा, व ६ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावा.उकडलेले अंतर हाताने थोडे कुस्करून घ्यावे अथवा डावाने किंवा बत्याने थोडे ठेचून घ्यावेत . त्यात लिंबाचा रस, मीठ, साखर , वाटलेले आलं , लसूण मिरची घालून सारण तयार करावे.
भिजवलेल्या रव्या मैद्याच्या ३०-३२ लाट्या कराव्यात. पुरी एवढी लाटी लाटून १ टी स्पून सारण भरून चंद्रकोरीच्या आकाराची कारंजी कापावी. अश्या सर्व करंज्या भराव्यात. कढईत तेल घालून मंद आचेवर हलक्या गुलाबी तळाव्यात. वरील साहित्यात अंदाजे ३० करंज्या होतात.
टीप :
* रवा - मैदा वापरल्याने खूपच खुसखुशीत होतात व दिसायला पण छान दिसतात. मैद्या ऐवजी कणीक देखील वापरू शकता.कणीक बारीक चाळणीतून चाळुन घ्यावे.
* मटार हाताने थोडे तरी मोडून घ्यावेत. संबंध मटार ठेवले तर सारण नीट मिळून येत नाही व खायला चांगले लागत नाही.
* वरील मटाराच्या सारणात १ वाटीभर ओले खोबरे घालावे. करंज्या चविष्ठ होतात. फक्त खोबऱ्याने जास्त टिकत नाहीत.
0 Comments